डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

November 19, 2024 9:20 AM | FM Sitharaman

printer

बँकांनी २०२५-२६मध्ये ६ लाख १२ हजार कोटी तर २०२६-२७मध्ये ७ लाख कोटी रुपये पतपुरवठा करण्याचं उद्दीष्ट ठेवावं – अर्थमंत्री

बँकांनी सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रासाठी आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये 6 लाख 12 हजार कोटी तर 2026-27 मध्ये 7 लाख कोटी रुपये पतपुरवठा करण्याचं उद्दीष्ट ठेवावं असं केंद्रिय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. त्या काल मुंबईत 11व्या एसबीआय बँकिंग अँड इकॉनॉमिक्स परिषदेत बोलत होत्या. विकसित भारताचं स्वप्न सत्यात आणण्याची आकांक्षा ही या परिषदेची संकल्पना आहे. 2021-22 मध्ये भारताच्या अर्थव्यवस्थेनं 5 व्या क्रमांकावर झेप घेतली असं सांगून येत्या काही वर्षात ती तिसऱ्या क्रमांकावर पोहोचेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.