राष्ट्रीय

February 13, 2025 1:11 PM February 13, 2025 1:11 PM

views 16

जम्मू काश्मीर : दहशतवाद्यांनी केलेल्या स्फोटात दोन जवान शहीद

जम्मू काश्मीरच्या अखनूर सेक्टरमध्ये काल नियंत्रण रेषेजवळ दहशतवाद्यांनी केलेल्या स्फोटात लष्कराचे दोन जवान शहीद झाले. कृष्णा घाटी सेक्टरमध्येही पाकिस्ताननं शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं असून या भागात भारतीय लष्कर त्याला चोख प्रत्युत्तर देत आहे. गेल्या आठवडाभरात सीमेपलीकडून वाढत असलेल्या कारवायांमुळे नियं...

February 13, 2025 3:10 PM February 13, 2025 3:10 PM

views 4

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी वॉशिंग्टन इथं दाखल

फ्रान्सच्या यशस्वी भेटीनंतर  प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आपल्या दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात आज पहाटे वॉशिंग्टन इथं पोहोचले. अमेरिकेतले भारताचे राजदूत विनय मोहन क्वात्रा आणि इतर अधिकाऱ्यांनी त्यांचं विमानतळावर स्वागत केलं. राष्ट्राध्यक्षांचं अतिथीगृह असलेल्या ब्लेअर हाऊस इथं पोहोचल्यावर भारतीय समुदायान...

February 13, 2025 12:57 PM February 13, 2025 12:57 PM

views 11

लोकसभेत प्राप्तिकर विधेयक २०२५ सादर होणार

प्राप्तिकर विधेयक २०२५ आज लोकसभेत मांडलं जाणार आहे. प्राप्तिकराशी संबंधित कायद्यात सुधारणा करण्याच्या उद्देशानं हे विधेयक मांडण्यात येईल. आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नवं प्राप्तिकर विधेयक आणण्याची घोषणा केली होती. 

February 13, 2025 1:45 PM February 13, 2025 1:45 PM

views 20

जगभरात आज जागतिक रेडिओ दिवस साजरा

जगभरात आज जागतिक रेडिओ दिवस साजरा केला जात आहे. दरवर्षी १३ फेब्रुवारी रोजी, रेडिओच्या महत्त्वाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि रेडिओद्वारे माहिती मिळवण्याकरता लोकांना प्रोत्साहन देण्यासाठी, हा दिवस साजरा केला जातो. ‘रेडिओ आणि हवामान बदल’ ही यंदाच्या जागतिक रेडिओ दिनाची संकल्पना आहे.    रेड...

February 13, 2025 12:55 PM February 13, 2025 12:55 PM

views 12

लोकसभेचं कामकाज दुपारी २ वाजेपर्यंत तहकूब

वक्फ (दुरुस्ती) विधेयक २०२४ बाबतच्या संयुक्त समितीच्या अहवालावर विरोधी सदस्यांनी केलेल्या गदारोळामुळे लोकसभेचं कामकाज आज दुपारी २ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. हा अहवाल आज सभागृहात मांडला जाणार आहे. सकाळी सदनाचं कामकाज सुरू झाल्यावर काँग्रेस, डीएमके आणि समाजवादी पार्टीसह विरोधी पक्ष सदस्यांनी सभागृह...

February 13, 2025 2:29 PM February 13, 2025 2:29 PM

views 7

MahaKumbh 2025 : माघ पौर्णिमेनिमित्त २ कोटींहून अधिक भाविकांचं पवित्र स्नान

प्रयागराज इथल्या महाकुंभमेळ्यात काल दोन कोटींहून अधिक भाविकांनी माघ पौर्णिमेनिमित्त स्नान केलं. उत्तर प्रदेश सरकारनं विशेष वाहतूक व्यवस्थेसह कडक सुरक्षा व्यवस्था ठेवली आहे. 13 जानेवारी रोजी महाकुंभमेळ्याला सुरुवात झाल्यापासून आतापर्यंत 46 कोटींहून अधिक भाविकांनी त्रिवेणी संगमावर पवित्र स्नान केलं आह...

February 13, 2025 1:14 PM February 13, 2025 1:14 PM

views 11

सहकारी संस्थांच्या एकसमान आणि संतुलित विकासासाठी सरकारच्या विशेष उपाययोजना

राज्यांमधल्या सहकारी संस्थांचा एकसमान आणि संतुलित विकास व्हावा, यासाठी  सरकार विशेष उपाययोजना करत असल्याचं सहकार मंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. ते काल नवी दिल्ली इथं सहकार मंत्रालयाच्या संसदीय सल्लागार समितीच्या पहिल्या बैठकीत बोलत होते. देशातल्या सहकारी संस्थांच्या विकासात असलेला  प्रादेशिक असमत...

February 12, 2025 8:52 PM February 12, 2025 8:52 PM

views 6

फ्रान्स दौरा आटोपून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी अमेरिकेला रवाना

फ्रान्सचा दौरा आटोपून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज अमेरिकेला रवाना झाले. त्यापूर्वी फ्रान्समधे मार्सेली इथं भारताच्या पहिल्या वाणिज्य दूतावासाचं उद्घाटन आज प्रधानमंत्री आणि फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युअल मॅक्राँ यांच्या हस्ते झालं. उभय नेत्यांनी यावेळी फ्रान्समधे राहणाऱ्या भारतीय समुदायाशी संवाद साधला....

February 12, 2025 9:21 PM February 12, 2025 9:21 PM

views 14

रिझर्व्ह बँकेनं कोटक महिंद्रा बँकेवर लादलेले निर्बंध हटवले

रिझर्व्ह बँकेनं कोटक महिंद्रा बँकेवर गेल्यावर्षी लादलेले निर्बंध हटवले आहेत. नवीन ग्राहक स्वीकारणे, नवे क्रेडिट कार्ड देणे यासारख्या गोष्टींवर हे निर्बंध होते. मात्र सर्व नियामकीय पूर्तता पूर्ण केल्यामुळे आणि आवश्यक उपाययोजना केल्यानं रिझर्व्ह बँकेनं हे निर्बंध हटवले.

February 12, 2025 9:18 PM February 12, 2025 9:18 PM

views 3

CSO : जानेवारी महिन्यात किरकोळ चलनफुगवट्याचा दर 4.31 वर

खाद्यपदार्थांच्या किमती घसरल्याने जानेवारी महिन्यात किरकोळ चलनफुगवट्याचा दर ४ पूर्णांक ३१ शतांशांवर आला. केंद्रीय सांख्यिकी कार्यालयाने आज ही आकडेवारी प्रसिद्ध केली. गेल्या ५ महिन्यातला हा  नीचांक आहे. गेल्या वर्षीच्या जानेवारीत हा दर ५ पूर्णांक एक दशांश टक्के होता.