December 18, 2024 3:15 PM

views 27

हिवाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी विधानसभेचं कामकाज सुरू

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या आजच्या तिसऱ्या दिवशी विधानसभेचं कामकाज सुरू झाल्यावर औचित्याचे मुद्दे चर्चेसाठी घेण्यात आले. त्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल राज्यसभेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याचा मुद्दा आज विधानसभेत काँग्रेसचे नितिन राऊत यांनी उपस्थित केला....

December 18, 2024 2:52 PM

views 17

भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू रविचंद्रन अश्विनची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा

भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू रविचंद्रन अश्विन यानं आज ३८व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याची घोषणा केली. ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या बॉर्डर-गावस्कर चषक कसोटी क्रिकेट मालिकेतला तिसरा कसोटी सामना अनिर्णित राहिल्यानंतर त्यानं आपण निवृत्त होत असल्याचं जाहीर केलं. या मालिकेतल्या पहिल्...

December 18, 2024 2:47 PM

views 28

भारताचा प्रवास जागतिक आणि देशांतर्गत आव्हानांच्या टप्प्यात अविश्वसनीयपणे वेगवान वाढीचा आहे – नीती आयोग

दहाव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था ते आज पाचव्या स्थानापर्यंतचा भारताचा प्रवास जागतिक आणि देशांतर्गत आव्हानांच्या टप्प्यात अविश्वसनीयपणे वेगवान वाढीचा आहे, असं मत नीती आयोगाचे उपाध्यक्ष सुमन के. बेरी यांनी व्यक्त केलं आहे. ते काल मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. नीती आयोग, कॅलिफोर्निया विद्यापीठ, बर्क...

December 18, 2024 3:32 PM

views 19

दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबाबतच्या विधानावरुन गदारोळ झाल्याने आज संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज आधी दुपारी २ वाजेपर्यंत आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं.  केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काल राज्यसभेत बोलताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केल्याचा आरो...

December 18, 2024 7:24 PM

views 24

विधानपरिषदेच्या सभापतीपदी महायुतीचे उमेदवार राम शिंदे यांची निवड होण्याचा मार्ग मोकळा

राज्य विधान परिषदेच्या सभापती पदासाठी महायुतीच्या वतीनं राम शिंदे यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. दुपारी १२ वाजेपर्यंत अन्य उमेदवाराचा अर्ज दाखल झाला नसल्यानं शिंदे यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे.

December 18, 2024 4:56 PM

views 20

‘लापता लेडीज’ चित्रपट ऑस्कर पुरस्काराच्या शर्यतीतून बाहेर

आमिर खान निर्मित आणि किरण राव दिग्दर्शित 'लापता लेडीज' हा चित्रपट ऑस्कर पुरस्काराच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. हा चित्रपट ९७व्या अकादमी पुरस्कारासाठी बेस्ट इंटरनॅशनल फीचर गटामध्ये भारताकडून अधिकृत रीत्या पाठवण्यात आला होता. मात्र अंतिम १५ चित्रपटांच्या यादीत या चित्रपटाचा समावेश होऊ शकला नाही. हिंद...

December 18, 2024 1:41 PM

views 38

गुंतवणूक सल्लागारांसाठी सेबीचं प्रस्तावित नियम सुधारणा पत्रक प्रकाशित

गुंतवणूक सल्ला देऊ इच्छिणारी कोणतीही व्यक्ती आयए रेग्युलेशन अर्थात गुंतवणूक सल्लागार नियमावली अंतर्गत पात्र आणि नोंदणीकृत असणं  आवश्यक आहे, असं सेबीनं काल प्रकाशित केलेल्या प्रस्तावित नियम सुधारणा पत्रकात म्हटलं आहे. गुंतवणूकदारांच्या माहितीची सुरक्षितता, दिलेल्या सल्ल्याची अचूकता याबाबतची जबाबदारी ...

December 18, 2024 1:35 PM

views 16

दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी निवडणूक आयोगाची बैठक

पुढच्या वर्षी होणाऱ्या दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीच्या तयारीसाठीची निवडणूक आयोगाची बैठक सध्या सुरू आहे. दिल्लीचे मुख्य निवडणूक अधिकारी, तसंच पोलीस आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांशी या बैठकीत चर्चा सुरू आहे. विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींशीही आयोग आज संवाद साधणार आहे. ७० सदस्यांच्या दिल्ली विधानसभेचा क...

December 18, 2024 1:21 PM

views 9

देशाच्या भाषा एकात्मतेचा आणि सांस्कृतिक इतिहासाचा महत्त्वाचा आधार – मंत्री जी. किशन रेड्डी

पायाभूत सुविधांचा विकास, आर्थिक विकास आणि कृषी क्षेत्रासोबत सांस्कृतिक विकास आणि एकता यावर सरकारनं विशेष भर दिला आहे. देशाच्या एकात्मतेचा आणि सांस्कृतिक इतिहासाचा महत्त्वाचा आधार देशाच्या भाषा आहेत, असं प्रतिपादन केंद्रीय मंत्री जी. किशन रेड्डी यांनी आज नवी दिल्ली इथं बातमीदारांशी बोलताना केलं.  भार...

December 18, 2024 5:23 PM

views 16

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांची चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांशी प्रमुख द्वीपक्षीय मुद्द्यांवर चर्चा

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित  दोवाल आणि चीनचे परराष्ट्रमंत्री वँग यांनी आज बीजिंग इथं प्रमुख द्वीपक्षीय मुद्द्यांवर चर्चा केली. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर शांतता आणि स्थैर्य प्रस्थापित करणं तसंच पूर्व लडाखमधल्या लष्करी पेचामुळे गेल्या चार वर्षांपासून बिघडलेले परस्पर संबंध कसे सुधारता येतील यावर बै...