July 31, 2024 3:29 PM

views 18

पुणे, कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात पावसाचा जोर कायम

महाराष्ट्रात पुणे, कोल्हापूर, सांगली या जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे. पुणे आणि सांगली जिल्ह्याच्या विविध भागात सकाळपासून पावसाच्या सरी कोसळत आहेत. सखल भागांमध्ये पाणी भरू लागलं आहे. धरण क्षेत्रामध्ये पाऊस सुरू असल्यानं, दोन्ही जिल्ह्यातल्या नदीकाठच्या लोकांनी सतर्क राहण्याचा इशारा प्रशासनानं दिला ...

July 31, 2024 3:25 PM

views 27

सांगली जिल्ह्यातल्या वारणा धरणात २९ पूर्णांक २५ टीएमसी पाणीसाठ्याची नोंद

सांगली जिल्ह्यातल्या वारणा धरणात आज सकाळी २९ पूर्णांक २५ टीएमसी पाणीसाठ्याची नोंद झाली असून ३४ पूर्णांक ४० टीएमसी इतकी या धरणाची साठवण क्षमता आहे. कोयना धरणातून ४२ हजार १०० क्यूसेक इतका, वारणा धरणातून ८ हजार ९२ हजार क्यूसेक तर अलमट्टी धरणातून ३ लाख ५० हजार क्युसेक इतका विसर्ग सुरू असल्याची माहिती जल...

July 31, 2024 3:18 PM

views 27

यशश्री शिंदे हत्या प्रकरणातला आरोपी दाऊद शेखला ७ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी

नवी मुंबईत उरण इथं यशश्री शिंदे हत्या प्रकरणातला आरोपी दाऊद शेख याला पनवेलच्या न्यायदंडाधिकाऱ्यांनी ७ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. त्याच्यावर अत्याचाराचा गुन्हाही नोंदवण्यात आला आहे. आरोपीची पीडितेशी शाळेत असल्यापासून ओळख होती, याआधी २०१९ मध्ये पीडितेचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी आरोपीविरोधात पोक्...

July 31, 2024 2:47 PM

views 29

दिल्ली उत्पादन शुल्क घोटाळ्या प्रकरणी अटक असलेल्या मंत्र्यांच्या कोठडीत ९ ऑगस्टपर्यंत वाढ

दिल्ली उत्पादन शुल्क घोटाळ्याशी संबंधित अटकेत असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया आणि भारत राष्ट्र समिती पक्षाच्या के. कविता यांची न्यायालयीन कोठडी दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू न्यायालयाने येत्या ९ ऑगस्टपर्यंत वाढवली आहे. या तिघांची न्यायालयीन कोठडीची मुदत आज स...

July 31, 2024 1:43 PM

views 16

जपानच्या टोकियो शहरात काल मध्यरात्री भूकंपाचे धक्के

जपानच्या टोकियो शहरात काल मध्यरात्रीनंतर पावणेदोनच्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले.रिक्टर मापकावर त्याची तीव्रता ४ पूर्णांक ७ दशांश नोंदली गेली.टोकियो, कानागावा, आणि चिबा या भागात हे धक्के जाणवले.भूकंपात कोणतीही हानी झाल्याचं वृत्त नाही.

July 31, 2024 1:35 PM

views 26

घड्याळ चोरीप्रकरणी बिहारच्या चंपारण्य जिल्ह्यातून १० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

मुंबईतल्या एका घड्याळाच्या दुकानाचं शटर तोडून २५ लाख रुपयांच्या घड्याळ चोरीप्रकरणी बिहारच्या चंपारण्य जिल्ह्यातून १० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणातील ३ आरोपींना याआधीच मुंबईत अटक करण्यात आली होती. दोन दिवसांपूर्वीच या परिसरातून मुंबई पोलिसांनी ५३ लाख रुपयांच्या मोबाईल चोरी ...

July 31, 2024 1:33 PM

views 13

भारतीय माहिती सेवेतले माजी अधिकारी सुरेश चंद्र शर्मा यांचं आज नवी दिल्ली इथं निधन

भारतीय माहिती सेवेतले माजी अधिकारी सुरेश चंद्र शर्मा यांचं आज नवी दिल्ली इथं निधन झालं. ते ८३ वर्षांचे होते. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अनेक विभागांमध्ये त्यांनी काम केलं. आकाशवाणीच्या वृत्त सेवा विभागाच्या सहसंचालक पदावरून ते २०००मध्ये निवृत्त झाले होते.

July 31, 2024 1:15 PM

views 19

बुलेट रेल्वे प्रकल्पाचं काम वेगाने पुढे जात असल्याची रेल्वेमंत्र्यांची लोकसभेत ग्वाही

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज लोकसभेच्या कामकाजाला सुरुवात होताच जातनिहाय जनगणना करण्याच्या मागणीवरून विरोधकांनी गदारोळ केल्यानं लोकसभेचं कामकाज १२ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं होतं. कामकाजाला पुन्हा सुरुवात होताच प्रश्नोत्तरांचा तास पुकारण्यात आला. बुलेट रेल्वे प्रकल्पाचं काम वेगाने पुढे जात ...

July 31, 2024 1:18 PM

views 13

देशातल्या नवनियुक्त राज्यपालांचा शपथविधी

महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचा शपथविधी समारंभ आज संध्याकाळी साडे सहा वाजता राजभवनात होणार आहे. सी. पी. राधाकृष्णन हे झारखंडचे राज्यपाल होते. काल मावळते राज्यपाल रमेश बैस यांना राजभवनात आयोजित समारंभात निरोप देण्यात आला.   राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी २८ जुलै रोजी व...

July 31, 2024 1:09 PM

views 24

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी माजी केंद्रीय आरोग्य सचिव प्रीती सुदन यांची नियुक्ती

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी माजी केंद्रीय आरोग्य सचिव प्रीती सुदन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्या भारतीय प्रशासकीय सेवेच्या १९८३मधल्या तुकडीतल्या अधिकारी आहेत.   राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सुदन यांच्या नियुक्तीला मंजुरी दिली. उद्यापासून प्रीती सुदन पदभार स्वीकारतील. केंद्रीय...