राष्ट्रीय

December 31, 2025 3:21 PM

views 49

मुंबईची काम्या कार्तिकेयन ठरली दक्षिण ध्रुवावर स्कीईंग करणारी सर्वात तरुण भारतीय

  मुंबईच्या काम्या कार्तिकेयन या तरुणीनं दक्षिण ध्रुवावर स्कीईंग करणारी सर्वात तरुण भारतीय होण्याचा विक्रम केला आहे. जागतिक पातळीवर ती दुसरी सर्वात कमी वयाची तरुणी आहे. उणे ३० डिग्री सेल्सियस तपमानात तिने दक्षिण ध्रुवावर सुमारे ११५ किलोमीटर स्कीईंग केलं. शनिवारी तिने हा विक्रम केल्याची माहिती भारतीय...

December 31, 2025 3:13 PM

views 14

अयोध्येत श्रीराममूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेच्या दुसऱ्या वर्धापनदिनानिमित्त संरक्षणमंत्री राजनाथ सिंह सहभागी

अयोध्येत श्रीराममूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेच्या दुसऱ्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित धार्मिक अनुष्ठानात संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आज सहभागी झाले तसंच त्यांच्या हस्ते राममंदिर संकुलातल्या अन्नपूर्णा देवीच्या मंदिरावर धर्मध्वजा फडकवण्यात आली. यावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ देखील उपस्थित ह...

December 31, 2025 2:57 PM

views 26

प्रधानमंत्री युवा योजनेच्या तिसऱ्या टप्प्यातल्या विजेत्यांची घोषणा

युवा लेखकांच्या प्रतिभेला प्रोत्साहन देण्यासाठी सुरु केलेल्या प्रधानमंत्री युवा योजनेच्या तिसऱ्या टप्प्यातल्या विजेत्यांची घोषणा काल करण्यात आली. इंग्रजीसह एकंदर २२ भारतीय भाषांमधल्या ४३ विजेत्यांचा यात समावेश आहे. मराठीसाठी दिव्यांशू सिंग, अंबादास मेव्हाणकर आणि प्रसाद जाधव या लेखकांचा विजेत्यांमध्य...

December 31, 2025 2:45 PM

views 19

ओएनडीसी उपक्रमामुळे देशाच्या ई-कॉमर्स क्षेत्रात बदल – मंत्री पियूष गोयल

ओएनडीसी अर्थात ओपन नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्स या उपक्रमाने देशातल्या डिजिटल व्यापाराचं सार्वत्रिकीकरण करून देशाच्या ई-कॉमर्स क्षेत्रात बदल घडवून आणत असल्याचं वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियूष गोयल यांनी समाज माध्यमावर म्हटलं आहे. गेल्या चार वर्षात ओएनडीसीने मुक्त सहभाग आणि नावीन्यपूर्ण संकल्पना तसंच सह...

December 31, 2025 2:33 PM

views 24

अतिवेगवान वंदे भारत स्लीपर रेल्वेगाडीची चाचणी यशस्वी

स्वदेशी बनावटीच्या वंदे भारत स्लीपर ट्रेनची हायस्पीड चाचणी पूर्ण झाली असून ही ट्रेन सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. कोटा-नागदा विभागात ही चाचणी घेण्यात आली असून यावेळी ट्रेन १८० किलोमीटर प्रति तास वेगानं धावली. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी या चाचणीची चित्रफित समाजमाध्यमावर पोस्ट केली.

December 31, 2025 2:34 PM

views 30

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचं दहावी आणि बारावीच्या परीक्षांचं सुधारित वेळापत्रक जाहीर

सीबीएसई अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी आणि बारावीच्या परीक्षांचं सुधारित वेळापत्रक जाहीर केलं आहे. दहावीची परीक्षा पुढच्या वर्षी ११ मार्चपासून सुरू होईल. तर बारावीच्या परीक्षेची तारीख १० एप्रिल असेल. यापूर्वी या दोन्ही परीक्षा ३ मार्च रोजी होणार होत्या. प्रशासकीय कारणांमुळे वेळापत्रका...

December 31, 2025 2:31 PM

views 43

परीक्षा पे चर्चा उपक्रमात सहभागी होण्यासाठी तीन कोटींहून अधिक जणांची नोंदणी

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून राबवण्यात आलेल्या परीक्षा पे चर्चा या उपक्रमाने ऐतिहासिक टप्पा ओलांडला आहे. परीक्षा पे चर्चा या उपक्रमात सहभागी होण्यासाठी देशभरातून कालपर्यंत तीन कोटींहून अधिक जणांनी नोंदणी केली आहे. देशभरातले विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांनी यात सहभाग घेतला आहे. विद्या...

December 31, 2025 12:49 PM

views 24

भारतीय रेल्वेचं सकलेशपूर-सुब्रमण्य रोड घाट विभागाचं विद्युतीकरण पूर्ण

भारतीय रेल्वेनं सकलेशपूर-सुब्रमण्य रोड घाट विभागाचं विद्युतीकरण पूर्ण करून एक मोठा अभियांत्रिकी टप्पा गाठला आहे. हा विभाग भारतीय रेल्वेमार्गावरील सर्वात कठीण आणि तांत्रिकदृष्ट्या आव्हानात्मक भूभागांपैकी एक आहे. रेल्वे मंत्रालयाने म्हटले आहे की, या प्रकल्पामुळे या प्रदेशात रेल्वे जोडणी, कार्यक्षमता त...

December 30, 2025 8:38 PM

views 16

भारतीय महिलांकडून श्रीलंकेला १७६ धावांचं आव्हान

श्रीलंकेविरुद्धच्या टी-ट्वेंटी मालिकेतल्या अखेरच्या सामन्यात भारतीय महिला संघानं श्रीलंकेसमोर विजयासाठी १७६ धावांचं आव्हान ठेवलं आहे. तिरुवनंतपुरममध्ये सुरू असलेल्या या सामन्यात नाणेफेक जिंकून श्रीलंकेनं क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. भारतीय डावाची सुरुवात खराब झाली. दुसऱ्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर...

December 30, 2025 8:21 PM

views 71

२०४७ मधला विकसित भारत हीच भारताची धोरणप्रक्रिया आणि अर्थसंकल्पाची दिशा असायला हवी – प्रधानमंत्री

२०४७ मध्ये भारताला विकसित करण्याचं उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवूनच  भारताची धोरणप्रक्रिया आणि अर्थसंकल्पाची दिशा असली पाहिजे असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं. नवी दिल्लीत अर्थसंकल्पपूर्व बैठकीत अर्थतज्ञ आणि इतर क्षेत्रातल्या तज्ञांना ते संबोधित करत होते. विकसित भारतासाठी आत्मनिर्भरता...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.