निवडणुका

January 16, 2026 3:12 PM

views 95

BMC Elections : भाजपा आघाडीवर, ठाकरे बंधू पिछाडीवर

आतापर्यंत आलेल्या निकाल आणि कलानुसार बृहन्मुंबई महानगरपालिकेत भाजपा आणि शिवसेना युतीला निर्णायक आघाडी मिळताना दिसत आहे. शिवसेना भाजपा युती ११९ जागांवर आघाडीवर आहे, यात भाजपा ८८ तर शिवसेना ३१ जागांवर आघाडीवर आहे. दुसरीकडे उद्धव ठाकरे यांचा पक्ष ६४ जागांवर तर राज ठाकरे यांचा पक्ष केवळ सहा जागांवर आघाड...

January 16, 2026 3:15 PM

views 71

पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये पवार कुटुंबियांचे पक्ष पिछाडीवर

पुणे महानगरपालिकेच्या एकंदर १६५ जागांपैकी भाजपा ५७, राष्ट्रवादी काँग्रेस १२, काँग्रेस १०, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष ३ जागांवर आघाडीवर आहेत. २ जागांवरचे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.   राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांची युती असलेल्या पिंपरी-चिंचवड...

January 16, 2026 4:04 PM

views 170

Election Result : भाजपा आघाडीवर, काही ठिकाणी निकाल स्पष्ट

नाशिकमध्ये आतापर्यंत २१ जागांवर निकाल घोषित झाले आहेत. भाजप ११ जागांवर विजयी झाला असून शिवसेना ८ जागांवर विजय मिळवला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला एका जागेवर विजय मिळवता आला आहे.    मालेगाव महापालिकेच्या ८४ जागांपैकी ४९ जागांचे निकाल जाहीर झाले आहेत. इस्लाम पार्टीला सर्वाधिक १९ जागांवर ...

January 16, 2026 1:16 PM

views 86

Maharashtra Election : राहुल गांधींची राज्य निवडणूक आयोगावर टीका

महाराष्ट्रातल्या महानगरपालिका निवडणुकीत मतदारांच्या बोटावर लावलेल्या शाईच्या दर्जावरून झालेल्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज निवडणूक आयोगावर टीका केली. मतचोरी हे देशविरोधी कृत्य असल्याचा पुनरुच्चार त्यांनी एका वृत्तपत्रातल्या बातमीचा फोटो समाजमाध्यमावर शेअर करून केला....

January 15, 2026 8:15 PM

views 308

Maharashtra: २९ महापालिकांसाठी सकाळी १०.३० वाजता मतमोजणी सुरू

राज्यातल्या २९ महानगरपालिका निवडणुकीसाठी आज मतदान झालं. सर्व महानगरपालिकांमधे मिळून सरासरी ५० टक्क्यांपर्यंत मतदान झाल्याचा अंदाज राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी व्यक्त केला. गेल्यावेळेच्या निवडणुकीपेक्षा यंदा अधिक मतदान झाल्याची माहिती त्यांनी दिली. उद्या सकाळी साडे दहा वाजता मतमोजणीला सुर...

January 15, 2026 8:16 PM

views 46

१२ जिल्हा परिषदा आणि सव्वाशे पंचायत समित्यांच्या निवडणुकीची रणधुमाळी उद्यापासून सुरू होणार

राज्यातल्या १२ जिल्हा परिषदा आणि सव्वाशे पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी उद्यापासून अर्ज भरायला सुरुवात होणार आहे. २१ जानेवारीपर्यंत ऑफलाईन पद्धतीने यासाठी अर्ज भरता येतील. या टप्प्यात पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव, लातूर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्...

January 15, 2026 1:39 PM

views 85

राज्यातल्या २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी मतदान

महाराष्ट्रातल्या २९ महानगरपालिकांमधे आज सकाळी साडेआठ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली. मुंबईत सकाळी साडेअकरा वाजेपर्यंत सुमारे १७ पूर्णांक ७३ शतांश  टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. काही मतदान केंद्रांवरच्या किरकोळ तक्रारी वगळता मतदान शांततेत सुरु आहे.   राजधानी मुंबईत मतदानाच्या पार्...

January 14, 2026 1:13 PM

views 188

राज्यातल्या २९ महापालिका निवडणुकांसाठी उद्या मतदान

राज्यातल्या २९ महापालिका निवडणुकांसाठी उद्या मतदान होणार आहे. विविध ठिकाणी मतदान साहित्याचं वाटप आणि कर्मचाऱ्यांना मतदान केंद्रांवर पोहोचवण्याची तयारी सुरू आहे.    राज्यातल्या २९ महापालिकांसाठी उद्या सकाळी साडेसात ते साडेपाच दरम्यान मतदान होणार आहे. यासाठी निवडणूक आयोगानं दिलेलं मतदार ओळखपत्र मतदारा...

January 13, 2026 7:10 PM

views 8.2K

जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांची निवडणूक ‘या’ दिवशी होणार

राज्यातल्या १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी ५ फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून ७ फेब्रुवारी रोजी मतमोजणी होईल, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी आज मुंबईत वार्ताहर परिषदेत केली. यामध्ये पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, छत्रपती संभाजी नगर, परभणी, धाराशिव, लातूर, ...

January 13, 2026 7:10 PM

views 89

महानगरपालिका निवडणुकांसाठीच्या प्रचाराच्या तोफा थंडावल्या

राज्यातल्या महानगरपालिका निवडणुकांसाठीच्या प्रचाराच्या तोफा आज थंडावल्या. एकंदर २९ महापालिकांमधल्या ८९३ प्रभागांमधल्या २ हजार ८६९ नगरसेवकांसाठी परवा मतदान होणार आहे. यासाठी एकूण १५ हजार ९३१ उमेदवार रिंगणात आहेत. सकाळी साडे ७ ते साडे ५ वाजेदरम्यान हे मतदान होणार आहे.    प्रचाराचा अखेरचा दिवस असल...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.