राष्ट्रीय

April 28, 2025 8:31 PM April 28, 2025 8:31 PM

views 13

पुस्तकं आणि अभ्यासाचं साहित्य वाजवी दरात पाठवण्यासाठी टपाल विभागाची विशेष सुविधा

देशभरात पुस्तकं आणि अभ्यासाचं साहित्य वाजवी दरात टपालाने पाठवता यावं याकरता ज्ञान पोस्ट ही नवीन सेवा सुरु होणार आहे. केंद्रीय दूरसंवाद मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी आज नवी दिल्लीत पत्रकारपरिषदेत ही माहिती दिली. येत्या १ मे पासून ही सेवा सुरु होणार असून त्यात टपालाने पाठवलेल्या साहित्याचा माग काढण...

April 28, 2025 8:24 PM April 28, 2025 8:24 PM

views 14

अहमदाबादमधे अवैधरित्या राहणारे ४०० बांगलादेशी संशयित ताब्यात

पहलगाम इथल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर गुजरातमधे अवैधरित्या राहणाऱ्या बांगलादेशी नागरिकांचा शोध घेण्यासाठी व्यापक शोधमोहीम राबवली जात आहे. अहमदाबादमधे अवैधरित्या राहणाऱ्या चारशे संशयितांना पकडण्यात आलं आहे.  शहरातले बेकायदेशीर बांधकामं पाडण्याचे आणि बेकायदेशीर वीज जोडणी तोडण्याचे आदेश अहमद...

April 28, 2025 8:20 PM April 28, 2025 8:20 PM

views 3

छत्तीसगडमध्ये २४ माओवाद्यांचं आत्मसमर्पण

छत्तीसगडमधल्या बिजापूर जिल्ह्यातल्या चोवीस माओवाद्यांनी आज आत्मसमर्पण केलं. यातल्या १४ जणांवर २८ लाख ५० हजार रुपयांचे इनाम जाहीर करण्यात आले होते. सरकारच्या पुनर्वसन योजनेनुसार आत्मसमर्पण केलेल्या माओवाद्यांना प्रत्येकी ५० हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला. या वर्षात बिजापूर जिल्ह्यातल्या दोन हजार मा...

April 28, 2025 8:47 PM April 28, 2025 8:47 PM

views 9

J&K Assembly : पहलगाम हल्ल्याचा निषेध करणारा ठराव अधिवेशनात मंजूर

पहलगाम हल्ल्याचा कठोर शब्दात निषेध करणारा ठराव आज जम्मू - काश्मीर विधानसभेने विशेष अधिवेशनात मंजूर केला. या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळाच्या विनंतीवरुन नायब राज्यपालांनी हे अधिवेशन बोलावलं होतं. हा अतिशय क्रूर, निर्घृण, अमानुष आणि भ्याड हल्ला काश्मीरियतवर, तसंच संविधानाच्या एकता, शांती आणि ...

April 28, 2025 3:23 PM April 28, 2025 3:23 PM

मध्य प्रदेशातल्या एकूण चित्त्यांची संख्या आता ३१ वर

भोपाळच्या कुनो राष्ट्रीय अभयारण्यात काल चित्त्याच्या पाच बछड्यांचा जन्म झाल्यामुळे मध्य प्रदेशातल्या एकूण चित्त्यांची संख्या आता ३१ झाली आहे. मुख्यमंत्री मोहन यादव यांनी समाजमाध्यमांवर ही माहिती प्रसारित केली आहे. दक्षिण आफ्रिकेतून २०२२ साली मध्य प्रदेशात आणलेल्या नीरवा नावाच्या  चित्ता मादीने काल द...

April 28, 2025 7:11 PM April 28, 2025 7:11 PM

views 7

मत्स्य उत्पादनात मूल्यवर्धन करणं आणि पायाभूत सुविधा बळकट करणं गरजेचं – मंत्री राजीव रंजन सिंह

देशाची मत्स्योत्पादन निर्यात दुप्पट करायचं ध्येय सरकारनं ठेवलं आहे. त्यासाठी मत्स्य उत्पादनात मूल्यवर्धन करणं आणि पायाभूत सुविधा बळकट करणं अतिशय गरजेचं असल्याचं मत केंद्रीय मत्स्यव्यवसाय आणि पशुपालन मंत्री राजीव रंजन सिंह यांनी आज मांडलं. सध्या ही निर्यात ६० हजार ५२४ कोटी रुपये इतकी आहे. अमेरिकेनं अ...

April 28, 2025 3:03 PM April 28, 2025 3:03 PM

views 3

पहलगाम हल्ल्यानंतर तात्पुरत्या व्हिजावर राहणाऱ्या १७ पाकिस्तानी नागरिकांना परत पाठवलं

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर तात्पुरत्या व्हिजावर राहणाऱ्या १७ पाकिस्तानी नागरिकांना मुंबई पोलिसांनी परत पाठवलं आहे. हे सर्वजण पर्यटक आणि वैद्यकीय व्हिजावर आले होते. यापैकी ज्यांच्यावर उपचार सुरू आहेत, त्यांना परतण्यासाठीची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी २९ एप्रिलपर्यंतचा वेळ देण्यात आली आहे. ठाणे पोलीस ...

April 28, 2025 2:56 PM April 28, 2025 2:56 PM

views 5

भारत सरकारने १६ पाकिस्तानी यूट्यूब वाहिन्यांवर घातली बंदी

पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने १६ पाकिस्तानी यू ट्यूब वाहिन्यांवर बंदी घातली आहे. डॉन न्यूज, एरी न्यूज, आणि जिओ न्यूज या वाहिन्यांचा समावेश आहे. भारत, भारतीय सैन्य आणि सुरक्षा यंत्रणांबद्दल प्रक्षोभक, खोटी आणि दिशाभूल करणारी माहिती प्रसारित केल्याबद्दल ही कारवाई करण्यात आली. ...

April 28, 2025 2:55 PM April 28, 2025 2:55 PM

views 3

राफेल मरीन प्रकारच्या २६ लढाऊ विमानांच्या खरेदीसाठी आज भारताचा फ्रान्सबरोबर संरक्षण करार

केंद्र सरकार राफेल मरीन प्रकारच्या २६ लढाऊ विमानांची खरेदी करणार असून त्यासाठी आज फ्रान्सबरोबर संरक्षण करार होणार आहे. संरक्षण मंत्रालयाचे अधिकारी आणि भारतातले फ्रेंच राजदूत यांच्या उपस्थितीत संरक्षण करारावर स्वाक्षऱ्या होतील.   भारताचे संरक्षण सचिव राजेश कुमार सिंह हे भारताचं प्रतिनिधित्व करती...

April 28, 2025 1:35 PM April 28, 2025 1:35 PM

views 6

आशियाई योगासन अजिंक्यपद स्पर्धांमध्ये भारताची 83 सुवर्ण पदकांची कमाई

दिल्लीमध्ये काल झालेल्या आशियाई योगासन अजिंक्यपद स्पर्धांमध्ये भारतानं निर्विवाद वर्चस्व राखत ८३ सुवर्ण पदकांची कमाई केली. दुसरं स्थान मिळवणाऱ्या जपानच्या खात्यात ३ सुवर्ण, ३ रौप्य आणि ४ कास्यपदकं जमा झाली. मोंगोलिया, ओमान आणि नेपाळच्या संघांनी पहिल्या पाचात स्थान मिळवलं. २१ देशांनी या स्पर्धेत सहभा...

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.