राष्ट्रीय

April 25, 2025 3:17 PM April 25, 2025 3:17 PM

views 16

पाकिस्तानी नागरिकांना परत पाठवण्यासाठी पावलं उचलण्याच्या केंद्रीय गृहमंत्र्यांच्या सूचना

पाकिस्तानी नागरिकांची ओळख पटवून त्यांना तात्काळ परत पाठवण्यासाठी पावलं उचलण्याच्या सूचना केंद्र सरकारनं सर्व राज्यांना केल्या आहेत.   केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन हा संदेश दिला. सिंधू जल कराराच्या संदर्भात अमित शहा संध्याकाळी बैठक घेणार आहेत. त्...

April 25, 2025 3:08 PM April 25, 2025 3:08 PM

views 13

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य न करण्याची न्यायालयाची राहुल गांधी यांना ताकीद

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्याबद्दल कुठलेही अवमानकारक वक्तव्य करु नका अशी ताकीद सर्वोच्च न्यायालयानं विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना दिली आहे. नोव्हेंबर २०२२ मध्ये भारत जोडो यात्रेदरम्यान अकोल्यात झालेल्या सभेत त्यांनी सावरकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं.   त्यासंदर्...

April 25, 2025 2:51 PM April 25, 2025 2:51 PM

views 4

प्रख्यात उद्योगपती कुमार मंगलम बिर्ला यांना लता मंगेशकर पुरस्कार प्रदान

प्रख्यात उद्योगपती कुमार मंगलम बिर्ला यांना काल लता मंगेशकर पुरस्कार प्रदान करण्यात आला. मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्या  ८३ व्या स्मृतिदिनानिमित्त मुंबईत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते काल हा समारंभ झाला.   यावेळी  श्रद्धा कपूर, सुनील शेट्टी, सचिन पिळगावकर, शरद पो...

April 25, 2025 2:41 PM April 25, 2025 2:41 PM

views 4

प्रधानमंत्री २७ एप्रिल रोजी ‘मन-की-बात’ कार्यक्रमातून नागरिकांशी साधणार संवाद

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या २७ एप्रिल रोजी आकाशवाणी वर ‘मन-की-बात’ कार्यक्रमाच्या माध्यमातून देश-विदेशातल्या नागरिकांशी संवाद साधणार आहेत. दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी सादर होणाऱ्या या कार्यक्रमाचा हा १२१ वा भाग असेल.   नागरिकांनी त्यांचे विचार आणि सूचना १८००-११-७८०० या टोल फ्री क्रमांक...

April 25, 2025 2:36 PM April 25, 2025 2:36 PM

views 2

आजपासून दुसरी आशियाई योगासन विजेतेपद स्पर्धा सुरू

नवी दिल्लीतल्या इंदिरा गांधी इन्डोअर स्टेडियमवर आजपासून दुसरी आशियाई योगासन विजेतेपद स्पर्धा सुरू होत आहे. तीन दिवस म्हणजे २७ तारखेपर्यंत चालणाऱ्या या स्पर्धेत २१ आशियाई देशांमधले १७० हून अधिक योगपटू सहभागी होणार आहेत. योगासनांचा जागतिक पातळीवर स्पर्धात्मक क्रीडा प्रकार म्हणून प्रसार करण्याच्या सरका...

April 25, 2025 2:33 PM April 25, 2025 2:33 PM

views 6

सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना मानहानी प्रकरणी अटक

सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्लीचे नायब राज्यपाल विनय कुमार सक्सेना मानहानी प्रकरणी दिल्ली पोलिसांनी आज दिल्लीच्या निजामुद्दीन भागातून अटक केली. न्यायालयानं दिलेल्या आदेशांचं पालन न केल्यामुळे दिल्लीतल्या एका न्यायालयानं दोन दिवसांपूर्वी त्यांच्या नावे अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केलं होत...

April 25, 2025 2:29 PM April 25, 2025 2:29 PM

views 4

भारतीय विमान कंपन्यांना पाकिस्तानच्या हवाई क्षेत्राचा वापर करण्यास बंदी

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत - पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, भारतीय विमान कंपन्यांना पाकिस्तानच्या हवाई क्षेत्राचा वापर करण्यास बंदी घालणार असल्याचं पाकिस्ताननं म्हटलं आहे.   त्यामुळे भारतातील नोंदणीकृत विमानं तसंच भारतीय कंपन्यांच्या मालकीची किंवा भाडेतत्त्वावर घेतलेली विम...

April 25, 2025 1:35 PM April 25, 2025 1:35 PM

views 6

पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्याला ६० लाख रुपयांचे बक्षीस जाहीर

पहलगाम दहशतवादी हल्ल्याशी संबंध असलेल्या लष्कर - ए - तैय्यबाच्या तीन दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना एकूण ६० लाख रुपयांचं बक्षीस पोलिसांनी जाहीर केलं आहे. या दहशतवाद्यांवर प्रत्येकी वीस लाखांचं इनाम पोलिसांनी ठेवलं आहे. पोलिसांनी तिन्ही संशयित हल्लेखोरांची रेखाचित्रं जारी केली आहेत.   लष्करप्र...

April 25, 2025 3:30 PM April 25, 2025 3:30 PM

views 5

काश्मीरमध्ये गेलेले महाराष्ट्रातले ८०० पर्यटक सुखरूप परतले

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर गेल्या २ दिवसात महाराष्ट्रातले सुमारे ८०० पर्यटक राज्यात सुखरूप परतले आहेत. राज्य सरकारनं या पर्यटकांसाठी दोन विशेष विमानांची व्यवस्था केली होती, त्यातून १८४ पर्यटक काल मुंबईत दाखल झाले.   आणखी २३२ प्रवाशांसाठी आज एका विशेष विमानाची व्यवस्था राज्य सरकारनं केली आहे. क...

April 25, 2025 1:23 PM April 25, 2025 1:23 PM

views 8

पोप फ्रान्सिस यांच्या अंत्यसंस्कार कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी राष्ट्रपती व्हॅटिकन सिटीच्या दौऱ्यावर

पोप फ्रान्सिस यांच्या अंत्यसंस्कारात सहभागी होण्यासाठी आणि भारत सरकार आणि जनतेच्या वतीने शोक व्यक्त करण्यासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून दोन दिवसांच्या व्हॅटिकन सिटी दौऱ्यावर रवाना झाल्या. केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री किरेन रिजिजू आणि राज्यमंत्री जॉर्ज कुरियन तसंच गोवा विधानसभेचे उपाध्यक्ष जो...

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.