राष्ट्रीय

April 24, 2025 1:27 PM April 24, 2025 1:27 PM

views 6

प्रधानमंत्र्यांच्या हस्ते ‘इंडिया स्टील २०२५’ चं उद्घाटन होणार

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज मुंबईतल्या बॉम्बे एक्झिबिशन सेंटरमध्ये इंडिया स्टील 2025 या सर्वात मोठ्या आंतरराष्ट्रीय स्टील प्रदर्शनाचं दूरस्थ माध्यमातून उद्घाटन होणार आहे. तीन दिवसांच्या या आंतरराष्ट्रीय प्रदर्शन आणि परिषदेत जागतिक पोलाद  मूल्य साखळीतील आघाडीचे देश एकत्र येऊन, भविष्यात...

April 24, 2025 11:44 AM April 24, 2025 11:44 AM

views 15

प्रधानमंत्र्यांच्या हस्ते बिहारमध्ये विकास कामांचं उद्घाटन

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज बिहारला भेट देणार असून, मधुबनी इथे राष्ट्रीय पंचायती राज दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते सहभागी होतील. या प्रसंगी, 13 हजार 480 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी पंतप्रधानच्या हस्ते होणार असून, रेल्वे आणि वीज क...

April 23, 2025 8:28 PM April 23, 2025 8:28 PM

views 14

पहलगाम हल्ल्यात महाराष्ट्रातल्या एकूण ६ पर्यटकांचा मृत्यू

या दहशतवादी हल्ल्यात राज्यातल्या एकूण ६ पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. त्यातले डोंबिवलीचे संजय लेले, हेमंत जोशी आणि पनवेलचे दिलीप डिसले यांचं पार्थिव मुंबईत पोहोचलं आहे. कौस्तुभ गणवते आणि संतोष जगदाळे यांचं पार्थिव थोड्याच वेळात पुण्यात पोहोचेल.    मृतांच्या कुटुंबांना राज्यशासनानं प्रत्येकी ५ लाख रुपय...

April 23, 2025 8:24 PM April 23, 2025 8:24 PM

views 5

जागतिक विकास दरात घट होण्याचा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचा अंदाज

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जवळपास आपल्या सर्व व्यापारी भागीदार देशांवर मोठ्या प्रमाणात आयात शुल्क लावल्यानंतर, सुरू झालेल्या व्यापार युद्धाच्या पार्श्वभूमीवर, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं जागतिक विकास दरात सार्वत्रिक घट होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं जागतिक अर्थव्यव...

April 23, 2025 8:19 PM April 23, 2025 8:19 PM

views 21

पंजाबने पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानच्या बाजूची सीमा केली बंद

पहलगाम इथल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पंजाब राज्याने आपली पाकिस्तानच्या बाजूची सीमा बंद केली असून राज्यात रेड अलर्ट जारी केला आहे. पंजाबमधल्या पर्यटन स्थळावरची सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे.   मुख्यमंत्री भगवंत मान यांनी आज प्रशासकीय आणि पोलीस अधिकाऱ्यांसोबत उच्चस्तरीय बैठक घे...

April 23, 2025 8:14 PM April 23, 2025 8:14 PM

views 8

पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर मंत्रीमंडळाच्या सुरक्षाविषयक समितीची बैठक सुरू

पहलगाम इथल्या दहशतवादी  हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नवी दिल्लीतल्या निवासस्थानी मंत्रिमंडळाच्या सुरक्षाविषयक समितीची बैठक सुरू आहे. या बैठकीत गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल उपस्थित आहेत.    या दहशतवादी हल्ल्या...

April 23, 2025 8:12 PM April 23, 2025 8:12 PM

views 8

पहलगाम हल्ल्यातील गुन्हेगारांना लवकरच प्रत्युत्तर दिले जाईल- संरक्षण मंत्री

पहलगाम हल्ल्यातील गुन्हेगारांना लवकरच सडेतोड प्रत्युत्तर दिले जाईल, असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. राजनाथ सिंह यांनी आज नवी दिल्ली इथं आयोजित हवाई दल मार्शल अर्जन सिंह स्मृती व्याख्यान कार्यक्रमात व्याख्यान दिलं.   त्यावेळी ते बोलत होते. दहशतवादाविरुद्ध शून्य सहिष्णुता हेच भार...

April 23, 2025 8:11 PM April 23, 2025 8:11 PM

views 9

पहलगाममधल्या दहशतवादी हल्ल्याचा जगभरातून निषेध

पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा जगभरातील नेत्यांनी तीव्र निषेध नोंदवला असून, भारताला पाठिंबा दर्शवला आहे. अनेक प्रमुख नेत्यांनी दूरध्वनीद्वारे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा केली आणि आपल्या शोकसंवेदना व्यक्त केल्या, तसंच दहशतवादाविरोधातल्या लढ्यात भारतासोबत असल्याची ग्वाही दिली.   अमेरिकेच...

April 23, 2025 7:36 PM April 23, 2025 7:36 PM

views 7

पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पर्यटकांच्या सोयीसाठी विशेष गाडी आज रात्री सोडणार

पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पर्यटकांच्या सोयीसाठी भारतीय रेल्वे कटरा ते दिल्ली विशेष गाडी आज रात्री सोडणार आहे. प्रवाशांच्या मदतीसाठी रेल्वेने विशेष हेल्पलाईन क्रमांक जम्मू - तावी, श्री माता वैष्णोदेवी कटरा आणि उधमपूर या स्थानकांसाठी उपलब्ध करुन दिले आहेत.    श्रीनगर हून दिल्ली आण...

April 23, 2025 7:33 PM April 23, 2025 7:33 PM

views 15

शेअर बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी

मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समधे आज दिवसअखेर ५२१ अंकांची वाढ झाली, आणि तो  ८० हजार ११६ अंकांवर बंद झाला. सुमारे ४ महिन्यानंतर हा निर्देशांक पुन्हा ८० हजारांच्या पलीकडे गेला आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही १६२  अंकांची वाढ नोंदवत  २४ हजार ३२९ अंकांवर बंद झाला.    सोनं आज तोळ्यामागे अडीच ...