बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याच्या प्रचाराचा उद्या शेवटचा दिवस असल्यामुळे प्रचाराला वेग आला आहे. रालोआ आणि महाआघाडीचे वरिष्ठ नेते आणि स्टार प्रचारकांनी सभा आणि बैठकांचा धडाका लावला आहे. भाजपाचे वरिष्ठ नेते आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज सितामढी आणि बेत्तीया इथल्या प्रचारसभांना संबोधित करतील. ज्येष्ठ नेते आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह रोहतस आणि कैमुर जिल्ह्यात सभा घेतील तर गृहमंत्री अमित शहा कटिहार इथल्या प्रचारसभेला संबोधित करणार आहेत. रालोआच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी उत्तरप्रदेश आणि मध्यप्रदेशाचे मुख्यमंत्री सुद्धा सभा घेणार आहेत.
महाआघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्या प्रियांका गांधी आज कटिहार इथं दोन प्रचारसभा घेणार आहेत. तर राजद नेते तेजस्वी यादव जमुई, गया, नवादा आणि जेहानाबाद इथं अठरा प्रचारसभा घेणार आहेत.
दरम्यान, पहिल्या टप्प्यात ६४ पूर्णांक ६६ दशांश टक्के मतदान झालं. दुसऱ्या टप्प्यातलं मतदान ११ नोव्हेंबरला होणार असून १४ नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे.