राष्ट्रीय

January 15, 2025 3:38 PM January 15, 2025 3:38 PM

views 8

पूजा खेडकरला सर्वोच्च न्यायालयानं दिलं अटकेपासून संरक्षण

निलंबित प्रशिक्षणार्थी सनदी अधिकारी पूजा खेडकरला सर्वोच्च न्यायालयानं अटकेपासून संरक्षण दिलं आहे. दिल्ली उच्च न्यायालयानं तिचा अटकपूर्व जामीन फेटाळला होता. त्यावर तिनं सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली. त्यावर सर्वोच्च न्यायालयानं आज सुनावणी घेतली, आणि तिच्याविरुद्ध कठोर पावलं उचलू नयेत, असे आदेश दिले...

January 15, 2025 2:35 PM January 15, 2025 2:35 PM

views 13

दहाव्या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचं संजय जाजू यांच्या उपस्थितीत उद्घाटन

दहाव्या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचं उद्घाटन आज छत्रपती संभाजीनगर इथं माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू यांच्या उपस्थितीत होत आहे. यंदाचा पद्मपाणि जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ लेखिका, नाटककार, निर्मात्या सई परांजपे यांना प्रदान करण्यात येत आहे. या उद्घाटन सोहळ्याआधी भारतीय ...

January 15, 2025 2:32 PM January 15, 2025 2:32 PM

views 4

केंद्रीय औद्योगिक संरक्षण दलाच्या दोन राखीव बटालियनच्या निर्मितीला केंद्र सरकारची मंजुरी

सीआयएसएफ अर्थात केंद्रीय औद्योगिक संरक्षण दलाच्या दोन राखीव बटालियनच्या निर्मितीला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. त्यामुळे सीआयएसएफच्या बटालियनची संख्या १५ होणार आहे. या बटालियनमध्ये एक हजार २५ सैनिक असतील तसंच याचं नेतृत्व वरिष्ठ कमांडंट स्तराचा अधिकारी करेल. नव्या बटालियनमध्ये अति सुरक्षित कारागृ...

January 15, 2025 2:27 PM January 15, 2025 2:27 PM

views 1

परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी स्पेनच्या राष्ट्राध्यक्षांची घेतली भेट

परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी दोन दिवसांच्या स्पेन दौऱ्यात स्पेनचे राष्ट्राध्यक्ष पेद्रो सँचेज यांची भेट घेतली. दोन्ही देशातले संबंध अधिक दृढ करण्याबाबत उभय नेत्यांनी सहमती दर्शवली. यावेळी जयशंकर यांनी सँचेज यांना माद्रीद इथं झालेल्या चर्चेची माहिती दिली, तसंच दोन्ही देशांच्या द्विपक्षीय ...

January 15, 2025 2:24 PM January 15, 2025 2:24 PM

views 7

दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू, पक्षांचे नेते मतदारांपर्यंत पोहोचण्याचा करत आहेत प्रयत्न

दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असतानाच सर्व पक्षांचे नेते मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. भाजपाचे परवेश वर्मा आणि रोहिणी गुप्ता हे आज नामांकन अर्ज दाखल करणार आहेत. आपचे नेते मनिश सिसोदिया हे जंगपुरा मतदारसंघातून अर्ज दाखल करणार आहेत. तर काँग्रेसचे...

January 15, 2025 2:20 PM January 15, 2025 2:20 PM

views 7

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या नवीन मुख्यालयाचं आज नवी दिल्लीत झालं उद्घाटन

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या नवीन मुख्यालयाचं उद्घाटन आज नवी दिल्लीत झालं. पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, आणि काँग्रेस संसदीय पक्षाच्या नेत्या सोनिया गांधी यांनी या इंदिरा भवनचं उद्घाटन केलं. लोकसभेतले विरोधी पक्ष नेता राहुल गांधी आणि इतर ज्येष्ठ नेते यावेळी उपस्थित होते.

January 15, 2025 2:14 PM January 15, 2025 2:14 PM

views 9

केरळच्या उद्योग मंत्र्यांनी यूएईच्या गुंतवणूक मंत्र्यांची आणि चेंबर ऑफ कॉमर्सच्या चेअरमनची घेतली भेट

केरळचे उद्योग मंत्री पी. राजीव यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ संयुक्त अरब अमिराती दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात राजीव यांनी यूएईचे गुंतवणूक मंत्री मोहम्मद हसन अल सुवैदी आणि चेंबर ऑफ कॉमर्सचे चेअरमन अहमद जसीम अल जाबी यांची भेट घेतली. येऊ घातलेल्या इनव्हेस्ट केरला ग्लोबस समिटबाबत त्यांनी आपली वचनबद्धता दर...

January 15, 2025 3:14 PM January 15, 2025 3:14 PM

views 17

७७व्या लष्कर दिनानिमित्त देशाचं सेनादलाला अभिवादन

सशस्त्र दलाच्या अतुलनीय बलिदानाचा सन्मान करण्यासाठी आज लष्कर दिन साजरा केला जात आहे. भारतीय लष्कराचं सैनिकांचं शौर्य, बांधिलकी आणि मातृभूमीची सेवा यांचा सन्मान करण्याचा हा दिवस आहे. याच दिवशी १९४९मध्ये तत्कालीन जनरल के. एम. करिअप्पा यांनी शेवटच्या ब्रिटीश कमांडर इन चीफकडून भारतीय सैन्याची सूत्रं हात...

January 15, 2025 10:20 AM January 15, 2025 10:20 AM

views 9

‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रमासाठी विक्रमी नोंदणी

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासोबत परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी यावेळी विक्रमी सव्वा तीन कोटी विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांनी नोंदणी केली आहे. यात परदेशी विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. या कार्यक्रमाची आठवी आवृत्ती शालेय स्तरावर 12 जानेवारीपासून सुरू झाली असून, ती 23 जानेवारी र...

January 15, 2025 10:13 AM January 15, 2025 10:13 AM

views 13

महाकुंभमेळयात मकरसंक्रांतीच्या दिवशी सुमारे साडेतीन कोटी भाविकांनी केलं पवित्र स्नान

उत्तर प्रदेशातील प्रयागराज इथे सुरू असलेल्या महाकुंभमेळयात काल मकरसंक्रांतीच्या दिवशी त्रिवेणी संगमावर सुमारे साडेतीन कोटी भाविकांनी पवित्र स्नान केलं. या महाकुंभ मेळयात भाविकांना भाषेचा अडसर होऊ नये म्हणून ईलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने 'भाषिणी'मंच उपलब्ध करून दिला आहे. यात अकरा भ...