पश्चिम बंगालमध्ये हिंसाचाराचा आढावा घेण्यासाठी भाजपची समिती स्थापन

देशाची लोकसभा निवडणुक पार पडल्यानंरत पश्चिम बंगालमध्ये सातत्यानं सुरू असलेल्या राजकीय हिंसाचाराच्या घटनांचा आढावा घेण्यासाठी भाजपनं एक समिती स्थापन केली आहे. खासदार बिप्लब कुमार देब, रविशंकर प्रसाद, ब्रिजलाल आणि कविता पाटीदार या भाजपा नेत्यांचा या समितीत समावेश आहे. ही समिती पश्चिम बंगालला भेट देऊन तिथल्या राजकीय हिंसाचारांच्या घटनांविषयी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांना अहवाल सादर करणार आहेत.