डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

June 16, 2024 3:20 PM | bakari eid | Eid

printer

संयुक्त अरब अमिरातीमध्ये आज बकरी ईदचा सण साजरा केला जात आहे

संयुक्त अरब अमिरातीमध्ये आज ईद अल अजहा अर्थात बकरी ईदचा सण साजरा केला जात आहे. या निमित्त विशेष नमाज अदा करण्यात आली. इस्लामने सांगितलेल्या हज यात्रेचं आयोजनही बकरी ईदच्या वेळी होतं.

प्रेषित इब्राहिम यांनी केलेल्या सर्वोच्च त्यागाचं स्मरण करण्यासाठी मुस्लिम समाज हा सण साजरा करतो. सौदी अरेबिया इथं मक्केपासून जवळ मुझदलिफा इथं १८० देशातले जवळपास १५ लाखांहून अधिक यात्रेकरू जमले आहेत. हिजरी दिनदर्शिकेच्या १२ व्या आणि अंतिम महिन्यात येणाऱ्या या सणाला विशेष महत्त्व आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.