June 15, 2024 1:44 PM

views 51

देशाच्या परकीय चलन साठ्यात ४ अब्ज ३० कोटी ७० लाख अमेरिकन डॉलर्सची वाढ

देशाच्या परकीय चलन साठ्यात ४ अब्ज ३० कोटी ७० लाख अमेरिकन डॉलर्सची वाढ झाली असून ७ जूनला संपलेल्या आठवड्यात तो ६५५ अब्ज ८१ कोटी ७० लाख डॉलर्सवर पोहोचला आहे. आतापर्यंत भारताकडच्या परकीय चलनाचा हा सर्वात जास्त साठा आहे. यापूर्वी सर्वाधिक साठा ६५१ अब्ज ५१ कोटी डॉलर्स इतका गेल्या १० मे रोजी होता.

June 15, 2024 1:31 PM

views 38

शेतकरी सन्मान निधी योजने अंतर्गंत येत्या १८ जूनला ९ कोटी ३ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात सुमारे २० हजार कोटी रुपये जमा होणार

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी १८ जूनला एका कार्यक्रमात प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गंत नऊ कोटी तीन लाख शेतकऱ्यांच्या खात्यात सुमारे २० हजार कोटी रुपये जमा करणार असल्याची माहिती केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आज दिली. नवी दिल्लीत बातमीदारांशी ते बोलत होते. गे...

June 15, 2024 1:18 PM

views 33

अधिवेशनात सर्व राजकीय पक्ष मिळून विधायक कामकाज करतील – मंत्री किरेन रिजिजू

१८व्या लोकसभेचं अधिवेशन येत्या २४ जून पासून सुरु होत असून अधिवेशनात सर्व राजकीय पक्ष मिळून विधायक कामकाज करतील अशी आशा केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी व्यक्त केली आहे. संसदेची प्रतिष्ठा आणि सन्मान राखण्याच्या कामी सर्व सदस्य सहकार्य करतील अशी अपेक्षा त्यांनी समाजमाध्यमावर दिलेल्या स...

June 15, 2024 1:09 PM

views 31

इटलीचा दौरा आटोपून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं आज नवी दिल्लीत आगमन

प्रधानमंत्री  नरेंद्र मोदी इटलीचा दौरा आटोपून आज नवी दिल्लीला परतले. हा दौरा अतिशय फलदायी झाल्याचं प्रधानमंत्र्यांनी समाज माध्यमवरच्या पोस्ट मध्ये म्हटलं आहे. या दौऱ्यात जागतिक नेत्यांशी विविध विषयांवर चर्चा झाली, असं त्यांनी सांगितलं. जागतिक समुदायाला लाभदायक ठरतील अशा प्रभावी उपाययोजना आखण्यासह भा...

June 15, 2024 12:43 PM

views 30

चंद्रयान -१ मोहिमेचे संचालक श्रीनिवास हेगडे यांचं निधन

चंद्रयान -१ या पहिल्या चांद्रमोहिमेचे संचालक श्रीनिवास हेगडे यांचं काल बंगळरू इथल्या खासगी रुग्णालयात निधन झालं. ते ७१ वर्षांचे होते.   हेडगे गेल्या अनेक दिवसांपासून आजारी होते.  तीन दशकांहून अधिक काळ हेगडे भारतीय अंतराळ संशोधन संस्था-इस्रोमध्ये कार्यरत होते. इस्रोच्या अनेक महत्त्वाच्या अंतराळ मोहिम...

June 15, 2024 11:45 AM

views 35

एटीपी चॅलेंजर स्पर्धेत सुमित नागलचा पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत प्रवेश

भारतीय टेनिसपटू सुमित नागलने इटलीतल्या पेरुगिया इथं सुरू असलेल्या एटीपी चॅलेंजर स्पर्धेच्या पुरुष एकेरीत उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. काल झालेल्या उपांत्यपूर्व फेरीत सुमितनं पोलंडच्या मॅक्स कास्निकोव्स्कीचा ६-४, ७-५ असा पराभव केला. सहाव्या मानांकित सुमित नागलनं उत्कृष्ठ खेळी करत १० दिवसांत सलग आठव...

June 15, 2024 1:23 PM

views 26

उच्चशिक्षण संस्थांमधला प्रवेश ३० सप्टेंबरपर्यंत रद्द केल्यास विद्यार्थ्यांना शुल्काचा पूर्ण परतावा

उच्चशिक्षण संस्थांमधला प्रवेश विद्यार्थ्यांनी तीस सप्टेंबरपर्यंत रद्द केल्यास किंवा अन्यत्र प्रवेश घेतल्यास विद्यार्थ्यांना पूर्ण शुल्काचा परतावा देणं संबंधित संस्थेला बंधनकारक राहणार आहे.    विद्यापीठ अनुदान आयोग - यूजीसीनं २०२४-२५ या वर्षासाठी शुल्क परतावा धोरण जाहीर केलं आहे. त्यात पूर्ण परताव्या...

June 15, 2024 11:24 AM

views 32

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची विविध राष्ट्रप्रमुखांबरोबर चर्चा

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जी-सात शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर अनेक नेत्यांशी द्विपक्षीय चर्चा केली. प्रधानमंत्र्यांनी काल दुपारी फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांची भेट घेतली. संरक्षण, आण्विक, अवकाश, शिक्षण, हवामानविषयक तंत्रज्ञान, डिजिटल पायाभूत सुविधा, संस्कृती या क्षेत्रांमध्ये भागिद...

June 15, 2024 1:26 PM

views 21

विकसनशील देशांच्या समस्यांबाबतच्या मुद्द्यांना प्राधान्य देण्याचं प्रधानमंत्र्यांचं G7 देशांच्या शिखर परिषदेत आवाहन

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी विकसनशील देशांबाबतच्या, विशेषतः आफ्रिकेच्या मुद्द्यांना प्राधान्य देण्याचं काल आवाहन केलं. इटलीतील अपुलिया इथं जी-सात देशांच्या शिखर परिषदेत एका सत्रात ते बोलत होते. भारत जी-वीस संघटनेचा अध्यक्ष असताना आफ्रिका संघाचा जी-वीसमध्ये कायमस्वरूपी सदस्य म्हणून समावेश होणं हा...

June 15, 2024 10:51 AM

views 35

साखरेच्या किमान विक्री दरात वाढ करण्याची राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाची मागणी

साखर कारखान्यांकडून घेतल्या जाणाऱ्या घाऊक साखरेच्या, किमान विक्री दरात ३१ वरून ४१ रुपये प्रतिकिलो पर्यंत वाढ करण्याची मागणी राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघानं केंद्र सरकारकडे केली आहे. महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी काल पुण्यात पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. साखर उद्योगासंदर्भात महासं...