निवडणुका

December 30, 2025 8:45 PM

views 125

अर्ज भरण्याची मुदत संपली, पक्षांतर करुन उमेदवारी पदरात

आज अखेरच्या दिवसापर्यंत अनेक ठिकाणी युती, आघाडी, उमेदवारी यादी यांचं चित्र स्पष्ट झालं नव्हतं. त्यामुळं राजकीय पक्ष आणि उमेदवारांसह मतदारांमध्ये संभ्रम होता. त्यामुळे अनेकांनी अखेरच्या दिवशी पक्षांतर करुन उमेदवारी पदरात पाडून घेतली.   मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी महायुतीचं जागावाटपाचं सूत्र ...

December 30, 2025 8:45 PM

views 106

उमेदवारांची AB फॉर्म मिळवण्यासाठी चढाओढ, उमेदवारांमध्ये अखेरपर्यंत संभ्रम

मुंबई महानगर क्षेत्रासारखंच चित्र थोड्याफार फरकानं राज्याच्या इतर भागातही दिसून येतंय. पुण्यात शिवसेना आणि भारतीय जनता पक्षानं महानगरपालिका निवडणूक स्वतंत्रपणे लढवण्याचा निर्णय घेतला आहे.     नाशिकमधे भाजप स्वबळावर निवडणूक लढेल, अशी घोषणा मंत्री गिरीश महाजन यांनी आज केली. आज उमेदवारी अर्ज भरण्य...

December 29, 2025 8:24 PM

views 363

महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा उद्या शेवटचा दिवस

राज्यात महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रशासन आणि राजकीय पक्षांची तयारी जोरात सुरू आहे. उमेदवारी अर्ज भरण्याचा उद्या शेवटचा दिवस असल्यामुळे राज्यभरात आज अर्ज भरण्यासाठी मोठी गर्दी झाली. स्थानिक गणितं लक्षात घेऊन वेगवेगळ्या पक्षांच्या आघाड्या बनत आहेत, तसंच अनेक नेते पक्षांतर करत आहेत.   मुंबईसाठी क...

December 29, 2025 7:08 PM

views 55

रत्नागिरीत नगरपरिषदा आणि नगर पंचायतींच्या नगराध्यक्षांनी पदभार स्वीकारला

रत्नागिरी जिल्ह्यातल्या विविध नगरपरिषदा आणि नगर पंचायतींच्या नगराध्यक्षांनी आज पदभार स्वीकारला. रत्नागिरीच्या नगराध्यक्षा  शिवसेनेच्या शिल्पा सुर्वे, गुहागर नगर पंचायतीच्या अध्यक्षा म्हणून भाजपच्या नीता मालप, खेडच्या नगराध्यक्षपदी शिवसेनेच्या माधवी बुटाला ,  देवरूख नगर पंचायतीच्या अध्यक्ष भाजपच्या म...

December 28, 2025 7:36 PM

views 116

मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीची युती

काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीनं मुंबई महानगरपालिका निवडणुकांसाठी आघाडीची घोषणा केली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि वंचित आघाडीचे नेते धैर्यवर्धन पुंडकर यांनी आज संयुक्त पत्रकार परिषदेत या आघाडीची घोषणा केली. या आघाडीअंतर्गत मुंबईतल्या २२७ जागांपैकी ६२ जागा वंचित बहुजन आघाडी लढवणार ...

December 28, 2025 2:34 PM

views 47

देशाला आज काँग्रेस विचाराची गरज – हर्षवर्धन सपकाळ

देशाला आज काँग्रेस विचाराची गरज असल्याचं महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलं आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या १४० व्या स्थापना दिनानिमित्त आज मुंबईत टिळक भवन इथल्या पक्ष कार्यालयात झालेल्या कार्यक्रर्मात ते बोलत होते.   देशात आज जात, धर्म, भाषा आणि पं...

December 26, 2025 8:24 PM

views 56

मराठवाड्यात भाजपा – शिवसेना युती?

मराठवाड्यात महानगरपालिका निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेची युती अंतिम टप्प्यात आली असून, उद्यापर्यंत सर्व निर्णय होतील, असं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं आहे. मराठवाड्यात जालना, परभणी, लातूर आणि नांदेड महापालिकेसाठी देखील बैठका घेऊन अडचणी दूर करण्यात येणार असल्याचंही बावनक...

December 26, 2025 7:21 PM

views 104

पुण्याचे माजी महापौर प्रशांत जगताप यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

पुण्याचे माजी महापौर आणि नुकताच राजीनामा दिलेले राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी पक्षाच्या पुण्यातल्या अनेक पदाधिकाऱ्यांसह आज काँग्रेसमधे प्रवेश केला. मुंबईत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी जगताप आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं पक्षात स्वागत केलं.   ...

December 26, 2025 6:00 PM

views 55

धुळे महापालिका निवडणुकीसाठी मैत्रीपूर्ण लढत देण्याची राष्ट्रवादी काँग्रेसची तयारी

धुळे महापालिका निवडणुकीसाठी मैत्रीपूर्ण लढत देण्याची तयारी असल्याचं आज राष्ट्रवादी काँग्रेसचे निवडणूक प्रभारी माजी मंत्री अनिल पाटील यांनी धुळ्यात स्पष्ट केलं. प्रत्येक प्रभागातून सक्षम उमेदवार देण्याची तयारी राष्ट्रवादी काँग्रेसनं केली असली तरी महायुतीच्या माध्यमातून निवडणूक लढवण्याचा प्रस्ताव, आणि...

December 26, 2025 5:26 PM

views 662

मनसेला धक्का! प्रकाश महाजन यांचा शिवसेनेत प्रवेश

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतून बाहेर पडलेले प्रकाश महाजन यांनी आज ठाण्यातत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. आपण पद किंवा उमेदवारीसाठी कोणतीही मागणी न करता शिवसेनेत प्रवेश केला असल्याचं महाजन यांनी बातमीदाराशी बोलताना सांगितलं. ते शिवसेनेचे प्रवक्ते असतील, असं शिंदे यां...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.