राष्ट्रीय

May 12, 2025 2:55 PM

views 18

प्रधानमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्ली इथे उच्चस्तरीय बैठक

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्ली इथे उच्चस्तरीय बैठक होत आहे. या बैठकीला संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस. जयशंकर, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल, संरक्षण दल प्रमुख जनरल अनिल चौहान, तिन्ही सशस्त्र दलांचे प्रमुख आणि अनेक वरिष्ठ अधिकारी या बै...

May 12, 2025 2:21 PM

views 28

गौरीकुंड इथून घोडे आणि खेचरावरुन होणारी प्रवासी वाहतूक पुन्हा सुरु

उत्तराखंडमधल्या केदारनाथ मार्गावर गौरीकुंड इथून घोडे आणि खेचरावरुन होणारी प्रवासी वाहतूक पुन्हा सुरु झाली आहे.   इन्फ्लुएंझा या आजारामुळे ही सेवा तात्पुरती बंद करण्यात आली होती. पशुतज्ञांनी सतराशेहून अधिक घोडे आणि खेचरांना वाहतूकीसाठी स्वस्थ घोषित केल्यानंतर ही सेवा सुरू झाली आहे.

May 12, 2025 2:15 PM

views 23

परदेशी गुंतवणूकदारांची भारतीय शेअर बाजारात गुंतवणूक

परदेशी गुंतवणूकदार संस्थांनी भारतीय शेअर बाजारात चालू महिन्यात १४ हजार कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक केली आहे. डिपॉझिटरीच्या आकडेवारीनुसार परदेशी गुंतवणूकदारांनी ९ मे पर्यंत शेअर बाजारात १४ हजार १६७ कोटी रुपयांची गुंतवणूक केली.    सोबतच या गुंतवणूकदारांनी ३ हजार ७२५ कोटी रुपये काढून घेतले आहेत. ...

May 12, 2025 1:38 PM

views 13

भारतातील ३२ विमानतळे आता नागरी उड्डाणासाठी सज्ज

भारत आणि पाकिस्तान यांच्यात निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर नागरी उड्डाणांसाठी बंद केलेली ३२ विमानतळं आता सुरू झाली आहेत. भारतीय विमानतळ प्राधिकरणानं आज पत्रकाद्वारे ही माहिती दिली. याबाबतची अद्ययावत माहिती मिळवण्यासाठी प्रवाशांनी थेट विमान कंपन्यांशी संपर्क साधावा, असंही प्राधिकरणानं सांगि...

May 12, 2025 1:30 PM

views 24

दहशतवादाविरुद्ध लढ्यासाठी प्रधानमंत्र्यांची जगभरातल्या २० राष्ट्रांच्या प्रमुखांशी थेट चर्चा

भारतानं ऑपरेशन सिंदुरच्या माध्यमातून संपूर्ण जगाला दहशतवादाविरुद्धच्या लढाईचा एक निर्णायक संदेश दिला आहे, असं भाजपानं म्हटलं आहे. भाजपाचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी आज नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत ही भूमिका स्पष्ट केली.   पाकिस्तानला एकटं पाडून दहशतवादाविरुद्धचा लढा अधिक तीव्र करण्यासाठी प्रधान...

May 12, 2025 1:27 PM

views 22

सीमा सुरक्षा दलाचे उपनिरीक्षक एम. डी. इम्तियाज यांचा मृतदेहावर आज अंत्यसंस्कार

 जम्मू काश्मीरच्या सीमावर्ती भागात, सीमेवर तसंच देशातल्या आंतरराष्ट्रीय सीमेवर काल रात्रीपासून आज पहाटेपर्यंत सर्वत्र शांतता होती, असं भारतीय लष्करानं म्हटलं आहे. पाकिस्तानकडून कुठेही हल्ले किंवा चिथावणीखोर हालचालींचं वृत्त नाही.   दरम्यान, गेल्या शनिवारी पाकिस्ताननं सीमेवर केलेल्या गोळीबारात, ...

May 12, 2025 1:03 PM

views 35

भारत-पाकिस्तान दरम्यान शस्त्रसंधी झाल्यानंतर आज भारतीय शेअर बाजारांमध्ये तेजी

भारत-पाकिस्तान दरम्यान शस्त्रसंधी झाल्यानंतर आज सकाळी भारतीय शेअर बाजारांमध्ये तेजी दिसून आली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स निर्देशांक २ हजारांहून अधिक अंकांनी वधारला तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीमध्येही ७००हून अधिक अंकांची वाढ दिसून आली.   परकीय गुंतवणूकदारांनी केलेली गुंतवणूक आणि जागति...

May 12, 2025 11:46 AM

views 26

देशात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज

देशात पश्चिम बंगाल आणि सिक्कीममधील काही ठिकाणी हवामान विभागानं मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. आसाम मेघालय आणि पंजाबमध्ये गारपीटीसह वादळी पावसाची शक्यता आहे.   मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातही आज तुरळक ठिकाणी जोराचे वारे आणि विजांसह पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आह...

May 12, 2025 11:40 AM

views 18

तिबेटमध्ये भूकंपाचा धक्का

भारताचा शेजारी देश तिबेटमध्ये भारतीय प्रमाणवेळेनुसार आज पहाटे पावणेतीनच्या सुमारास 5.7 रिख्टर स्केलचा भूकंपाचा धक्का बसल्याची नोंद झाली. यामध्ये आतापर्यंत जीवित किंवा वित्त हानी झाल्याचे वृत्त नाही. भारताच्या राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्रानुसार भूकंपाचे केंद्र जमिनीखाली 10 किलोमीटर खोल होते.

May 12, 2025 11:18 AM

views 5

एनडीएमएनं नागरिकांना सतर्कतेच्या सूचना जारी

देशातली सद्यपरिस्थिती लक्षात घेता राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण म्हणजेच एनडीएमएनं नागरिकांना सतर्कतेच्या सूचना जारी केल्या आहेत. समाज माध्यमांवरून दिलेल्या संदेशात नागरिकांनी कोणत्याही अज्ञात वस्तूला स्पर्श करु नये.   त्यामध्ये स्फोटक धोकायदायक पदार्थ असू शकतात. त्यामुळे लोकांना गंभीर द...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.