राष्ट्रीय

February 9, 2025 10:17 AM February 9, 2025 10:17 AM

views 9

नीट-युजी परीक्षा येत्या 4 मे रोजी घेण्यात येणार

 असल्याचं एन टी ए अर्थात राष्ट्रीय चाचणी संस्थेनं म्हटलं आहे. या परीक्षेसाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया कालपासून सुरु झाली असून ती 7 मार्चपर्यंत चालणार आहे.

February 9, 2025 9:49 AM February 9, 2025 9:49 AM

views 16

दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपाला स्पष्ट बहुमत

दिल्ली विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. दिल्ली विधानसभेत भाजपला 48 तर आम आदमी पक्षाला 22 जागा मिळाल्या आहेत. काँग्रेस सलग तिसऱ्यांदा 'शून्या' वर आल्याचं दिसून आलं आहे. भाजपला 27 वर्षांनी दिल्लीची सत्ता मिळाली आहे.   भाजपाचे परवेश वर्मा नवी दिल्लीतून, जंगपुरातून तर...

February 9, 2025 9:35 AM February 9, 2025 9:35 AM

views 14

त्रिपुरा सरकारचा विविध उदयोगां सोबत 3700 कोटी रुपयांचा करार

त्रिपुरा सरकारनं काल आगरतळा इथं समारोप झालेल्या दोन दिवसीय डेस्टिनेशन त्रिपुरा बिझनेस कॉन्क्लेव्हमध्ये शिक्षण, आरोग्यसेवा, कृषी आणि आयटी क्षेत्रातील 87 खाजगी गुंतवणूकदारांसोबत 3700 कोटी रुपयांचे सामंजस्य करार केले आहेत.   त्रिपुराचे मुख्यमंत्री डॉक्टर माणिक साहा, उद्योग मंत्री संताना चकमा आणि व...

February 8, 2025 8:13 PM February 8, 2025 8:13 PM

views 13

दिल्लीत विकास, व्हिजन आणि विश्वासाचा विजय झाला असं सांगत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडून समाधान व्यक्त

दिल्लीत आज विकास, व्हिजन आणि विश्वासाचा विजय झाला असून ढोंग, अराजकता आणि संकटाचा पराभव झाला आहे, अशा शब्दात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या विजयाबद्दल समाधान व्यक्त केलं. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. भाजपा कार्यकर्त्यांनी घेतलेल्या मेहनतीमुळेच हे शक्य ...

February 8, 2025 8:12 PM February 8, 2025 8:12 PM

views 8

नवीन प्राप्तिकर विधेयक पुढच्या आठवड्यात संसदेत सादर होणार

येत्या आठवड्यात संसदेत नवीन प्राप्तिकर विधेयक आणलं जाईल, त्यानंतर ते संसदीय स्थायी समितीकडे पाठवलं जाईल, असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज सांगितलं. दिल्ली इथं रिझर्व्ह बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीनंतर गव्हर्नर संजय मल्होत्रा यांच्यासोबतच्या संयुक्त पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्य...

February 8, 2025 7:17 PM February 8, 2025 7:17 PM

views 12

दिल्लीतल्या विजयाचा राज्यभरात भाजपा कार्यकर्त्यांकडून जल्लोष

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी विजयाचं श्रेय कार्यकर्त्यांना दिलं असून त्यांनी भाजपा कार्यालयात जाऊन अभिनंदन केलं. भाजपामधे आनंदाचं वातावरण आहे. दिल्लीतल्या भाजपा कार्यालयात कार्यकर्ते फटाके वाजवून आणि मिठाई वाटून विजय साजरा करत आहेत. नागपूरच्या भाजप कार्यालयाबाहेर ढोलताशे वाजवून जल्लोष करण्यात आला...

February 8, 2025 7:15 PM February 8, 2025 7:15 PM

views 12

३८व्या राष्ट्रीय क्रीडास्पर्धांमधे १० हजार मीटर धावण्याच्या स्पर्धेत महिला गटात महाराष्ट्राच्या संजीवनी जाधव हिला सुवर्णपदक

उत्तराखंडमध्ये सुरू असलेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये महाराष्ट्राने सर्वाधिक १०७ पदकं जिंकली असून त्यात २३ सुवर्ण, ३९ रौप्य आणि ४५ कांस्य पदकांचा समावेश आहे. सध्या महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर असून ३९ सुवर्ण पदकांसह सेना दलं पहिल्या तर ३० सुवर्ण पदकांसह कर्नाटक दुसऱ्या क्रमांकावर आहे. १० हजार...

February 8, 2025 2:46 PM February 8, 2025 2:46 PM

views 11

कुटुंबांचा आरोग्यविषयक होणारा खर्च या विषयावर राष्ट्रीय सर्वेक्षण होणार

केंद्र सरकारच्या राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयातर्फे ‘कुटुंबांचा आरोग्यविषयक होणारा खर्च’ या विषयावर राष्ट्रीय सर्वेक्षण होणार आहे. या वर्षभरात ही पाहणी होणार असून  निवडक  कुटुंबांनी गेल्या वर्षभरात केलेल्या आरोग्यविषयक खर्चाबाबत माहिती संकलित करण्यात येईल. या सर्वेक्षणाचा मुख्य उद्देश, शासकीय आणि खा...

February 8, 2025 3:43 PM February 8, 2025 3:43 PM

views 21

प्रधानमंत्री येत्या सोमवारपासून फ्रान्स आणि अमेरिकेच्या दौऱ्यावर जाणार

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या सोमवारपासून फ्रान्स आणि अमेरिकेच्या दौऱ्यावर जाणार आहेत. फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉ यांच्या आमंत्रणावरून प्रधानमंत्री १० ते १२ फेब्रुवारी दरम्यान फ्रान्सला भेट देणार आहेत. पॅरिसमध्ये आयोजित एआय कृती शिखर परिषदेचं सह-अध्यक्ष पद ते भूषवतील. या शिखर परिषदेत कृत्...

February 8, 2025 11:12 AM February 8, 2025 11:12 AM

views 6

स्किल इंडिया योजना 2026 पर्यंत सुरू ठेवण्याला केंद्रीय मंत्रीमंडळाची मान्यता

कौशल्य विकासाला चालना देण्याच्या उद्देशानं राबवण्यात येणारी स्किल इंडिया योजना 2026 पर्यंत सुरू ठेवण्याला केंद्रीय मंत्रीमंडळानं मान्यता दिली आहे. या योजनेसाठी 2022-23 ते 2025-26 या वर्षाकरता केंद्रानं आठ हजार 800 कोटी रुपये मंजूर केले आहेत. माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल नवी दिल...