राष्ट्रीय

February 14, 2025 9:37 AM February 14, 2025 9:37 AM

views 22

मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू

मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे. गृह मंत्रालयानं यासंदर्भात अधिसूचना जारी केली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना मणिपूरच्या राज्यपालांकडून अहवाल प्राप्त झाला होता आणि या अहवालावर विचार केल्यानंतर, घटनेच्या कलम 356 द्वारे प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून, राज्यात राष्ट्रपती र...

February 13, 2025 9:04 PM February 13, 2025 9:04 PM

views 12

रेडिओ हा माहिती, शिक्षण आणि मनोेरंजनाचा विश्वासू स्रोत-संजय जाजू

रेडिओ हा माहिती, शिक्षण आणि मनोेरंजनाचा विश्वासू स्रोत असल्याचं माहिती आणि प्रसारण सचिव संजय जाजू यांनी म्हटलं आहे. ते आज जागतिक रेडिओ दिनानिमित्त नवी दिल्लीत आयोजित केलेल्या रेडिओ महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी बोल होते. आकाशवाणी ही जगातली सर्वात मोठी प्रसारण संस्था असून ही देशाच्या ९८ टक्के लोकांपर्...

February 13, 2025 9:01 PM February 13, 2025 9:01 PM

views 13

आयकर कायदा सोपा करणारं नवीन आयकर विधेयक लोकसभेत सादर

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज नवीन आयकर विधेयक लोकसभेत मांडलं. विद्यमान आयकर कायदा सोपा आणि सुटसुटीत करण्यासाठी हे नवीन विधेयक सरकारनं सादर केलं आहे. हे विधेयक संसदीय स्थायी समितीकडे पाठवण्याची शिफारस सीतारामन यांनी केली. आगामी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी समितीनं अहवाल सादर करावा अशी ...

February 13, 2025 8:11 PM February 13, 2025 8:11 PM

views 6

अफवा आणि खोट्या बातम्या पसरवणाऱ्या समाज माध्यमातल्या खात्यांवर कारवाई

प्रयागराजमध्ये महाकुंभाबाबत अफवा, चुकीची माहिती, खोट्या आणि जुन्या बातम्या पसरवणाऱ्या समाज माध्यमातल्या खात्यांवर कडक कारवाई करण्यात येत असल्याचं उत्तरप्रदेश पोलिसांनी सांगितलं. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सूचनेनुसार ही कारवाई करण्यात येत आहे. राज्य सरकार आणि पोलिसांची प्रतिमा म...

February 13, 2025 3:43 PM February 13, 2025 3:43 PM

views 9

सर्वोच्च न्यायालयाचे ईडीवर ताशेरे

प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्डरिंग कायद्याचा वापर करून आरोपीला तुरुंगात ठेवल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयानं ईडी, अर्थात सक्तवसुली संचालनालयावर कडक ताशेरे ओढले असून, हुंडाविरोधी कायद्याप्रमाणे या तरतुदीचा गैरवापर होत असल्याचं म्हटलं आहे. न्यायमूर्ती अभय ओक आणि न्यायमूर्ती उज्ज्वल भयान यांच्या पिठानं काल छत्...

February 13, 2025 3:34 PM February 13, 2025 3:34 PM

views 17

कोळसा उद्पादन वाढवणं गरजेचं असल्याचं मंत्री जी किशन रेड्डी यांचं प्रतिपादन

कोळसा उत्पादनात भारत जगात दुसऱ्या क्रमांकावर असून विकसित राष्ट्र बनण्यासाठी कोळसा उत्पादन वाढवणं गरजेचं असल्याचं केंद्रीय कोळसा आणि खाण मंत्री जी किशन रेड्डी म्हणाले. नागपूर इथं भारतीय मजदूर संघाच्या अखिल भारतीय कोळसा मजदूर संघटनेच्या अधिवेनाच्या समारोप कार्यक्रमात ते आज बोलत होते. आपल्या देशात लिथि...

February 13, 2025 4:00 PM February 13, 2025 4:00 PM

views 12

लोकसभेत प्राप्तिकर विधेयक सादर

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज लोकसभेत प्राप्तिकर विधेयक २०२५ सादर केलं. स्थायी समितीकडे हे विधेयक पाठवायचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. प्राप्तिकराशी संबंधित कायद्यात सुधारणा करण्याच्या उद्देशानं हे विधेयक मांडलं आहे. आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नवं प्राप्तिकर ...

February 13, 2025 2:36 PM February 13, 2025 2:36 PM

views 8

देशातल्या काही भागात जोरदार पावसाचा इशारा

आसाम, मेघालय आणि अरुणाचलप्रदेशमध्ये उद्यापर्यंत हलक्या स्वरूपाचा पाऊस पडेल आणि हिमवर्षाव होईल, तर अरुणाचल प्रदेशाच्या काही भागात आज जोरदार पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, तसंच पश्चिम बंगाल आणि सिक्कीमच्या डोंगराळ भागातही उद्यापर्यंत हलक्या स्वरूपाच्या पाव...

February 13, 2025 2:36 PM February 13, 2025 2:36 PM

views 8

उत्तरप्रदेशात झालेल्या अपघातात ४ मजुरांचा मृत्यू, १६ जखमी

उत्तरप्रदेशात शाहजहांपूर इथं काल रात्री एका गाडीनं दुसऱ्या गाडीला धडक देऊन झालेल्या अपघातात ४ मजुरांचा मृत्यू झाला तर १६ जण जखमी झाले. हे मजूर हरियाणा मध्ये मजुरीसाठी जात होते.  जखमींना फर्रुखाबाद जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती स्थानिक पोलिसांनी दिली.

February 13, 2025 1:16 PM February 13, 2025 1:16 PM

views 4

आपचे अमानतुल्ला खान यांचा जामीनासाठी दिल्ली न्यायालयात अर्ज

आम आदमी पार्टीचे आमदार अमानतुल्ला खान यांनी अटकपूर्व जामीनासाठी आज दिल्ली न्यायालयात अर्ज दाखल केला. पोलिस पथकावर हल्ला केल्याच्या आरोपावरून दिल्ली पोलिसांनी खान यांच्याविरोधात एफआयआर दाखल केला आहे. दरम्यान, आपल्यावरचे आरोप खोटे असल्याचं खान यांनी म्हटलं आहे.