बीड जिल्ह्यातल्या मस्साजोग इथले सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी आज बीड इथल्या न्यायालयात सुनावणी झाली. वाल्मिक कराडचा संतोष देशमुख यांच्या हत्येत सहभाग नाही असा युक्तीवाद त्याच्या वकिलाने न्यायालयात केला. त्याला विशेष सरकारी वकिल उज्ज्वल निकम यांनी विरोध केला. न्यायालयाने आज दोन्ही बाजूंचे युक्तीवाद ऐकले, याप्रकरणी पुढची सुनावणी ७ जुलै रोजी होणार आहे.
Site Admin | June 24, 2025 6:41 PM | beed | Santosh Deshmukh Case
संतोष देशमुख हत्याप्रकरणी पुढची सुनावणी ७ जुलैला
