भारताचे अंतराळवीर शुभांशु शुक्ला यांना अंतराळात घेऊन जाणारी ऑक्सियम-4 मोहिम शुभारंभ प्रतिकूल हवामानामुळे एका दिवसानं पुढे ढकलण्यात आली आहे. इस्रोचे अध्यक्ष व्ही. नारायणन यांनी दिलेल्या माहितीनुसार, या उड्डाणाची नियोजित वेळ आंतरराष्ट्रीय प्रमाणवेळेनुसार आज संध्याकाळी साडेपाच होती. ही ऐतिहासिक मोहीम अमेरिका, भारत, पोलंड आणि हंगेरी या देशांच्या चार अंतराळवीरांना १४ दिवसांच्या वैज्ञानिक मोहिमेसाठी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर घेऊन जाणार आहे. ऑक्सियम-4 (AX-4) मोहिमेत भारतातील शुभांशु शुक्ला यांच्यासह पोलंडमधील स्लावोज़ उझ्नांस्की, हंगेरीमधील तिबॉर कपु आणि अमेरिकेतील पेगी व्हिटसन यांचा या मोहिमेत समावेश आहे. अंतराळवीर ३१ देशांमधून सुमारे ६० वैज्ञानिक प्रकल्पाचा अभ्यास करणार आहेत. त्यामध्ये इस्रोच्या नेतृत्वाखाली काही महत्त्वाचे संशोधन प्रकल्प आहेत.
Site Admin | June 10, 2025 2:37 PM | Axiom-4 mission
ऑक्सियम-4 मोहीम प्रतिकूल हवामानामुळे एका दिवस लांबणीवर
