November 4, 2025 8:04 PM

views 33

हिंदुजा उद्योगसमूहाचे अध्यक्ष गोपीचंद हिंदुजा यांचं निधन

प्रसिद्ध उद्योगपती आणि हिंदुजा उद्योगसमूहाचे अध्यक्ष गोपीचंद हिंदुजा यांचं आज लंडनमधे निधन झालं. ते ८५ वर्षांचे होते. ब्रिटनमधल्या सर्वात श्रीमंत व्यक्तिंमधे त्यांचा समावेश होता. मुंबईत हिंदुजा उद्योगसमूहातून त्यांनी कारकिर्दीला प्रारंभ केला होता. गेली दोन वर्षं हिंदुजा समूहाचं अध्यक्षपद त्यांच्याकड...

November 4, 2025 8:03 PM

views 71

महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या क्रमवारीत भारतीय संघ चौथ्या स्थानावर

आयसीसीनं जाहीर केलेल्या महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या सर्वोत्कृष्ट संघात भारताच्या जेमिमा रॉड्रिग्जने पहिल्या दहा फलंदाजात स्थान मिळवलं आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या उपांत्य सामन्यात केलेल्या शतकी खेळीमुळे तिच्या मानांकनात सुधारणा झाली आहे. स्मृती मानधना मात्र अव्वल स्थानावरुन दुसऱ्या स्थानावर घस...

November 4, 2025 7:43 PM

views 2.2K

नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुकींचं २ डिसेंबरला मतदान, मतमोजणी ३ डिसेंबर

राज्यातल्या २४६ नगरपरिषदा आणि ४२ नगरपंचायतींसाठीचा निवडणूक कार्यक्रम आज राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला. यानुसार येत्या २ डिसेंबर रोजी मतदान होणार असून ३ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी आज मुंबईत वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीसाठी १०...

November 4, 2025 7:57 PM

views 33

अमेरिकेचे माजी उपाध्यक्ष डिक चेनी यांचं निधन

अमेरिकेचे माजी उपाध्यक्ष डिक चेनी यांचं आज निधन झालं. चेनी यांनी माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज एच डब्ल्यू बुश यांच्या मंत्रिमंडळात संरक्षणमंत्री म्हणून काम पाहिलं होतं. १९९१ मध्ये झालेल्या आखाती युद्धात त्यांनी महत्वपूर्ण भूमिका निभावली होती. त्यांनी  माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू बुश यांच्या कार्यक...

November 4, 2025 7:53 PM

views 32

छत्तीसगडमधे प्रवासी रेल्वेगाडी अपघातात ४ मृत्यू, २० जण जखमी

छत्तीसगडमधे बिलासपूर इथे लालखदान परिसरात आज प्रवासी रेल्वेगाडीची मालगाडीशी टक्कर होऊन अपघात झाला. दुर्घटनास्थळी  आतापर्यंत ४ मृतदेह सापडले असून अपघातात २० जण जखमी झाले आहेत. रेल्वे विभाग, जिल्हा प्रशासन आणि पोलिसांनी घटनास्थळी बचाव आणि मदतकार्य सुरू केलं आहे.

November 4, 2025 7:51 PM

views 12

लष्कर क्रीडा परिषद २०२५ला नवी दिल्लीत आजपासून सुरुवात

लष्कर क्रीडा परिषद २०२५ला नवी दिल्लीत आजपासून सुरुवात झाली.  २०३६ च्या ऑलिम्पिकमधे यश मिळवण्यासाठी राष्ट्रीय क्रीडा धोरणं, संस्थात्मक चौकट आणि तंत्रज्ञानात्मक नवोन्मेष यांच्यात समन्वय साधण्याबाबत या परिषदेतल्या दोन सत्रांमधे चर्चा झाली. ऑलिम्पिकमधे भारताचा रोडमॅप काय असायला हवा हे ठरवण्यासाठी झालेल्...

November 4, 2025 7:49 PM

views 50

नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांसाठी महायुती सज्ज-गिरीश महाजन

राज्यात होणाऱ्या नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांसाठी महायुती सज्ज असल्याचं मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितलं. महाजन यांच्या हस्ते आज नंदुरबार जिल्हा भाजपा कार्यालयाच्या नव्या इमारतीचं भूमिपूजन  झालं त्यावेळी ते बोलत होते. आघाडी राज्यातल्या दोन तृतीयांश म्हणजेच दोनशे पेक्षा अधिक नागरपालिकांवर विजय म...

November 4, 2025 3:19 PM

views 37

स्टील उत्पादन २०३० पर्यंत ३० कोटी टन तर २०४७ पर्यंत ५० कोटी टन करण्याचं भारताचं उद्दिष्ट

भारताचं स्टील उत्पादन २०३० पर्यंत ३० कोटी टन तसंच २०४७ पर्यंत ५० कोटी टन करण्याचं उद्दिष्ट असल्याचं सरकारनं म्हटलं आहे. नवी दिल्लीत आज सीआयआय स्टील शिखर परिषदेच्या उद्घाटनपर सत्रात स्टील मंत्रालयाचे सचिव संदीप पुंडरीक यांनी ही माहिती दिली. गेल्या दशकभरात भारताचं स्टील उत्पादन दुपटीने वाढलं आहे, पाया...

November 4, 2025 3:10 PM

views 167

महात्मा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत २,३९९ आजारांचा समावेश करण्याला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी

महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजना या दोन्ही योजना अंतर्गत उपचारांच्या यादीत सुधारणा करायला राज्य मंत्रीमंडळानं आज मान्यता दिली आहे. त्यानुसार आता या योजनेत २ हजार ३९९ आजारांचा समावेश केला गेला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी मंत्रिमंडळ बैठकी...

November 4, 2025 3:01 PM

views 103

बुलढाण्यात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा

बुलढाणा जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पाच लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जिल्हा प्रशासनानं सुमारे ३०० कोटी पेक्षा जास्त मदत निधी जमा केल्याची माहिती जिल्ह्यधिकाऱ्यांनी दिली आहे. याशिवाय,  २०२४-२५ मधल्या रखडलेल्या पीक विम्याचे सुमारे १२१ कोटी रुपये ६३ हजारांहून अधिक शेतकऱ्यांच्या बँक खात...