डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातल्या ५५६ सदनिकांचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वितरण

पुनर्विकास करण्यासाठी विकासकाची गरज नाही, तर म्हाडासारखी यंत्रणा उत्तम पद्धतीने पुनर्विकास करू शकते, हे बीडीडी चाळीच्या पुनर्विकासाने सिद्ध केलं, असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केलं. बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातल्या ५५६ सदनिकांचं वितरण त्यांच्या हस्ते आज झालं, त्यावेळी ते बोलत होते. बीडीडी चाळ म्हणजे मुंबईच्या सामाजिक-आर्थिक परिवर्तनाचा जिवंत इतिहास आहे, तिच्या पुनर्विकासाची वर्षानुवर्षं प्रलंबित असलेली मागणी या सरकारने पूर्ण केली, असं ते म्हणाले. या धर्तीवर धारावी पुनर्विकास प्रकल्पही यशस्वी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मउपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे, सांस्कृतिक कार्य मंत्री आशीष शेलार, मंगलप्रभात लोढा, नीलम गोऱ्हे, पंकज भोयर, खासदार मिलिंद देवरा, संबंधित विभागांचे अधिकारी आणि इतर यावेळी उपस्थित होते.