July 30, 2024 8:39 PM

views 20

केरळमध्ये वायनाड जिल्ह्यात दरड कोसळून ९३ जणांचा मृत्यू, १२८ जण जखमी

केरळच्या वायनाड जिल्ह्यातल्या मुंडक्काई, अट्टामाला आणि चूरमाला या भागात मुसळधार पावसामुळे आज भूस्खलन झाल्यानं ९३ जणांचा मृत्यू झाला तर १२८ हून अधिक जण जखमी झाले. जखमींवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. भूस्खलन झालेल्या भागात एनडीआरएफचं पथक, लष्कर तसंच नौदलाचे जवान बचावकार्य करत आहेत. मुंडक्काईच्या...

July 30, 2024 7:25 PM

views 21

आरक्षणाच्या प्रश्नावर सर्व समाजाच्या नेत्यांशी चर्चा करुन तोडगा काढण्याची उद्धव ठाकरे यांची मागणी

आरक्षणाच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी सर्व समाजाच्या नेत्यांना बोलावून चर्चा करावी आणि सर्वमान्य तोडगा काढावा, अशी मागणी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. ते आज मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते. आरक्षणाचा प्रश्न लोकसभेतच सुटू शकतो, हे अधिकार राज्यांना नाहीत, असं ते म्हणाले. केंद्र सरका...

July 30, 2024 3:34 PM

views 34

रायगडमध्ये मुसळधार पावसामुळे आतापर्यंत ४ जणांचा मृत्यू

रायगड जिल्ह्यात गेल्या १५ दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आतापर्यंत ४ जणांचा मृत्यू झाला आहे. सतत सुरू असलेल्या पावसामुळे ५०० घरांची पडझड झाली आहे. मुसळधार पावसामुळे सावित्री, अंबा, कुंडलिका आदी नद्यांना पूर आल्याने आतापर्यंत ३ हजार ३८९ जणांना स्थलांतरित केलं असून शासनाकडून त्यांना सर्व ...

July 30, 2024 3:19 PM

views 17

‘आदिवासी शेतकऱ्यांना योजनांचा लाभ मिळण्यासाठी सहकार विभागानं प्रस्ताव सादर करावा’

राज्यातल्या आदिवासी विकास कार्यकारी सहकारी संस्थांच्या विविध मागण्यांसंदर्भात आज मंत्रालयात बैठक झाली. आदिवासी शेतकऱ्यांना कर्जमाफीच्या विविध योजनांचे लाभ मिळत नाहीत. त्यांना या योजनांचे लाभ मिळावेत म्हणून आदिवासी विभाग तसंच सहकार विभागानं सर्वसमावेशक प्रस्ताव सादर करावा, अशी सूचना उपमुख्यमंत्री अजि...

July 30, 2024 7:38 PM

views 29

पॅरिस ऑलिम्पिक : नेमबाजीत मनु भाकर आणि सरबजोत सिंगच्या जोडीला कास्यपदक

पॅरिस ऑलिंपिक मध्ये भारतीय नेमबाज मनु भाकर आणि सरबजोत सिंग या जोडीनं पॅरिस ऑलिपिंकमधे १० मीटर एअर पिस्तुल प्रकारात मिश्र दुहेरी गटातं कांस्य पदक पटकावलं आहे. स्वातंत्र्योत्तर काळात एकाच क्रीडा प्रकारात एकाच ऑलिंपिकमधे दोन पदकं मिळवणारी मनु भाकर ही पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे. सरबजोत सिंग याने त्याच...

July 30, 2024 8:37 PM

views 33

राज्याचे मावळते राज्यपाल रमेश बैस यांना निरोप

राज्याचे मावळते राज्यपाल रमेश बैस यांना आज निरोप देण्यात आला. राजभवनात झालेल्या या निरोप सभारंभाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस आणि अजित पवार, तसंच राजभवनातले अधिकारी - कर्मचारी उपस्थित होते.       नवनियुक्त राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांचा शपथविधी समारंभ उद्य...

July 30, 2024 2:55 PM

views 24

नवी मुंबई इथं घडलेल्या २२ वर्षीय तरुणीच्या हत्या प्रकरणात दाऊद शेख याला अटक

नवी मुंबई इथं घडलेल्या २२ वर्षीय तरुणीच्या हत्या प्रकरणात फरार आरोपी दाऊद शेख याला कर्नाटकात अटक करण्यात आली. त्याच्यासह अन्य एकालाही अटक करण्यात आली आहे. २७ जुलै रोजी उरण इथं निर्जन ठिकाणी एका तरुणीचा छिन्नविछिन्न अवस्थेतला मृतदेह सापडला होता.

July 30, 2024 8:40 PM

views 28

हावडा – मुंबई एक्सप्रेसला अपघातात दोन प्रवाशांचा मृत्यू, २४ जण जखमी

हावडा - मुंबई एक्सप्रेसला झारखंड इथं झालेल्या अपघातात दोन प्रवाशांचा मृत्यू झाला असून २४ जण जखमी झाले आहेत. इथलं बचावकार्य पूर्ण झालं असून जखमींना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आहे. मृतांच्या कुटुंबांना दहा लाख रुपये, गंभीर जखमींना पाच लाख आणि जखमी प्रवाशांना एक लाख रुपये मदत रेल्वेने जाहीर केली आ...

July 30, 2024 2:42 PM

views 10

आजारांना प्रतिबंध करणाऱ्या उपायांवर अधिक भर द्या- डॉ. अरुण गोयल

आजाराचं निदान आणि त्यासाठीच्या उपचारपद्धतींपेक्षा आजारांना प्रतिबंध करणाऱ्या उपायांवर अधिक भर द्यायला हवा असं आरोग्य सेवा महासंचालक डॉ. अरुण गोयल यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्लीत आयोजित विविध वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असलेल्या व्यावसायिकांच्या बैठकीत बोलत होते.   डॉ. गोयल यांच्या अध्यक्षतेख...

July 30, 2024 1:27 PM

views 17

आगामी काळात भारत रशिया आणि युक्रेन या दोन्ही देशांसोबत संपर्क वाढवणार- एस. जयशंकर

भारत आगामी काळात रशिया आणि युक्रेन या दोन्ही देशांसोबत संपर्क वाढवेल, या दोन देशातला संघर्ष निवळण्यासाठी हा संपर्क महत्वाचा ठरेल असं परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांनी सांगितलं. जपानमधल्या राष्ट्रीय क्लबमध्ये, वार्ताहरांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या पुढच्या महिन्यातल्या युक्रेन दौऱ्याव...