December 17, 2024 9:03 PM

views 164

एक देश एक निवडणूक संदर्भातली घटनादुरुस्ती विधेयकं लोकसभेत सादर

एक देश एक निवडणूक संदर्भातली दोन विधेयकं आज लोकसभेत मांडण्यात आली. केंद्रीय कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल विधेयक मांडत असताना विरोधकांनी विधेयक मांडण्यावर मतदानाची मागणी केली. त्यावर २६९ सदस्यांनी विधेयक मांडण्याच्या बाजूने कौल दिला. तर १९८ सदस्यांनी विधेयक मांडण्याला विरोध केला. त्यात काँग्रेस, सम...

December 17, 2024 7:50 PM

views 85

MPSC 2025 मध्ये होणाऱ्या स्पर्धा परीक्षांचं वेळापत्रक जाहीर

एम.पी.एस.सी. अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत वर्ष  २०२५ मध्ये घेण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षांचं  अंदाजित वेळापत्रक आयोगाच्या www.mpsc.gov.in या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आलं आहे. उमेदवारांनी अधिक माहितीसाठी आयोगाच्या संकेतस्थळाला भेट द्यावी असं आवाहन महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं  प्रसिध...

December 17, 2024 7:41 PM

views 39

पुण्यात ७० वा सवाई गंधर्व भीमसेन संगीत महोत्सव उद्यापासून सुरू

जगभरातील संगीत रसिकांसाठी पर्वणी असलेला पुण्यातील मानाचा ७० वा सवाई गंधर्व भीमसेन संगीत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. येत्या २२डिसेंबरपर्यंत चालणाऱ्या या संगीत सोहळ्यामध्ये शास्त्रीय संगीतातील अनेक दिग्गज कलाकारांसह १५ नवीन कलाकार प्रथमच या मंचावर आपली कला सादर करणार आहेत.

December 17, 2024 7:30 PM

views 21

विधानसभेत विरोधकांनी परभणी आणि बीड हिंसाचार प्रकरणी स्थगन प्रस्ताव मांडला

विधानसभेत विरोधकांनी आज कामकाज सुरू झाल्यावर परभणी आणि बीड हिंसाचार प्रकरणी स्थगन प्रस्ताव मांडला. परभणीत पोलीस कोठडीत मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या शरीरावर जखमा असल्याचं शवविच्छेदन अहवालात नमूद आहे. त्याला कोठडीत पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांनी केला. याप्रकरणी उद्य...

December 17, 2024 7:42 PM

views 12

नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पासाठी आशियाई विकास बँकेकडून अर्थसहाय्य

नागपूरमधल्ये मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याला चालना देण्यासाठी आशियाई विकास बँकेकडून १ हजार ५४७ कोटी रुपयांचं अर्थसहाय्य मिळणार आहे. विधानभवनातल्या मंत्रिमंडळ सभागृहात आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार करण्यात आला. या प्रकल्पामुळे नागपूर शहरासह परिसराच्या विक...

December 17, 2024 6:58 PM

views 48

शेअर बाजारात आज मोठी घसरण

आंतरराष्ट्रीय व्यापारातली मंदी आणि वाढती व्यापारी तूट यांच्या परिणामामुळे आज भारतीय शेअर बाजारांमध्ये तीव्र घसरण दिसून आली. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समधे आज दिवसअखेर अंकांची १ हजार ६४  अंकांची घसरण झाली, आणि तो ८० हजार ६८४ अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही ३३२ अंकांची घसरण नोंद...

December 17, 2024 6:55 PM

views 20

रशियाच्या अणुसंरक्षण दलाचे प्रमुख इगोर किरिलोव्ह यांचा स्फोटात मृत्यू

रशियाची राजधानी मॉस्को इथे आज एका इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये लपवून ठेवलेल्या बॉम्बचा स्फोट झाल्याने रशियाच्या अणुसंरक्षण दलाचे प्रमुख इगोर किरिलोव्ह यांचा मृत्यू झाला. त्यांच्यासह त्यांच्या सहाय्यकाचाही यात मृत्यू झाला आहे. ही दुर्घटना क्रेमलिनच्या आग्नेय दिशेला असलेल्या एका रस्त्यावर घडली. किरिलोव्ह या...

December 17, 2024 9:00 PM

views 32

फ्रान्समध्ये चक्रीवादळामुळे झालेल्या दुर्घटनांमध्ये २२ जणांचा मृत्यू

फ्रान्समध्ये मेयोत इथे चिडो चक्रीवादळामुळे झालेल्या दुर्घटनांमध्ये आतापर्यंत किमान २२ जणांचा मृत्यू झाला तर १ हजार ४०० हून अधिक जण जखमी झाले आहेत. हिंदी महासागरातल्या मादागास्कर आणि मोझांबिक बेटांच्या किनाऱ्या दरम्यान मायोत हा द्वीपसमूह आहे. या चक्रीवादळामुळे किती नुकसान झालं आहे, याचा निश्चित आकडा ...

December 17, 2024 6:42 PM

views 16

ट्रॅव्हल एजंटकडून फसवणुकीमुळे पाकिस्तानात अडकलेली भारतीय महिला मायदेशी परतली

ट्रॅव्हल एजंटकडून फसवणूक झाल्याने पाकिस्तानात अडकलेली एक भारतीय महिला २२ वर्षांनी मायदेशी परतली आहे. हमीदा बानो असं या महिलेचं नाव असून त्यांना आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून अटारी सीमेवर परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांकडे सोपवण्यात आलं. त्यानंतर हमीदा यांना वैद्यकीय उपचारांसाठी अमृतसर इथल्या ग...

December 17, 2024 6:23 PM

views 33

उद्धव ठाकरे यांची नागपुरात विधानभवनात मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांची भेट

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज नागपुरात विधान भवनात मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांची भेट घेतली आणि महायुतीच्या विजयाबद्दल अभिनंदन केलं. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये संवादाची या राज्याला दीर्घ परंपरा आहे. त्यांच्या नेतृत्त्वाखाली राज्याची आणखी प्रगती होईल, अशा शुभेच्छा दिल्याचं उद्धव ठाकरे यां...