डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

June 10, 2025 8:32 PM | Axiom-4 mission

printer

ऑक्सियम-4 उद्या संध्याकाळी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाकडे झेपावणार

ऑक्सियम-4 या अंतराळ मोहिमेसाठी अमेरिका, भारत, पोलंड आणि हंगेरीचे चार अंतराळवीर उद्या रवाना होणार आहेत. १४ दिवसांच्या वैज्ञानिक मोहिमेसाठी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर घेऊन जाणार आहे. भारतीय वेळेनुसार उद्या संध्याकाळी साडे पाच वाजता फ्लोरिडा इथल्या केनेडी स्पेस सेंटरवरून त्यांचं अंतराळ यान उड्डाण करेल. भारताचे अंतराळवीर शुभांशु शुक्ला यांचा या पथकात समावेश आहे. ही मोहीम यशस्वी झाली तर शुक्ला हे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय बनतील. भारतीय हवाई दल तसंच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शुक्ला यांना या मोहिमेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा