October 1, 2024 4:18 PM October 1, 2024 4:18 PM
10
ज्येष्ठ अभिनेते रजनीकांत चेन्नईच्या अपोलो रुग्णालयात दाखल
ज्येष्ठ अभिनेते रजनीकांत यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे चेन्नईच्या अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. रुग्णालयाकडून रजनीकांत यांच्या प्रकृतीविषयी कोणतीही अधिकृत वैद्यकीय माहिती जाहीर झालेली नाही. तथापि, रजनीकांत यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.