राष्ट्रीय

November 30, 2025 7:40 PM November 30, 2025 7:40 PM

views 156

राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी स्वीकारला पदभार

राज्याचे मुख्यसचिव म्हणून आज राजेश अग्रवाल यांनी आज कार्यभार स्वीकारला. ते १९८९च्या आयएस सेवेतले महाराष्ट्र केडरचे अधिकारी आहेत. 

November 30, 2025 3:13 PM November 30, 2025 3:13 PM

views 5

एअर बस कंपनीच्या ३३८ विमानांपैकी ३२३ विमानांच्या सॉफ्टवेअरचं अद्ययावतीकरण पूर्ण

एअर बस कंपनीच्या ३३८ विमानांपैकी ३२३ विमानांच्या सॉफ्टवेअरचं अद्ययावतीकरण पूर्ण झालं असल्याची  माहिती नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयानं दिली आहे. अद्ययावतीकरण झालेली विमानं इंडिगो, एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्सप्रेस या विमान कंपन्यांची असल्याचं त्यांनी कळवलं आहे. एअरबस थ्री ट्वेंटी प्रकारातल्या विम...

November 30, 2025 2:21 PM November 30, 2025 2:21 PM

views 15

मतदारयाद्या पुनर्रिक्षणाची मुदत वाढली

मतदारयाद्या  पुनर्रिक्षणाची मुदत केंद्रीय आयोगाने आठवडाभराने वाढवली आहे. ९ राज्य आणि ३ केंद्रशासित प्रदेशांमधे सध्या ही प्रक्रीया सुरु आहे. सुधारित अधिसूचनेनुसार मतदारयादीत नाव नोंदणीसाठी ११ डिसेंबरपर्यंत अर्ज करता येईल. प्रारूप मतदार याद्या १६ डिसेंबरला प्रसिद्ध होतील. पुढच्या वर्षी १४ फेब्रुवारीला...

November 30, 2025 2:09 PM November 30, 2025 2:09 PM

views 18

संसदेच्या हिवाळी अधिवेशनात कामकाज सुरळीत चालवण्यासाठी सहकार्य करण्याचं सरकारचं विरोधी पक्षांना आवाहन

संसदेचं हिवाळी अधिवेशन उद्यापासून सुरु होत असून त्या पार्श्वभूमीवर  सरकारने आज सकाळी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती.  या अधिवेशनात  मतदार पुनरिक्षण, दिल्ली बाँम्बस्फोट तसंच परराष्ट्र संबधांबद्दल विरोधी पक्ष प्रश्न उपस्थित करतील अशी शक्यता आहे. अधिवेशनात अनेक नवीन विधेयके आणली जाणार आहेत, या पार्श्वभूम...

November 29, 2025 7:03 PM November 29, 2025 7:03 PM

views 11

प्रधानमंत्री मोदी उद्या मन की बातमधून संवाद साधणार

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या रविवारी सकाळी ११ वाजता आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या मालिकेचा हा १२८वा भाग असेल. हा कार्यक्रम आकाशवाणी आणि दूरदर्शन नेटवर्क, वेबसाइट तसंच न्यूजऑनएयर मोबाइल ॲपवर प्रसारित केला जाईल.

November 29, 2025 7:00 PM November 29, 2025 7:00 PM

views 38

केवळ सव्वा ३ लाख शेतकऱ्यांनी घेतला रब्बी हंगामासाठी पीक वीमा

रब्बी हंगामातील पीक विम्यासाठी आत्तापर्यंत केवळ ३ लाख २६ हजार १६८ शेतकऱ्यांनी २ लाख ६ हजार ९९५ हेक्टर क्षेत्राचा विमा उतरवला आहे. गेल्या वर्षी सुमारे ५५ लाख शेतकऱ्यांनी हा विमा उतरवला होता. राज्यातील विमा उतरवलेल्या क्षेत्राची एकंदर विमा रक्कम ८२० कोटी रुपये आहे. कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार परभणी ...

November 30, 2025 10:47 AM November 30, 2025 10:47 AM

views 15

हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय बैठक

संसदेचं हिवाळी अधिवेशन उद्यापासून  सुरू होत असून  त्या पार्श्वभूमीवर सरकारनं आज  सर्वपक्षीय बैठक बोलवली आहे .यावेळी संसदीय कामकाज  मंत्री किरेन रीजिजू लोकसभा आणि राज्यसभेतल्या सर्व पक्षांच्या नेत्यांशी चर्चा करणार आहेत. या हिवाळी अधिवेशनाचं कामकाज सुरळीत चालावं यासाठी सरकार सर्व पक्षाच्या सदस्यांना ...

November 29, 2025 3:11 PM November 29, 2025 3:11 PM

views 12

कुख्यात गँगस्टर अनमोल बिश्णोईच्या एनआयए कोठडीत वाढ

दिल्लीतल्या विशेष न्यायालयानं कुख्यात गँगस्टर अनमोल बिश्णोईच्या एनआयए कोठडीत ७ दिवसांची वाढ केली आहे. अमेरिकेतून प्रत्यार्पण झाल्यानंतर तो ११ दिवसांच्या एनआयए कोठडीत होता. आता त्याची कोठडी ५ डिसेंबर पर्यंत वाढली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांची हत्या, अभिनेता सलमान खानच्या घरावर ...

November 29, 2025 1:34 PM November 29, 2025 1:34 PM

views 22

IMOच्या परिषदेवर भारताची पुन्हा निवड

२०२६-२७ साठी आंतरराष्ट्रीय सागरी संघटना अर्थात IMO च्या परिषदेवर भारताची पुन्हा निवड झाली आहे. काल लंडन इथं झालेल्या IMO असेम्ब्लीच्या ३४व्या सत्रादरम्यान परिषदेच्या निवडणुका घेण्यात आल्या. आंतरराष्ट्रीय सागरी व्यापारात सर्वाधिक सहभाग असलेल्या दहा देशांच्या श्रेणीमध्ये भारताला सर्वाधिक म्हणजे १६९ वै...

November 29, 2025 1:31 PM November 29, 2025 1:31 PM

views 13

केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळाच्या अध्यक्षपदी महसूल सेवेतले ज्येष्ठ अधिकारी विवेक चतुर्वेदी यांची नेमणूक

केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळाच्या अध्यक्षपदी महसूल सेवेतले ज्येष्ठ अधिकारी विवेक चतुर्वेदी यांची नेमणूक झाली आहे. ते१९९०च्या तुकडीतले अधिकारी असून  यापूर्वी त्यांनी महसूल गुप्तवार्ता संचालनालयात विविध पदांवर काम केलं आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने चतुर्वेदी यांच्या नेमणु...

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.