राष्ट्रीय

December 13, 2025 1:16 PM

views 17

केंद्रीय गृहमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली छत्तीसगडमधे महत्त्वपूर्ण बैठक

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह छत्तीसगढ मध्ये रायपूर इथं महत्त्वपूर्ण बैठक घेणार असून नक्षलवादाचं उच्चाटन करण्याच्या दृष्टीनं सुरु असलेल्या प्रयत्नांचा आढावा घेणार आहेत. या बैठकीला छत्तीसगढचे मुख्यमंत्री विष्णुदेव साय, उपमुख्यमंत्री विजय शर्मा आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत. त्यांनतर अमित शाह ब...

December 12, 2025 8:42 PM

views 38

आगामी जनगणनेसाठी सुमारे पावणे १२ हजार कोटी रुपयांच्या तरतुदीला केंद्रीय मंत्रीमंडळाची मंजुरी

केंद्रीय मंत्रिमंडळाने २०२७च्या जनगणनेसाठी ११ हजार ७१८ कोटी रुपयांच्या तरतुदीला मंजुरी दिली आहे. ही जनगणना दोन टप्प्यात केली जाणार असून ही जनगणना मालिकेतली १६वी आणि स्वातंत्र्यानंतरची आठवी जनगणना असेल. यात जातनिहाय जनगणनेचा समावेश असेल, अशी माहिती, माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज न...

December 12, 2025 8:21 PM

views 19

छत्तीसगडमधल्या सुकमा जिल्ह्यात दहा माओवाद्यांचं आत्मसमर्पण

छत्तीसगडमधल्या सुकमा जिल्ह्यात आज दहा माओवाद्यांनी आत्मसमर्पण केलं. यात सहा महिला नक्षलींचा समावेश आहे. या सर्वांवर ३३ लाख रुपयांचं बक्षिस जाहीर करण्यात आलं होतं. माओवाद्यांनी त्यांच्याकडील एके-४७, दोन एसएलआर रायफल, एक स्टेन गन आणि एक बॅरेल ग्रेनेड लाँचर आदी शस्त्रं पोलिसांकडे जमा केली. 

December 12, 2025 10:43 AM

views 35

राष्ट्रपती मुर्मू यांच्या हस्ते इम्फाळमध्ये विविध प्रकल्पांचं उद्घाटन

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काल संध्याकाळी इम्फाळमधील सिटी कन्व्हेन्शन सेंटरमध्ये झालेल्या समारंभात 1 हजार 3 शे 87 कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांचं भूमीपूजन आणि उद्घाटन केलं. राष्ट्रपती कालपासून मणिपूरच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत.   याप्रसंगी आपल्या भाषणात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्...

December 12, 2025 10:40 AM

views 24

6 राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांमधील मतदार यादीच्या विशेष सघन पुनरीक्षण वेळापत्रकात सुधारणा

भारतीय निवडणूक आयोगानं सहा राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये सुरू असलेल्या मतदार यादीच्या विशेष सघन पुनरीक्षणाच्या वेळापत्रकात सुधारणा केली आहे. यामध्ये तमिळनाडु, गुजरात, मध्यप्रदेश, छत्तीसगड, अंदमान आणि निकोबार बेटे आणि उत्तरप्रदेश यांचा समावेश आहे.   ही राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी ...

December 11, 2025 8:19 PM

views 47

सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांमधल्या भरती परीक्षांचे निकाल जाहीर करण्याची सुधारित पद्धत जारी

सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांच्या भरती परीक्षांचे निकाल जाहीर करण्याबाबतचा सुधारित आराखडा अर्थमंत्रालयानं आज जारी केला. त्यानुसार आता सर्वात प्रथम स्टेट बँक ऑफ इंडियाच्या परीक्षांचे निकाल जाहीर होतील, त्यानंतर राष्ट्रीयीकृत  बँकांचे आणि सर्वात शेवटी प्रादेशिक ग्रामीण बँकांचे निकाल जाहीर होतील. त्याच...

December 11, 2025 8:16 PM

views 19

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मणिपूर दौऱ्यावर

मणिपूरमधल्या वांशिक हिंसाचारामुळे मणिपुरी जनतेला होणाऱ्या वेदनांची जाणीव मला असून राज्याची एकात्मता अबाधित राखून भयमुक्त वातावरण तयार करण्यासाठी सरकार वचनबद्ध असल्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं आहे. राष्ट्रपती सध्या मणिपूरच्या दौऱ्यावर असून आज त्या इंफाळ इथे एका कार्यक्रमात बोलत होत्या....

December 11, 2025 8:11 PM

views 14

अरुणाचल प्रदेशमध्ये रस्ते अपघातात १४ मजूर ठार, ७ बेपत्ता

अरुणाचल प्रदेशातल्या अंजाव जिल्ह्यात एक डंपर हजार फूट खोल दरीत कोसळून झालेल्या अपघातात १४ जण ठार आणि ७ जण बेपत्ता झाले आहेत, तर १ जण बचावला आहे. हे सर्व बांधकाम मजूर आसाममधल्या तिनसुकिया जिल्ह्यातले असून ते गेल्या सोमवारी कामाच्या ठिकाणी जात असताना हा अपघात झाला. ही घटना अत्यंत दुर्गम भागात घडली.  &...

December 11, 2025 8:20 PM

views 22

प्रधानमंत्री मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यात चर्चा

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी दुरध्वनीवरुन चर्चा केली. द्विपक्षीय संबंधातली प्रगती, प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय विकासाच्या मुद्द्यावर यावेळी चर्चा झाल्याचं प्रधानमंत्र्यांनी सांगितलं. जागतिक शांतता, स्थैर्य आणि संपन्नतेसाठी दोन्ही देश कार्यरत रा...

December 11, 2025 4:01 PM

views 25

राज्यसभेत आज निवडणूक सुधारणांबाबत चर्चा सुरू

 आहे. काँग्रेस नेते अजय माकन यांनी चर्चेला सुरुवात केली. सर्व राजकीय पक्षांना समान संधी, पारदर्शकता आणि विश्वसनीयता या तीन कसोट्यांवर टिकणारी व्यवस्थाच जिवंत लोकशाही असते, मात्र या तिन्ही गोष्टींवर सध्या प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे, असा आरोप त्यांनी केला. या विषयावर सध्या राज्यसभेत चर्चा सुरू आहे. ...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.