डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

काँग्रेसने मणिपूरमधली परिस्थिती संवेदनशील केल्याचा भाजपचा आरोप

भाजपा अध्यक्ष जे पी नड्डा यांनी काँग्रेसवर मणिपूरमधली परिस्थिती जाणीवपूर्वक संवेदनशील केल्याचा आरोप केला आहे. मणिपूर हिंसाचारासंदर्भात काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना लिहिलेल्या पत्राला नड्डा यांनी उत्तर दिलं आहे. मणिपूरमधली शांतता भंग करण्यासाठी कट्टरतावादी संघटना सातत्याने प्रयत्न करत राहतात, हे काँग्रेसच्या प्रशासनाचं अपयश आहे, अशी टीका नड्डा यांनी आपल्या पत्रात केली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामुळे गेल्या दहा वर्षांत ईशान्य भारतात अर्थव्यवस्था, सुरक्षा, आरोग्य सेवा, शिक्षण अशा क्षेत्रांमध्ये परिवर्तन झालं असून आता तिथे विकासाच्या संधीही उपलब्ध झाल्या आहेत, असंही नड्डा आपल्या पत्रात म्हटलं आहे.