राष्ट्रीय

February 4, 2025 2:50 PM

views 48

दिल्ली विधानसभा निवडणूक प्रचारादरम्यान निवडणूक आयोगाची जाणूनबूजून बदनामी करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा निवडणूक आयोगाचा आरोप

दिल्ली विधानसभा निवडणूक प्रचारादरम्यान निवडणूक आयोगाची जाणूनबूजून बदनामी करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं निवडणूक आयोगाने म्हटलं आहे. आम आदमी पक्षाच्या नेत्यांनी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्यावर वारंवार केलेल्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर हे विधान महत्वाचं ठरत आहे. निवडणूक आयोग या आरोपांची...

February 4, 2025 1:44 PM

views 7

कृषीविषयक योजनांमध्ये कोणतीही अनियमितता सहन केली जाणार नाही, केंद्रीय कृषीमंत्र्यांचं स्पष्ट प्रतिपादन

कृषीविषयक योजनांमध्ये कोणतीही अनियमितता सहन केली जाणार नाही, तसंच प्रधानमंत्री पिक विमा योजनेत जर भ्रष्टाचार झाला असेल तर त्याची चौकशी केली जाईल, आणि दोषींवर कारवाई केली जाईल, असं आश्वासन कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी लोकसभेत दिलं. महाराष्ट्रात पिकविमा योजनेत गेल्या सरकारच्या काळात भ्रष्टाचार झ...

February 4, 2025 1:37 PM

views 18

दिल्ली विधानसभेच्या ७० जागांसाठी उद्या मतदान

दिल्ली विधानसभेच्या ७० जागांसाठी उद्या मतदान होणार आहे. यासाठीची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. एक कोटी ५६ लाखाहून अधिक मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. या निवडणुकीत एकूण ६९९ उमेदवार रिंगणात आहेत. शनिवारी आठ फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे.

February 4, 2025 10:23 AM

views 14

जम्मू आणि काश्मिरच्या सुरक्षेबाबत केंद्रीय गृहमंत्र्याच्या अध्यक्षतेखाली आज आढावा बैठक

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज दिल्लीत जम्मू आणि काश्मिरच्या सुरक्षेबाबत आढावा बैठक घेणार आहेत. या बैठकीला जम्मू काश्मिरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा, गृहसचिव गोविंद मोहन तसंच केंद्रीय गुप्तचर संस्थांचे प्रमुख तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहाण्याची अपेक्षा आहे.

February 3, 2025 9:03 PM

views 31

केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्रातल्या रेल्वे प्रकल्पांसाठी सुमारे २३८०० कोटी रुपयांची तरतूद

केंद्रीय अर्थसंकल्पात राज्यात रेल्वेसाठी एकंदर २३ हजार ७७८ कोटी रुपयांची विक्रमी तरतूद केल्याची माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे. राज्यात एकंदर १ लाख ७० हजार कोटी रुपयांचं काम सुरू असल्याचंही त्यांनी वार्ताहर परिषदेत सांगितलं. या रेल्वे प्रकल्पांसाठी राज्य सरकार, केंद्र सरकार आणि भा...

February 3, 2025 8:58 PM

views 20

दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी प्रचाराची मुदत संपली

दिल्ली विधानसभा निवडणुकांसाठीचा प्रचार आज संपला. एकूण ७० विधानसभा मतदारसंघांमध्ये बुधवारी मतदान होऊन शनिवारी मतमोजणी होणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा, आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी आज विविध ठिकाणी प्रचारसभा घेतल्या. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान, काँग्रे...

February 3, 2025 9:03 PM

views 19

४० टक्क्यांपेक्ष कमी दिव्यांगत्व असलेल्यांनाही लेखनिक सुविधा देण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश

दिव्यांग उमेदवारांना कुठल्याही विशिष्ट निकषाची पूर्तता न करता परीक्षेसाठी लेखनिक सुविधा द्यावी, असे आदेश सर्वोच्च न्यायालयानं आज दिले. यापूर्वी केवळ ४० टक्के दिव्यांगत्व असणाऱ्यांना लेखनिक वापरण्याची मुभा होती. लेखनिकांसाठी असलेला वैधता कालावधी वाढवण्याचे निर्देशही न्यायालयानं दिले. एका उमेदवारानं द...

February 3, 2025 8:46 PM

views 24

अर्थसंकल्पामध्ये देशातल्या रेल्वेसाठी २५२२०० कोटी रुपयांची तरतूद

देशातल्या रेल्वेच्या विकास आणि कार्यक्षमता वाढीसाठी अर्थसंकल्पामध्ये २ लाख ५२ हजार २०० कोटी रुपयांची तरतूद आहे. त्यापैकी नवीन रेल्वे मार्गांसाठी ३२ हजार २३५ कोटी रुपये, मार्गिकांच्या नूतनीकरणासाठी २२ हजार ८०० कोटी आणि रेल्वेमार्गाच्या दुपदरीकरणासाठी ३२ हजार कोटींची तरतूद आहे. १६ हजार २४० कोटींची नवी...

February 3, 2025 8:40 PM

views 20

सामाजिक क्षेत्रातील फ्लॅगशिप योजनांचा मुख्यंत्र्यांकडून आढावा

प्रधानमंत्री आवास योजनेच्या ग्रामीण भागातल्या दुसऱ्या टप्प्यात आतापर्यंत १६ लाख ८१ हजार ५३१ घरांना मंजुरी देण्यात आली आहे. उर्वरित घरांच्या कामांना गती देण्यासाठी सामाजिक उत्तरदायित्व निधीची मदत घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले. सामाजिक क्षेत्रातील फ्लॅगशिप योजनांचा आढावा घ...

February 3, 2025 8:34 PM

views 18

शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्यासाठी सरकारनं महत्त्वपूर्ण पावलं उचललं-किरण चौधरी

राज्यसभेत चर्चेला सुरुवात करताना भाजपा खासदार किरण चौधरी यांनी शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्यासाठी सरकारने महत्त्वपूर्ण पावलं उचलल्याचं प्रतिपादन केलं. कृषी क्षेत्रासाठी सरकारने प्रयत्न केल्यानंतरही विरोधी पक्ष सरकारविरुद्ध खोटा प्रचार करत असल्याची टीकाही चौधरी यांनी केली.  राज्यसभेतले विरोधी पक्ष...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.