राष्ट्रीय

January 31, 2025 8:27 PM

views 35

सोने आणि चांदीचे दर विक्रमी पातळीवर

देशात सोने आणि चांदीचे दर विक्रमी पातळीवर पोहोचले आहेत. मुंबईच्या बाजारपेठेत २४ कॅरेट सोनं कॅरेटमागे ८२ हजार रुपयांच्या पलीकडे गेलं. २२ कॅरेट सोनं ८० हजार १२० रुपये तोळा या दराने मिळत होतं. कालच्या तुलनेत सोनं आज सुमारे ८०० रुपयांनी महागलं. एक किलो चांदी ९३ हजार ५०० रुपये दराने मिळत होती.

January 31, 2025 7:51 PM

views 19

Economic Survey : देशाचा वास्तविक GDP वृद्धीदर चालू आर्थिक वर्षात ६.४ % राहील

देशाचा वास्तविक जीडीपी वृद्धीदर चालू आर्थिक वर्षात ६ पूर्णांक ४ दशांश टक्के राहील असा अंदाज आर्थिक पाहणी अहवालात व्यक्त केला आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज २०२४-२५ या वर्षातल्या आर्थिक पाहणीचा अहवाल संसदेच्या दोन्ही सभागृहांमधे  सादर केला. कृषी आणि सेवा क्षेत्राच्या पाठबळावर देशा...

January 31, 2025 3:20 PM

views 16

राष्ट्रपतींच्या अभिभाषणानं अर्थसंकल्पीय अधिवेशनाला प्रारंभ

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणानं आज सकाळी अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा  प्रारंभ झाला. त्यानंतर दोन्ही सदनांचं कामकाज सुरु झालं.    लोकसभेत सभापती ओम बिर्ला यांनी देशाच्या विकासात माजी प्रधानमंत्री मनमोहन सिंग यांनी दिलेल्या योगदानावर प्रकाश टाकला. तसंच मनमोहन सिंग, ओमप्रकाश चौटाला आणि ३ ...

January 31, 2025 3:12 PM

views 22

प्रयागराज दुर्घटना : न्यायलयीन आयोगाची संगम घाटाला भेट

प्रयागराज इथल्या कुंभमेळ्यात नुकत्याच झालेल्या चेंगराचेगरीच्या दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी नेमण्यात आलेला न्यायालयीन आयोग आज संगम घाटाला भेट देत आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश न्यायमूर्ती हर्ष कुमार यांच्या नेतृत्वाखाली हा त्रिसदस्यीय आयोग राज्यसरकारने स्थापन केला आहे. उत्तरप्रदेशच...

January 31, 2025 2:46 PM

views 17

महिलांच्या योगदानाशिवाय देश समृद्ध होऊ शकत नाही – उपराष्ट्रपती जगदीप धनखड

महिलांच्या योगदानाशिवाय देश समृद्ध होऊ शकत नाही, असं उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्लीत राष्ट्रीय महिला आयोगाच्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. देशात प्रथमच लोकसभा आणि विधानसभेमध्ये महिलांना एक तृतीयांश आरक्षण देण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. देशातल्या म...

January 31, 2025 3:14 PM

views 27

देशाला २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र बनवण्यासाठी सर्वांनी योगदान देण्याचं राष्ट्रपतींचं आवाहन

देशाला २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र बनवण्यासाठी महात्मा गांधी आणि सरदार पटेल यांच्यासारख्या थोर नेत्यांनी दिलेली एकतेची शपथ आठवून आणि देश संरक्षणात प्राणाची आहुती देणाऱ्या शहिदांकडून प्रेरणा घेऊन  सर्व नागरिकांनी योगदान द्यावं असं आवाहन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं. त्या आज अर्थसंकल्पीय अधिवेश...

January 31, 2025 1:46 PM

views 16

स्वातंत्र्यप्राप्तीच्या शतकपूर्तीपर्यंत देश विकसित भारताचा संकल्प पूर्ण करेल – प्रधानमंत्री

देशातल्या मतदारांनी आपल्या सरकारवर तिसऱ्यांदा विश्वास व्यक्त केला असून यावेळचा अर्थसंकल्प या कार्यकाळातला पहिला पूर्ण अर्थसंकल्प आहे, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. दिल्लीमध्ये आज संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होण्यापूर्वी  प्रसारमाध्यमांना ते संबोधित करत होते. भारताने लोकशाही र...

January 31, 2025 4:03 PM

views 36

जागतिक आरोग्य संघटनेकडून नवी मार्गदर्शक तत्व जारी

उच्च रक्तदाब आणि हृदयरोगावर प्रतिबंधक उपायांचा एक भाग म्हणून जागतिक आरोग्य संघटनेने नवी मार्गदर्शक तत्वं जारी केली आहेत. त्यात नेहमीच्या मिठाऐवजी पोटॅशियमचं प्रमाण अधिक असलेल्या मिठाच्या वापराची शिफारस करण्यात आली आहे. तसंच, सोडियमच्या अतिरिक्त वापरामुळे उद्भवणाऱ्या धोक्यांविषयी जनजागृती करणं हा या ...

January 30, 2025 8:22 PM

views 2

भारतीय तटरक्षक दलाच्या कारवाईत ३७२१७ कोटी रुपये किंमतीचे अंमली पदार्थ जप्त

गेल्या वर्षभरात भारतीय तटरक्षक दलानं विविध कारवायांअंतर्गत एकंदर ३७ हजार २१७ कोटी रुपये किंमतीचे अंमली पदार्थ जप्त केले आहेत. गेल्या काही वर्षांच्या तुलनेत ही सर्वाधिक जप्ती असल्याची माहिती तटरक्षक दलाच्या पश्चिम विभागाचे कमांडर भीष्म सिंह यांनी दिली आहे. भारतीय तटरक्षक दलाच्या स्थापना दिनाच्या पार्...

January 30, 2025 8:22 PM

views 7

संपूर्ण देशी बनावटीचं अत्याधुनिक फिफ्थ जनरेशन विमान भारतात सुरु

संपूर्ण देशी बनावटीच्या तेजस या विमानाच्या निर्मितीनंतर आता हेरगिरी करणारं अत्याधुनिक फिफ्थ जनरेशन विमान भारत तयार करत आहे. यासाठी आवश्यक ते तंत्रज्ञान आणि सुटे भाग तयार करण्याचं काम सध्या सुरू आहे, अशी माहिती  संरक्षण संशोधन आणि विकास विभागाचे अध्यक्ष समीर कामत यांनी आज पुण्यात दिली. बुलेटप्रूफ जॅक...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.