निवडणुका

November 13, 2024 7:33 PM

views 29

विधानसभा निवडणूक महाराष्ट्र प्रेमी विरुद्ध महाराष्ट्र द्रोही अशी आहे – उद्धव ठाकरे

विधानसभा निवडणुकीची लढाई ही महाराष्ट्र प्रेमी विरुद्ध महाराष्ट्र द्रोही अशी असल्याचं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज सिंधुदुर्गातल्या प्रचारसभेवेळी म्हणाले. सावंतवाडी, कणकवली आणि मालवण इथे आज ठाकरे यांच्या प्रचारसभा झाल्या. महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर वचननाम्यातल्या आश्व...

November 13, 2024 7:29 PM

views 21

विद्यमान सरकार महिलांवर अन्याय करत असल्याची शरद पवारांची टीका

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज अहिल्यानगर जिल्ह्यात राहता, आणि वांबोरी इथं प्रचार सभा घेतल्या. लोकशाहीतही काही शक्ती दडपशाहीचा वापर करुन लोकभावनांशी खेळत असतील तर त्यांना मतपेटीच्या माध्यमातून धडा शिकवा, असं  आवाहन त्यांनी केलं. विद्यमान सरकार महिलांचा जाहीर अवम...

November 13, 2024 7:24 PM

views 20

भाजप राज्यात धर्माच्या आधारावर फूट पाडत असल्याचा पटोले यांचा आरोप

भाजपाचे नेते राज्यात धर्माच्या आधारावर फूट पाडत असल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. ते आज यवतमाळ जिल्ह्यात प्रचारसभेत बोलत होते. महायुती सरकारने शेतकऱ्यांच्या पिकाला हमीभाव देण्याचं आश्वासन दिलं होतं,मात्र सध्या सोयाबीन केवळ तीन ते साडेतीन हजार रुपये दराने खरेदी केलं जात आहे....

November 13, 2024 7:16 PM

views 19

अजित पवार यांच्याशिवाय कोणतंही सरकार राज्यात स्थापन होणार नाही – नवाब मलिक

विधानसभा निवडणुकीचा निकाल आल्यानंतर, अजित पवार यांच्याशिवाय कोणतंही सरकार राज्यात स्थापन होऊ शकणार नाही, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री नवाब मलिक यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत बातमीदारांशी बोलत होते.    भाजपासोबत राष्ट्रवादी काँग्रेसनं राजकीय तडजोड केली आहे, मात्र शिव - श...

November 13, 2024 7:12 PM

views 22

अजित पवार यांच्या पक्षाने निवडणुकीसाठी शरद पवारांच्या नावावर अवलंबून राहू नये – सर्वोच्च न्यायालय

अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या निवडणूक जाहिरातीत संस्थापक शरद पवार यांच्या नावाचा उल्लेख वारंवार का केला जातो अशी विचारणा सर्वोच्च न्यायालयाने अजित पवार यांच्या पक्षाकडे केली आहे. अजित पवार यांच्या पक्षाने निवडणुकीसाठी शरद पवार यांच्या नावावर अवलंबून राहू नये असा सल्ला...

November 13, 2024 6:49 PM

views 27

बीडमध्ये पाणीप्रश्न तडीस नेऊ – उपमुख्यमंत्री अजित पवार

महायुतीची सत्ता आल्यावर बीड मध्ये एमआयडीसी उभा करू तसंच विमान सेवा सुरू करू असं आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी दिलं. ते आज बीड इथं प्रचारसभेत बोलत होते. बीड मतदारसंघात पाण्याचा प्रश्न तडीस नेऊ, असं आश्वसन यावेळी पवार यांनी दिलं. 

November 13, 2024 6:44 PM

views 25

लाडकी बहिण योजना बंद पडू देणार नाही – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पालघरमध्ये प्रचारसभा घेतली. लाडकी बहिण योजना बंद पडावी म्हणून सावत्र भावांनी खूप प्रयत्न केले. मात्र आम्ही ही योजना बंद पडू देणार नाही, असं ते म्हणाले. पालघरचे विद्यमान आमदार श्रीनिवास वनगा यांना यावेळी उमेदवारी दिली नसली तरी त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, असं आश्वासन...

November 13, 2024 6:36 PM

views 24

मविआचं अल्पसंख्यंकांचं तुष्टीकरणाचं धोरण आम्ही यशस्वी होऊ देणार नाही – मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ

उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज वाशीम जिल्ह्यात महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पोहरादेवी इथं सभा घेतली. महाविकास आघाडीचं अल्पसंख्यंकांचं तुष्टीकरणाचं धोरण आम्ही हे यशस्वी होऊ देणार नाही, असं ते यावेळी म्हणाले. उद्धव ठाकरे यांची साथ सोडलेले महंत सुनील महाराज राठोड यांनी याव...

November 13, 2024 3:20 PM

views 19

देशातल्या १० राज्यातल्या ३१ विधानसभा मतदारसंघांमधे पोटनिवडणुकीसाठी मतदान

देशातल्या १० राज्यातल्या मिळून ३१ विधानसभा मतदारसंघांमधे पोटनिवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. दुपारी १ वाजेपर्यंत झालेल्या मतदानाची उपलब्ध झालेली राज्यनिहाय टक्केवारी अशी आहे. राजस्थानात - ५४ पूर्णांक ९५ शतांश टक्के. पश्चिम बंगाल - ४५ पूर्णांक ३७ शतांश टक्के. आसाम - ५० पूर्णांक १९ शतांश टक्के. बिहार - ...

November 13, 2024 3:09 PM

views 22

भाजप खऱ्या अर्थानं संविधानाचं रक्षण करत आहे – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातलं भाजपाचं सरकार खऱ्या अर्थानं संविधानाचं रक्षण करत आहे, असं प्रतिपादन भाजपाचे नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. ते आज नांदेड जिल्ह्यातल्या मुखेड इथं आयोजित प्रचार सभेत बोलत होते. महाविकास आघाडीनं भाजपामुळे आरक्षण जाणार, संविधान बदलणार अशी ...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.