डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

September 15, 2025 8:44 PM | Beed Rain | Heavy rain

printer

बीडमध्ये मुसळधार पाऊस, नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी

बीड जिल्ह्यात झालेल्या जोरदार पावसामुळे जिल्ह्यातल्या अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. अनेक मोठ्या प्रकल्पांचे दरवाजे उघडण्यात आल्यामुळे नद्यांना पूर येऊन अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. तर सात गावांमध्ये मिळून ५१ जण पुरात अडकले असून त्यांच्या सुटकेसाठी एनडीआरएफ पथकाला पाचारण करण्यात आलं आहे. आष्टी तालुक्यात ५ ते ६ गावं पूर्णपणे पाण्याखाली गेली असून हवाई दलाच्या मदतीने गावांतल्या नागरिकांना सुरक्षित बाहेर काढलं जात आहे. बीड जिल्ह्यामध्ये पावसाची परिस्थिती पाहता जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी उद्या जिल्ह्यातल्या सर्व शाळा आणि महाविद्यालयं तसंच इतर शैक्षणिक संस्थांना सुट्टी जाहीर केली आहे.