December 24, 2024 7:17 PM

views 20

अभिनेता गौरव मोरे यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार प्रदान

मुंबईतल्या फोर्ट इथल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या सिद्धार्थ कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयातर्फे यंदा प्रथमच सुरु करण्यात आलेला डॉ बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार,  प्रसिद्ध अभिनेते गौरव मोरे यांना  देण्यात आला. पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर  यांच्या हस्ते हा पुरस्क...

December 24, 2024 8:04 PM

views 54

‘एक देश एक निवडणूक’ साठी संयुक्त संसदीय समितीची पहिली बैठक ८ जानेवारीला होणार

'एक देश एक निवडणूक' साठी संयुक्त संसदीय समितीची पहिली बैठक येत्या ८ जानेवारी रोजी होणार आहे. भाजपाचे ज्येष्ठ खासदार पी पी चौधरी यांच्या अध्यधतेखाली होणारी ही बैठक प्रास्ताविक स्वरुपाची असणार आहे. कायदा आणि न्याय मंत्रालयाचे प्रतिनीधी समितीच्या ३९ सदस्यांना या दोन्ही विधेयकांबद्दल माहिती देतील. संविध...

December 24, 2024 6:57 PM

views 31

जालन्यात जाफ्राबाद-चिखली मार्गावर प्रवासी बसला अपघात, १५ जखमी

जालनातल्या जाफ्राबाद-चिखली मार्गावर आज सकाळी प्रवासी वाहतूक करणारी एक बस वीस फुट खड्डयात  कोसळून अपघात झाला. या अपघातात चालक आणि वाहकासह १५ प्रवासी जखमी झाले. तीन प्रवाशांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.  चिखली आगाराची ही बस कोळेगाव घाट चढत असताना अचानक स्टेअरिंगचा...

December 24, 2024 6:54 PM

views 20

नाताळनिमित्त उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या शुभेच्छा

उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी नाताळनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. आशा, करुणा आणि एकीचा संदेश देणाऱ्या या सणाच्या दिवशी  सर्वसमावेशक समाजनिर्मितीसाठी झटणाऱ्या अनाम कार्यकर्त्यांचं स्मरण करुया असं उपराष्ट्रपतींनी शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे.   राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनीही नाताळनिमित्त शुभेच...

December 24, 2024 6:43 PM

views 16

केंद्रीय गृहमंत्र्यांच्या विधानावरुन काँग्रेसचं राजकारण – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांची स्मृती जपण्याचं काम केंद्र सरकार आणि भाजपाने केलं आहे मात्र काँग्रेसने त्यांना कोणताही सन्मान दिलेला नाही. त्यांना निवडणूकीत पराभूत केलं. केंद्रीय गृहमंत्र्यांच्या विधानावरुन काँग्रेसने राजकारण केलं असा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी केला. ते नागपूर इथं पत्र...

December 24, 2024 6:41 PM

views 18

निवडणूक नियमात सरकारने केलेल्या दुरुस्तीला आव्हान देणारी काँग्रेसची याचिका

निवडणूक नियमात सरकारने केलेल्या दुरुस्तीला आव्हान देणारी याचिका काँग्रेसने आज सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. केंद्रसरकारने निवडणूकींशी संबधित इलेक्ट्रॉनिक दस्तवेज सर्वसामान्यांना तपासणीसाठी उपलब्ध करुन द्यायला मनाई करणारी सुधारणा  निवडणूक नियम १९६१ मध्ये केली आहे. आयोगाच्या शिफारसीवरुन ही सुधारण...

December 24, 2024 6:36 PM

views 20

राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त राज्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन

राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त आज सांगलीमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयात नियोजन समिती सभागृहात कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं.    सोलापूरात जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त विविध शासकीय विभागांच्या योजनांची माहिती देणाऱ्या स्टॉलचं उद्घाटन जिल्हाधिकारी कुमार ...

December 24, 2024 8:05 PM

views 19

हरित उर्जेच्या माध्यमातून शेतकरी दुसरी हरित क्रांती घडवतील – मुख्यमंत्री

राज्यभरात सौर उर्जेचा वापर करणारी सौर ग्राम तयार करण्यात येत आहेत. यामुळे शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध होणार असून भविष्यात या हरित उर्जेच्या माध्यमातून राज्यातले शेतकरी दुसरी हरित क्रांती घडवतील, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी प्रकल्प 2.0 अंतर्ग...

December 24, 2024 3:39 PM

views 25

ई-कॉमर्समधले गैरव्यवहार रोखण्यासाठीच्या उपाययोजनांचं उद्घाटन

राष्ट्रीय ग्राहक दिनाच्या निमित्ताने ऑनलाईन व्यासपीठांवरचा धोका ओळखण्यासाठी आणि ग्राहकांना सक्षम करण्यासाठी केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांनी आज तीन नव्या ऍपचं उद्घाटन केलं. यात जागो ग्राहक जागो ऍप, जागृती ऍप, आणि जागृती डॅशबोर्डचा समावेश आहे. या ऍपमुळे फसवणुकीच्या प्रकरणाविरोधात का...

December 24, 2024 3:24 PM

views 29

रोजगारासाठी परदेशी जाणाऱ्या नेपाळी नागरिकांसाठी त्रिसूत्री सूचनावली प्रसिद्ध

रोजगारासाठी परदेशी जाणाऱ्या नेपाळी नागरिकांसाठी नेपाळ सरकारने एक त्रिसूत्री सूचनावली प्रसिद्ध केली आहे. म्यानमां, थायलंड, कंबोडिया आणि लाओस या देशांमध्ये रोजगारासाठी जाण्यापूर्वी नेपाळी नागरिकांनी त्यांना रोजगार देणाऱ्या परदेशी कंपन्या आणि संस्थांनी योग्य माध्यमातून व्यवस्थित माहिती घ्यावी अशी सूचना...