व्यवसाय

October 18, 2025 7:46 PM

views 180

जीएसटी कपातीमुळे बाजारपेठेतली उलाढाल २० लाख कोटी रुपयांनी वाढण्याचा सरकारचा अंदाज

वस्तू आणि सेवा कराच्या दरांमध्ये केलेल्या कपातीमुळं यंदाच्या वर्षी देशात ग्राहकांकडून होणारी खरेदी १० टक्के म्हणजे २० लाख कोटी रुपयांनी वाढेल असा अंदाज सरकारनं व्यक्त केला आहे. केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन, पीयूष गोयल आणि अश्विनी वैष्णव यांनी आज नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेला संबोधित केलं.  ...

October 16, 2025 3:13 PM

views 52

देशातल्या शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी जोरदार तेजी

अमेरिकन फेडरल रिझर्व्हकडून दर कपातीची अपेक्षा, जागतिक बाजारातलं सकारात्मक वातावरण यामुळं सलग दुसऱ्या दिवशी देशातल्या शेअर बाजारात जोरदार तेजी आहे. सकाळपासून असलेली तेजी दुपारपर्यंत आणखी वाढत गेली.   बँका, माहिती तंत्रज्ञान कंपन्या, ग्राहकोपयोगी वस्तू निर्माण करणाऱ्या कंपन्यांचे समभाग आज तेजीत आ...

October 15, 2025 7:06 PM

views 75

देशातल्या शेअर बाजारात तेजी

गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मोठ्या घसरणीला देशातल्या शेअर बाजारांनी आज मोठ्या तेजीसह विराम दिला. जागतिक बाजारपेठेतलं सकारात्मक वातावरण आणि कच्च्या तेलाच्या घसरलेल्या किंमतीमुळं देशातले शेअर बाजार आज सकाळपासून तेजीत होते. दिवसअखेर सेन्सेक्समधे ५७५ अंकांची वाढ झाली आणि तो ८२ हजार ६०५ अंकांवर...

October 14, 2025 3:38 PM

views 100

इंधनाच्या दर कपातीमुळं चलनवाढीत घट

घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित चलनवाढीचा दर सप्टेंबर महिन्यात १३ शतांश टक्के होता. यंदाच्या ऑगस्टमध्ये हा दर ५२ शतांश टक्के आणि गेल्यावर्षीच्या सप्टेंबरमध्ये १ पूर्णांक ९१ शतांश टक्के होता. खाद्यपदार्थ आणि इंधनाच्या दरात झालेल्या कपातीमुळं चलनवाढीत घट झाली.

October 14, 2025 1:23 PM

views 50

आर्थिक वर्षाच्या तुलनेत कर महसुलात ६.३३ शतांश टक्के वाढ

२०२५-२६ या आर्थिक वर्षात आतापर्यंत ११ लाख ८९ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त प्रत्यक्ष कर संकलन झालं आहे. गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत कर महसुलात ६ पूर्णांक ३३ शतांश टक्के वाढ झाल्याची माहिती प्राप्तीकर विभागानं दिली आहे.   १ एप्रिल ते १२ ऑक्टोबर या काळात कंपनी करापोटी सुमारे ५ लाख २ हजार कोटी, ...

October 13, 2025 8:03 PM

views 41

ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित किरकोळ चलनफुगवट्याचा दर १.५४ टक्के

ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित किरकोळ चलनफुगवट्याचा दर सप्टेंबर २०२५ मधे १ पूर्णांक ५४ शतांशांवर पोहोचला. केंद्रीय सांख्यिकी आणि कार्यक्रम विभागाने प्रसिद्ध केलेली आकडेवारी सांगते की, गेल्या ८ वर्षातला हा नीचांक आहे.  ग्रामीण भागात महागाई  एक पूर्णांक सात शतांश टक्क्यांनी कमी झाली तर शहरी भागात २...

October 10, 2025 3:13 PM

views 55

नीती आयोगाचा कर धोरणावरच्या अहवालाचा दुसरा भाग प्रकाशित

नीती आयोगानं कर धोरणावरच्या अहवालाचा दुसरा भाग ‘भारतातील करांमधील बदल : गुन्हेगारीकरणाला आळा घालणे आणि विश्वासाधारित प्रशासन ’ आज नवीदिल्लीत प्रकाशित केला. नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी बीव्हीआर सुब्रमण्यम यांनी हा अहवाल प्रकाशित केला. सर्व प्रकारचे दिवाणी पर्याय संपुष्टात आल्यानंतर कोणत्या प...

October 9, 2025 1:16 PM

views 78

ग्लोबल फिनटेक फेस्टमध्ये RBIचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचं संबोधन…

देशातल्या आर्थिक तत्रज्ञान कंपन्यांनी डिजिटल साक्षरतेत कमी पडणाऱ्या नागरिकांना तसंच वरिष्ठ नागरिकांनाही सहज वापरता येतील अशा प्रकारची उत्पादनं आणि सेवा सादर कराव्यात असं आवाहन रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी केलं आहे. मुंबईत सुरु असलेल्या ग्लोबल फिनटेक फेस्ट २०२५ मध्ये ते काल बोलत होते...

October 8, 2025 8:06 PM

views 79

बँकेची केवायसी प्रक्रिया सुलभ करण्याचा प्रयत्न – SBIचे अध्यक्ष सी. एस. शेट्टी

बँकेची केवायसी प्रक्रिया सुलभ करण्याचा प्रयत्न असल्याचं स्टेट बँकेचे अध्यक्ष सी. एस. शेट्टी यांनी म्हटलं आहे. मुंबईत आज फिनटेक फेस्टमध्ये शेट्टी बोलत होते. यूपीआय वापरकर्ते आता डेबिट कार्डाशिवाय कोणत्याही बँकेच्या एटीएममध्ये रोख रक्कम जमा करू शकणार आहेत. तसंच, कर्जाचा हप्ताही भरणं आणि थर्ड पार्टी व्...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.