October 28, 2025 8:16 PM

views 33

नक्षलवादी बंडी प्रकाश आणि पी प्रसाद राव यांचं आत्मसमर्पण

नक्षलवाद्यांचे दोन मोठे नेते बंडी प्रकाश आणि पी प्रसाद राव यांनी आज तेलंगणा पोलिसांसमोर हैदराबाद इथं शरणागती पत्करली.  प्रकाश हा मंचेरियल जिल्ह्यातल्या रहिवासी असून शाळकरी वयातच तो नक्षलवादी चळवळीशी जोडला गेला होता. प्रसाद राव हा गेल्या सतरा वर्षांपासून केंद्रीय समितीचा सदस्य असून नक्षलवादी चळवळीशी ...

October 28, 2025 8:13 PM

views 29

जपानचे माजी प्रधानमंत्री शिंजो अबे यांच्या हत्येप्रकरणी आरोपीची कबुली

जपानचे माजी प्रधानमंत्री शिंजो अबे यांच्या हत्येप्रकरणी आरोपी तेत्सुया यामागामी यानं आज न्यायालयात गुन्ह्याची कबुली दिली. ८ जुलै २०२२ रोजी जपानमध्ये नारा इथं निवडणूक प्रचारसभेदरम्यान यामागामीनं शिंजो अबे यांच्यावर गोळ्या झाडल्या होत्या. या हल्ल्यानं संपूर्ण देश हादरून गेला होता आणि युनिफिकेशन चर्चकड...

October 28, 2025 8:09 PM

views 34

मुंबई वातावरण सप्ताह जागतिक परिषदेचं आयोजन

पर्यावरण संवर्धनात भारताचं योगदान अधोरेखित करण्यासाठी मुंबई वातावरण सप्ताह जागतिक परिषद आयोजित केली जाणार असल्याचं  मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी मंत्रालयात झालेल्या बैठकीत सांगितलं. मुख्यमंत्र्यांनी यावेळी परिषदेच्या बोधचिन्हाचं प्रकाशनही केलं.  १७ ते १९ फेब्रुवारी २०२६ दरम्यान मुंबईत होणाऱ्या ...

October 28, 2025 8:05 PM

views 39

हिंदुस्तान एअरोनॉटिक्स कंपनी SJ-100 प्रवासी विमानांचं उत्पादन करणार

हिंदुस्तान एअरोनॉटिक्स ही सरकारी कंपनी आता एसजे -100 या प्रवासी विमानांचं उत्पादन करणार आहे. त्याकरता रशियातल्या सरकारी - खासगी भागीदारीतल्या युनायटेड एअरक्राफ्ट कॉर्पोरेशन या कंपनीबरोबर हालने समझोता करार केला आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी या कराराचं स्वागत केलं असून आत्मनिर्भरतेकडे महत्त्वा...

October 28, 2025 7:41 PM

views 42

नानाजी देशमुख कृषी संजिवनी प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रारंभ

हवामान अनुकूल शेती विकासासाठी राबवल्या जाणाऱ्या नानाजी देशमुख कृषी संजिवनी प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याचा प्रारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांच्या उपस्थितीत आज मुंबईत झाला. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार तसंच कृषीमंत्री दत्तात्रय भरणे उपस्थित होते. प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यात रा...

October 28, 2025 7:31 PM

views 58

महिला क्रिकेटमधे एकदिवसीय क्रिकेट मानांकनात स्मृती मंधाना अग्रस्थानी

महिला क्रिकेटमधे एकदिवसीय क्रिकेटच्या मानांकनात भारताच्या स्मृती मंधानानं अग्रस्थान मिळवलं आहे. या मानांकनात तिची गुणसंख्या ८२८ आहे. दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या ऑस्ट्रेलियाच्या अ‍ॅशले गार्डनरपेक्षा ती शंभराहुन अधिक गुणांनी पुढं आहे. तिची सलामीची जोडीदार प्रतिका रावल ५६४ गुणांसह २७ व्या स्थानावर आहे....

October 28, 2025 7:23 PM

views 193

नागपूरमध्ये शेतकरी संघटनांचं ‘महाएल्गार’ आंदोलन

शेतकऱ्यांची कर्जमुक्ती, शेतमालाला हमीभाव, दिव्यांगांना ६ हजार रुपये मानधन, तसंच मेंढपाळ आणि मच्छीमारांच्या हक्कांसाठी नागपूरमध्ये आज राज्यभरातील शेतकरी संघटना महाएल्गार आंदोलन करत आहेत. आंदोलनात शेतकरी, दिव्यांग, मच्छिमार, मेंढपाळ सहभागी झाले आहेत. या आंदोलनात माजी गृहमंत्री अनिल देशमुख सुध्दा सहभाग...

October 28, 2025 7:02 PM

views 92

अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांसाठी ११ हजार कोटी रुपयांच्या वितरणाला मंजुरी

अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईपोटी आणखी ११ हजार कोटी रुपये पुढच्या १५ दिवसांत शेतकर्‍यांच्या खात्यावर जमा होणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर बातमीदारांशी बोलताना ही माहिती दिली.   राज्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीसाठी सुमारे ३२ हजार कोटी रुपयांचं ...

October 28, 2025 7:27 PM

views 21

सर्व विद्यापीठांनी दर ३ महिन्यांनी कार्यअहवाल सादर करण्याचे राज्यपालांचे निर्देश

राज्यातल्या सर्व विद्यापीठांनी दर तीन महिन्यांनी राजभवनाला कार्यअहवाल सादर करावा असं राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी सांगितलं आहे. राज्यातल्या अकृषी  विद्यापीठांच्या कुलगुरुंशी आज कुलपती या नात्याने दूरदृष्यप्रणालीमार्फत ते बोलत होते. या अहवालात आपल्या अडीअडचणी मांडाव्या असं त्यांनी सांगितलं.  नवीन रा...

October 28, 2025 6:58 PM

views 47

Cabinet Decisions: रबी हंगामासाठी खतांवर ३७,९५२ कोटी अनुदान

रबी हंगामासाठी खतांवर ३७ हजार ९५२ कोटी अनुदान देण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळानं घेतला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक आज नवी दिल्लीत झाली, त्यानंतर वार्ताहरांशी बोलताना माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ही माहिती दिली. यामुळे शेतकऱ्यांना वाजवी दरात खतं उपलब्ध होतील, असं वैष्णव म्ह...