मनोरंजन

December 20, 2025 3:38 PM December 20, 2025 3:38 PM

views 9

ज्येष्ठ अभिनेते श्रीनिवासन यांचं निधन

मल्याळी चित्रपटसृष्टीतले ज्येष्ठ अभिनेते, पटकथा लेखक आणि दिग्दर्शक श्रीनिवासन यांचं आज सकाळी कोची इथं दीर्घ आजारानं निधन झालं. ते ६९ वर्षांचे होते. १९७६ साली ‘मणीमुझक्कम’ या चित्रपटातून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात करणाऱ्या श्रीनिवासन यांनी मोहनलाल आणि ममूठी सारख्या अभिनेत्यां सोबत अनेक चित्रपटा...

December 17, 2025 1:29 PM December 17, 2025 1:29 PM

views 17

Oscars 2026: निवडक १५ चित्रपटांमधे ‘होमबाऊंड’ चित्रपटाचा समावेश

ऑस्कर २०२६ अर्थात ९८व्या अकॅडेमी पारितोषिकांसाठीच्या अंतिम फेरीत होमबाऊंड  हा भारतीय चित्रपट प्राथमिक फेरी पार करून निवडक  पंधरा चित्रपटांच्या यादीत पोचला आहे.  नीरज घायवान दिग्दर्शित  हा  भारतीय चित्रपट आंतरराष्ट्रीय चित्रपटाच्या  श्रेणीत  आहे.  या यादीतल्या चित्रपटांचं अंतिम नामांकन २२ जानेवारीला ...

December 4, 2025 7:50 PM December 4, 2025 7:50 PM

views 274

६४व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेचे निकाल जाहीर

६४व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेचे विविध विभागांमधले निकाल जाहीर झाले आहेत. या स्पर्धेत मुंबई केंद्रातून ‘ती, ती आणि ती’ या नाटकाला प्रथम पारितोषिक जाहीर झालं आहे. नाशिक केंद्रातून ‘काळाच्या पंजातून’ या नाटकाला, सांगली केंद्रातून ‘तिचे संदर्भ नसलेली गोष्ट’ या नाटकाला तर लातूर विभागात...

December 1, 2025 8:37 PM December 1, 2025 8:37 PM

views 22

नागालँडमध्ये हॉर्नबिल महोत्सवाला सुरुवात

नागालँडची राजधानी कोहिमा इथल्या किसामा इथं आज २६व्या हॉर्नबिल महोत्सवाची सुरुवात झाली. नागालँडचे गव्हर्नर अजय कुमार भल्ला, मुख्यमंत्री नेईफिऊ रिओ यांनी महोत्सवाचा औपचारिक प्रारंभ केला. नागालँडच्या राज्यदिनाबरोबरच सुरू होणाऱ्या या १० दिवसांच्या महोत्सवात विविध नागा समुदाय एकत्र येऊन परंपरा, लोककला, स...

December 1, 2025 3:14 PM December 1, 2025 3:14 PM

views 9

मुंबईत सीआयआय बिग पिक्चर समिटचं आयोजन…

देशातल्या मनोरंजन आणि माध्यम जगात खूप क्षमता आहे. त्यांचा सुयोग्य वापर होण्याची गरज केंद्रीय माहिती प्रसारण सचिव संजय जाजू यांनी आज व्यक्त केली. मुंबईत सीआयआय बिग पिक्चर समिटमध्ये ते बोलत होते. जागतिक बाजारपेठेत भारताची हिस्सेदारी केवळ २ टक्के आहे. यासंधीचा लाभ घेण्याचं आवाहन त्यांनी उद्योगाला केलं....

November 29, 2025 6:27 PM November 29, 2025 6:27 PM

views 19

भारतातल्या क्रिएटर्ससाठी ५ नव्या भारतीय भाषांचा समावेश

मुंबईत झालेल्या ‘हाऊस ऑफ इंस्टाग्राम’ कार्यक्रमात मेटा प्लॅटफॉर्म्स कंपनीनं भारतातल्या क्रिएटर्ससाठी ५ नव्या भारतीय भाषांचा समावेश केला आहे.  यामुळे इंस्टाग्राम, फेसबुकवरील क्रिएटर्स लवकरच त्यांच्या रील्सचे बंगाली, मराठी, तेलुगु, कन्नड आणि तमिळ या भाषांमधे भाषांतर करू शकतील.  यासाठी एआय-आधारित ऑटोमॅ...

November 29, 2025 2:46 PM November 29, 2025 2:46 PM

views 8

इफ्फी महोत्सवाची रंगतदार सोहळ्यानं सांगता

५६ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची काल एका रंगतदार सोहळ्यानं सांगता झाली. पणजीमधे गेले ९ दिवस चाललेला सोहळा रसिकांसाठी पर्वणी ठरला.  दिग्दर्शन अॅश मेफेअर दिग्दर्शित, व्हिएतनामच्या स्किन ऑफ यूथ या चित्रपटानं या महोत्सवाचा मुकुटमणी असलेल्या सूवर्ण मयूर पुरस्कारावर आपलं नाव कोरलं.   ग...

November 28, 2025 9:02 PM November 28, 2025 9:02 PM

views 85

IFFI 2025: ‘गोंधळ’ चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपट दिग्दर्शकाचा पुरस्कार संतोष डावखर यांना प्रदान

पुढचे १०० जन्मसुद्धा रजनीकांत म्हणूनच मिळाले, तर आवडेल, अशी प्रतिक्रिया प्रख्यात अभिनेते रजनीकांत यांनी आज दिली. चित्रपटसृष्टीतल्या योगदानाबद्दल इफ्फी, अर्थात भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या समारोप समारंभात रजनीकांत यांचा आणि प्रख्यात दिग्दर्शक व्ही. शांताराम यांचा विशेष सन्मान झाला. याबद्...

November 27, 2025 8:13 PM November 27, 2025 8:13 PM

views 13

इफ्फी महोत्सवात अभिनेता आमीर खान यांचा मास्टरक्लास

इफ्फी अर्थात भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात बॉलिवूड अभिनेता आमीर खान यांनी आज सामाजिक परिवर्तनाचे कथाकार या विषयावर मास्टरक्लास घेतला. चित्रपटांमध्ये लेखन आणि कथाकथन तसंच, अभिजात कथा आणि कल्पनाविष्कार यावेत यासाठी लेखकांना प्राधान्य देण्याची गरज यावेळी खान यांनी व्यक्त केली. या महोत्सवात आज ...

November 27, 2025 1:28 PM November 27, 2025 1:28 PM

views 25

IFFI 2025 : जगभरातले विविध चित्रपट दाखवले जाणार

गोव्यात सुरू असलेल्या ५६व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आजही जगभरातले विविध चित्रपट दाखवले जात आहेत. ‘ऑरेंडा’, ‘कॉटन क्वीन’, ‘अ पोएट’, ‘स्लीपलेस सिटी’, ‘द वुमन’ या चित्रपटांचा यात समावेश आहे. विविध आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये गाजलेला आणि इफ्फीमध्ये सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकीय पदार्पणाच्या...