राष्ट्रीय

February 14, 2025 2:53 PM February 14, 2025 2:53 PM

views 19

उत्तर भारत आज थंडीची लाट कायम

उत्तर भारत आज थंडीची लाट कायम राहील, असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. ईशान्य भारतात दाट धुक्याचा थर राहील, आणि हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.  अरुणाचल प्रदेशात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आणि हिम वर्षाव होईल, तर  मेघालय, नागालैंड, मणिपुर, मिझोराम आणि  त्रिपुरा मधेही उद्यापर्यंत हलक्...

February 14, 2025 2:37 PM February 14, 2025 2:37 PM

views 13

…तर ‘ब्रिक्स’ देशाच अस्तित्व नष्ट होईल – डोनाल्ड ट्रम्प

‘ब्रिक्स’ देशांनी डॉलरची स्पर्धा करणारं चलन सुरु केलं, तर या राष्ट्र समूहाचं अस्तित्व नष्ट होईल, असा इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड  यांनी दिला आहे. तसंच ‘ब्रिक्स’ समूहातला एखादा देश ही योजना घेऊन पुढे गेला, तर अमेरिका त्या देशावर १०० टक्के आयात शुल्क आकारेल, असं त्यांनी म्हटलं आहे. जगातल्या...

February 14, 2025 1:31 PM February 14, 2025 1:31 PM

views 14

पुलवामा हल्ल्यात वीरमरण आलेल्या जवानांना प्रधानमंत्र्यांनी वाहिली आदरांजली

२०१९ च्या पुलवामा हल्ल्यात वीरमरण आलेल्या जवानांना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज समाजमाध्यमावर आदरांजली वाहिली. या जवानांचं बलिदान आणि देशाप्रति असलेलं त्यांचं समर्पण येणाऱ्या पिढ्या कधीच विसरणार नाहीत, असं प्रधानमंत्री म्हणाले. २०१९ ला आजच्या दिवशी जम्मू काश्मीरमधल्या पुलवामा  इथं झालेल्या दहश...

February 14, 2025 1:25 PM February 14, 2025 1:25 PM

views 34

पुढल्या संकटाचा सामना करण्यासाठी गौतम बुद्धांची शिकवण हाच उपाय- प्रधानमंत्री

संपूर्ण जग आज पर्यावरणापुढल्या संकटाचा सामना करत असून भगवान गौतम बुद्धांची शिकवण हाच यावरचा उपाय आहे, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. थायलंड इथं आयोजित संवाद कार्यक्रमाला त्यांनी आज दूरदृश्य प्रणालीद्वारे संबोधित केलं.   भगवान बुद्ध यांचा संयमाचा विचार जागतिक आव्हानाला सामोरं जा...

February 14, 2025 6:54 PM February 14, 2025 6:54 PM

views 9

न्यू इंडिया सहकारी बँकेचं संचालक मंडळ बरखास्त

रिझर्व्ह बँकेनं आज मुंबईतल्या न्यू इंडिया सहकारी बँकेचं संचालक मंडळ बरखास्त केलं. प्रशासनाचा दर्जा खालावल्याबद्दल ही कारवाई करण्यात आली. रिझर्व्ह बँकेनं न्यू इंडिया सहकारी बँकेवर काल विविध निर्बंध लागू केले होते. त्यानुसार बँकेला पुढले सहा महिने नवीन कर्ज देता येणार नाही तसंच बचत खातं, चालू खातं किं...

February 14, 2025 1:37 PM February 14, 2025 1:37 PM

views 8

घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित चलनवाढीच्या दरात घसरण

घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित चलनवाढीच्या दरात किंचित घसरण झाली असून जानेवारी महिन्यात तो २ पूर्णांक ३१ शतांश टक्क्यांवर आला. त्याआधीच्या महिन्यात म्हणजे डिसेंबर २०२४ मधे तो २ पूर्णांक ३७ शतांश टक्के होता.   कांदे बटाटे वगळता इतर भाज्या आणि खाद्यपदार्थांच्या किमतीत तसंच इंधनाच्या किमतीत काहीशी घसर...

February 14, 2025 1:39 PM February 14, 2025 1:39 PM

views 7

38 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचा आज समारोप

३८ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचा समारोप उत्तराखंडमधल्या हल्दवानी इथं आज होत आहे. दुपारी होणाऱ्या समारोप समारंभात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उपस्थित राहणार आहेत.   केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी, केंद्रीय क्रीडा आणि युवा कल्याण राज्यमंत्री रक्षा ...

February 14, 2025 10:39 AM February 14, 2025 10:39 AM

views 1

टोरेस गुंतवणूकीत आतापर्यंत 10 हजार 848 गुंतवणूकदारांच्या तक्रारी

टोरेस गुंतवणूक फसवणूक प्रकरणात मुंबईमध्ये अटक करण्यात आलेल्या यूक्रेन च्या एका अभिनेत्याने आरोपी संस्थेच्या कारवायांशी आपला संबंध नसल्याचा दावा करत जामिनासाठी अर्ज केला आहे. आताइन ला गेल्या महिन्यात अटक करण्यात आली असून सध्या तो न्यायालयीन कोठडीत आहे. आतापर्यंत 10 हजार 848 गुंतवणूकदारांनी फसवणुकीच्य...

February 14, 2025 10:38 AM February 14, 2025 10:38 AM

views 13

कुंभवाणी वाहिनीचं प्रसारण विश्वासार्ह माहिती देण्याच्या उद्देशाचे प्रतिक- नवनीत सहगल

महाकुंभ दरम्यान सुरू असलेल्या कुंभवाणी वाहिनीचं प्रसारण हे प्रसार भारतीच्या अचूक आणि विश्वासार्ह माहिती देण्याच्या उद्देशाचे प्रतिक असल्याचं प्रतिपादन प्रसार भारतीचे अध्यक्ष नवनीत सहगल यांनी केलं. प्रयागराज इथं सुरू असलेल्या महाकुंभ मध्ये स्नान केल्यानंतर आयोजित कार्यक्रमात सहगल बोलत होते.   कु...

February 14, 2025 10:25 AM February 14, 2025 10:25 AM

views 6

संसदेची दोन्ही सभागृह येत्या 10 मार्चपर्यंत स्थगित

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला टप्पा काल संपला; त्यामुळे संसदेची दोन्ही सभागृह येत्या 10 मार्चपर्यंत संस्थगित करण्यात आली आहेत. गेल्या महिन्यात 31 जानेवारी रोजी अधिवेशनाचा पहिला टप्पा सुरू झाला होता. अधिवेशनाच्या पहिल्या टप्प्यात 112 टक्के कामकाज झाल्याचं लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सांग...