डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

October 9, 2024 3:03 PM | BMC | Mumbai

printer

वायू प्रदूषण रोखण्यासाठीच्या मार्गदर्शक तत्वांचे पालन करा – मुंबई महापालिका आयुक्तांचे आदेश

मुंबई महानगर क्षेत्रातलं वायू प्रदूषण रोखणं आणि धूळ नियंत्रित करणं यासाठी मार्गदर्शक तत्‍त्‍वं जारी करण्‍यात आली आहेत, त्‍याची प्रभावीपणे अंंमलबजावणी करावी आणि प्रसंगी दंडात्‍मक कारवाई करावी, असे स्‍पष्‍ट निर्देश महानगरपालिका आयुक्‍त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी दिले आहेत. यासंदर्भात उच्च न्यायालयानं दिलेल्या निर्देशांची पूर्तता करण्यासाठी समन्वय समिती गठीत करण्यात आली असून त्याची बैठक काल आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली झाली.  प्रत्‍यक्ष कार्यक्षेत्रस्‍थळी कार्यरत अधिकारी – कर्मचारी, पोलिस अंमलदारांनी सजग राहून वायू प्रदूषणाला  कारणीभूत घटकांवर कारवाई करावी,असे निर्देश  त्यांनी दिले. ठाणे, नवी मुंबई, वसई – विरार, कल्‍याण – डोंबिवली, मीरा – भाईंदर या महानगरपालिकांचे आयुक्‍त, प्रतिनिधी दूरदृष्यप्रणालीद्वारे या बैठकीत सहभागी झाले होते.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.