संतोष देशमुख हत्या प्रकरणातल्या आरोपींना फाशीची शिक्षा देण्याच्या मागणीसाठी बीड बंद

सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातल्या आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे या मागणीसाठी आज बीड जिल्हा बंदचं आवाहन करण्यात आलं आहे. या बंदच्या पार्श्वभूमीवर बीड शहरातल्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौक परिसरात नागरिक, सर्वपक्षीय पदाधिकारी एकत्रित आले होते. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात गुन्हे अन्वेषन विभागानं न्यायालयात आरोपपत्र दाखल केलं आहे. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असून जनतेनं  कायदा हातात घेऊ नये, असं आवाहन पोलीस अधीक्षकांनी केलं आहे. जिल्ह्यात संवेदनशील ठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.