राष्ट्रीय

June 2, 2025 3:05 PM June 2, 2025 3:05 PM

views 6

प्रधानमंत्री आणि पॅराग्वेचे अध्यक्ष सँटियागो यांच्याशी शिष्टमंडळ स्तरावरील चर्चा

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि पॅराग्वेचे अध्यक्ष सॅंटियागो पेना पॅलासिओस यांच्यात नवी दिल्ली येथे शिष्टमंडळ स्तरावरील चर्चा झाली. या भेटीदरम्यान दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय संबंधांच्या संपूर्ण क्षेत्रांचा आढावा घेतला. दोन्ही देशांमध्ये डिजिटल तंत्रज्ञान, शेती, संरक्षण, रेल्वे, अंतराळ यासह इतर क्षेत्...

June 2, 2025 1:28 PM June 2, 2025 1:28 PM

views 11

सरकार नाथूला मार्गे कैलास मानसरोवर यात्रा सुरु करण्यासाठी सज्ज

सरकार ५ वर्षानंतर नाथू ला मार्गे कैलास मानसरोवर यात्रा सुरु करण्यासाठी सज्ज आहे. यात्रेकरूंचा पहिला गट १५ जूनला गंगटोक इथं दाखल होईल. यात्रेकरूंचे १० गट यात्रेला जाणार असून प्रत्येक गटात ४८ यात्रेकरू असतील. सुमारे २१ दिवसांच्या प्रवासानंतर हे गट मानसरोवरला पोहोचतील. यात्रेसाठी रवाना होण्यापूर्वी हे ...

June 2, 2025 1:36 PM June 2, 2025 1:36 PM

views 11

सिक्किममध्ये भूस्खलनामुळे दीड हजार पर्यटकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात यश

सिक्कीमच्या लाचुंगमधून १ हजार सहाशे अठ्ठ्याहत्तर पर्यटकांना सुरक्षितपणे हलवण्यात आलं आहे. २९मेला झालेल्या ढगफुटी आणि धुवांधार पावसामुळे पर्यटक अडकले होते. लाचेन, लाचुंग, गुरुडोंगमार, फूल व्हॅली आणि झिरो पॉइंटसारख्या ठिकाणांचं मोठ नुकसान झालं आहे. भूस्खलन आणि पूल कोसळण्यामुळे डिकचु-संकलांग-शिपग्येर, ...

June 2, 2025 12:07 PM June 2, 2025 12:07 PM

views 13

सात बहुपक्षीय प्रतिनिधिमंडळाच्या वेगवेगळ्या देशांना भेटी

विविध देशांमध्ये गेलेल्या बहुपक्षीय शिष्टमंडळांपैकी, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखालचं शिष्टमंडळ इजिप्तची राजधानी कैरो मध्ये दाखल झालं.   भाजपा नेते रविशंकर प्रसाद यांच्या नेतृत्वाखालचं  शिष्टमंडळ  फ्रांस, इटली आणि डेन्मार्कचा दौरा आटोपून लं...

June 2, 2025 11:52 AM June 2, 2025 11:52 AM

views 13

ईशान्येकडील राज्यांत मुसळधार पावसामुळे पूरस्थिती गंभीर

ईशान्येकडील राज्यांत मुसळधार पावसामुळे पूरस्थिती गंभीर झाली आहे. त्रिपुरा, मणिपूर, सिक्कीममध्ये रस्ते जलमय झाले आहेत तर आसाममध्ये ब्रह्मपुत्रा आणि तिस्ता नद्यांच्या पाणी  पातळीत वाढ झाली आहे. एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि भारतीय सैन्याकडून सतत मदत आणि बचाव कार्य सुरु आहे. गृहमंत्री अमित शहा यांनी आसाम, सिक...

June 2, 2025 3:56 PM June 2, 2025 3:56 PM

views 8

जेईई ॲडव्हान्स्ड परीक्षेचा निकाल जाहीर

भारतीय तंत्रशास्त्र संस्था-इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी कानपूरचा पदवीपूर्व अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीच्या संयुक्त प्रवेश परीक्षा - जेईई अॅडव्हान्स्ड परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. result25.jeeadv.ac.in या वेबसाइटवर निकाल पाहता येईल. जेईई अॅडव्हान्स्ड ही इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आणि इ...

June 2, 2025 1:39 PM June 2, 2025 1:39 PM

views 16

विकसित भारतासाठी विकसित शेती आणि समृद्ध शेतकरी असणं आवश्यक-शिवराजसिंह चौहान

विकसित भारताचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी विकसित शेती आणि समृद्ध शेतकरी असणं आवश्यक आहे, असं प्रतिपादन केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी केलं. बिहारमधल्या मोतिहारी इथं शेतकऱ्यांचं जीवनमान उंचावण्याबाबत आयोजित केलेल्या चर्चेत ते आज बोलत होते. देशभरात १६ हजार शास्त्रज्ञ थेट शेतकऱ्यांशी संवाद ...

June 1, 2025 6:53 PM June 1, 2025 6:53 PM

views 16

येत्या निवडणुकीत पश्चिम बंगालमधे भारतीय जनता पक्षाचं सरकार स्थापन होईल-गृहमंत्री

२०२६ च्या विधानसभा निवडणुकीत पश्चिम बंगालमधे भारतीय जनता पक्षाचं सरकार स्थापन होईल, असा विश्वास केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी व्यक्त केला आहे. ते कोलकाता इथं आयोजित  सभेला संबोधित करत होते. तृणमूल काँग्रेसच्या नेतृत्त्वाखालच्या राज्य सरकारवर शहा यांनी यावेळी जोरदार टीका केली. या सरकारच्या काळात ...

June 1, 2025 6:39 PM June 1, 2025 6:39 PM

views 9

प्रधानमंत्री आणि आशियाई विकास बँकेचे अध्यक्ष मसातो कांडा यांची भेट

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज आशियाई विकास बँकेचे अध्यक्ष मसातो कांडा यांची नवी दिल्ली इथे भेट घेतली. या भेटीविषयी समाज माध्यमावरच्या पोस्टमध्ये प्रधानमंत्री म्हणाले की, गेल्या दशकात भारताच्या जलद परिवर्तनामुळे असंख्य लोक सक्षम झाले असून या प्रगतीचा वेग वाढवण्याच्या दृष्टीने आपण प्रयत्नशील आहोत...

June 1, 2025 6:14 PM June 1, 2025 6:14 PM

views 75

ऑपरेशन सिंदूर अंतर्गत निबंध स्पर्धांच आयोजन

भारताच्या ७८ व्या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्तानं संरक्षण मंत्रालय आणि माय जी.ओ.व्ही. इंडिया या संकेतस्थळानं संयुक्तपणे देशभरातल्या युवा वर्गासाठी विविध स्पर्धांचं आयोजन केलं आहे. आजपासून या स्पर्धेला सुरुवात झाली.    याअंतर्गत ऑपरेशन सिंदूर - दहशतवादाविरोधातल्या भारताच्या धोरणाची नवी परिभाषा या...