December 25, 2024 8:20 PM

views 19

राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांच्या हस्ते विकसित पंचायत कर्मयोगी उपक्रमाचं उद्घाटन

दीर्घकालीन आणि अर्थपूर्ण बदलासाठी शासनपद्धतीतल्या सुधारणांची सुरुवात तळागाळापासून व्हायला हवी, असं प्रतिपादन कर्मचारी, सार्वजनिक तक्रारी आणि निवृत्तीवेतन राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी केलं आहे. सुशासन दिनाच्या निमित्ताने सिंह यांनी आज विकसित पंचायत कर्मयोगी उपक्रमाचं उद्घाटन केलं. त्यावेळी ते ...

December 25, 2024 7:48 PM

views 28

राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत महेश्वरी चौहान आणि अनंतजीत सिंग नारुका जोडीला विजेतेपद

नवी दिल्लीत आज झालेल्या राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत महेश्वरी चौहान आणि अनंतजीत सिंग नारुका या जोडीनं स्कीट मिश्र सांघित प्रकारात विजेतेपद पटाकवलं.डॉ. करणी सिंग शूटिंग रेंजमध्ये झालेल्या अंतिम सामन्यात, महेश्वरी आणि अनंतजीत जोडीनं उत्तर प्रदेशच्या मैराज अहमद खान आणि अरीबा खान यांना ४४-४३ असा पराभव केल...

December 25, 2024 7:43 PM

views 22

नवी दिल्लीत रालोआच्या घटक पक्षांची बैठक

नवी दिल्लीत भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्या निवासस्थानी रालोआच्या घटक पक्षांची बैठक झाली. घटक पक्षांमधील समन्वय दृढ करणं हे या बैठकीचं उद्दिष्ट होतं.  या बैठकीला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह आंध्रप्रदेशाचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, नागरी उड्डाण मंत्री, अवजड उद्योगमंत्री एच...

December 25, 2024 7:05 PM

views 35

EPFO मधे ऑक्टोबरपर्यंत एकूण 13 लाख 41 हजार सदस्यांची नोंदणी

कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी संघटना म्हणजेच EPFO ने या वर्षीच्या ऑक्टोबरपर्यंत एकूण 13 लाख 41 हजार सदस्यांची नोंदणी केली. कर्मचारी आणि रोजगार मंत्रालयाने ही माहिती देताना म्हटलं आहे की वाढत्या रोजगार संधी आणि कर्मचारी कल्याणाबद्दल वाढती जाणीव तसंच EPFO च्या प्रयत्नांमुळे ही वाढ दिसून येत आहे.

December 25, 2024 6:44 PM

views 18

बॉर्डर गावस्कर चषक कसोटी मालिकेतला चौथा सामना उद्यापासून रंगणार

बॉर्डर गावस्कर चषक कसोटी मालिकेतली चौथी कसोटी उद्यापासून मेलबर्न इथं रंगणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार पहाटे पाच वाजल्यापासून सामन्याला सुरुवात होईल. पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत आत्तापर्यंत भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांनी प्रत्येकी एक सामना जिंकला आहे.  

December 25, 2024 8:13 PM

views 33

दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांच्या शतकमहोत्सवी जयंतीनिमित्त देशाची आदरांजली

माजी प्रधानमंत्री दिवंगत अटल बिहारी वाजपेयी यांची आजची शतकमहोत्सवी जयंती आपणा सर्वांसाठी सुशासनाची प्रेरणा घेण्याचा दिवस आहे, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. मध्य प्रदेशातल्या खजुराहो इथं देशातल्या पहिल्या, महत्त्वाकांक्षी आणि बहुद्देशीय केन-बेटवा राष्ट्रीय नदीजोड प्रकल्पाची ...

December 25, 2024 7:46 PM

views 23

आयसीसी कसोटी गोलंदाजी क्रमवारीत जसप्रीत बुमराह अग्रस्थानी

आयसीसी पुरुष कसोटी गोलंदाजी क्रमवारीत भारताचा आघाडीचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह यानं ९०४ गुणांसह पहिलं स्थान मिळवलं आहे. यासोबतच त्यानं कोणत्याही भारतीय गोलंदाजाने मिळवलेल्या सर्वाधिक गुणांच्या विक्रमात फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनच्या विक्रमाशी बरोबरी केली. ब्रिस्बेन कसोटीत ९४ धावांच्या मोबदल...

December 25, 2024 5:43 PM

views 16

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या पश्चिम महाराष्ट्र प्रदेश अधिवेशनाचा समारोप

सोलापूरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या पश्चिम महाराष्ट्र प्रदेश अधिवेशनाचा आज समारोप होत आहे. त्या निमित्तानं काल सोलापूरमधल्या हरिभाऊ देवकरण प्रशालेच्या प्रांगणापासून शोभायात्रा काढण्यात आली होती. त्यामध्ये अभाविप चे पदाधिकारी कार्यकर्ते आणि विद्यार्थी मोठ्या संख्येनं...

December 25, 2024 5:49 PM

views 11

निवडणूक नियमात केंद्र सरकारने केलेल्या दुरुस्तीला काँग्रेसचं सर्वोच्च न्यायालयात आव्हान

निवडणूक नियमात केंद्र सरकारने केलेल्या दुरुस्तीला काँग्रेस पक्षानं सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. निवडणूकींशी संबधित इलेक्ट्रॉनिक दस्तऐवज सर्वसामान्यांना तपासणीसाठी उपलब्ध करुन द्यायला मनाई करणारी सुधारणा निवडणूक नियम १९६१ मध्ये करण्यात आली आहे. मात्र उमेदवारांनी मागणी केल्यास हे दस्तावेज त्या...

December 25, 2024 3:27 PM

views 33

राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या घटकपक्षांची बैठक सुरु

मित्रपक्षांबरोबरचा समन्वय अधिक वृद्धिंगत करण्यासाठी म्हणून भारतीय जनता पार्टीनं पुढाकार घेतला असून पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री जे पी नड्डा यांच्या नवी दिल्लीतल्या निवासस्थानी एनडीए सरकारच्या घटक पक्षांच्या नेत्यांची बैठक सुरु आहे.  या बैठकीला आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाब...