डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

बागमती एक्सप्रेस आणि मालगाडी यांची टक्कर होऊन झालेल्या दुर्घटनेची एनआयएकडून पाहणी

बागमती एक्सप्रेस आणि मालगाडी यांची टक्कर होऊन झालेल्या दुर्घटनेची एनआयए अर्थात राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या पथकानं आज घटनास्थळी जाऊन पाहणी केली. कर्नाटक मधून  बिहार कडे निघालेल्या बागमती एक्सप्रेसचा तामिळनाडू जवळच्या कावराई पट्टई जवळ शुक्रवारी रात्री हा अपघात झाला होता. ही एक्सप्रेस  मुख्य लाईन सोडून चुकीनं लूप लाईनवर गेल्यानं हा अपघात झाल्याचं दक्षिण रेल्वेचे महाप्रबंधक आर.एन. सिंह यांनी यावेळी सांगितलं. अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरीही गेल्या काही दिवसांपासून देशाच्या विविध भागांमध्ये रेल्वेच्या घातपाताचे प्रयत्न होत आहेत. या पार्श्वभूमीवर एनआयएनं अपघातस्थळाची पाहणी करून तपास सुरू केल्याचं सिंह म्हणाले.