डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

भारत सरकारने १६ पाकिस्तानी यूट्यूब वाहिन्यांवर घातली बंदी

पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने १६ पाकिस्तानी यू ट्यूब वाहिन्यांवर बंदी घातली आहे. डॉन न्यूज, एरी न्यूज, आणि जिओ न्यूज या वाहिन्यांचा समावेश आहे. भारत, भारतीय सैन्य आणि सुरक्षा यंत्रणांबद्दल प्रक्षोभक, खोटी आणि दिशाभूल करणारी माहिती प्रसारित केल्याबद्दल ही कारवाई करण्यात आली. या वाहिन्यांचे एकूण सहा कोटीहून अधिक नोंदणीकृत प्रेक्षक आहेत.

 

दरम्यान, पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत बीबीसीच्या वार्तांकनावरही सरकारने आक्षेप घेतला आहे. बीबीसीच्या बातम्यांमधे पहलगामच्या हल्लेखोरांचा उल्लेख टेररिस्ट दहशतवादी असा न करता मिलिटन्ट्स म्हणजे सशस्त्र क्रांतिकारक असा करण्यात आला होता. तो बदलून  या दहशतवाद्यांना दहशतवादी असं संबोधलं जावं, अशा आशयाचं पत्र केंद्रसरकारने बीबीसीच्या प्रमुखांना पाठवलं आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा