August 2, 2024 6:37 PM

views 23

‘मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी मराठी भाषेतले अर्ज ग्राह्य धरले जातील’

'मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी मराठी भाषेत केलेले अर्ज ग्राह्य धरले जातील, असं महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी आज स्पष्ट केलं. या योजनेला राज्यात उत्तम प्रतिसाद मिळत असून अर्जाच्या प्रक्रियेत काही तांत्रिक अडचणी आल्यामुळे मराठी भाषेतल्या अर्जांचा विषय चर्चेला आला होता. परंतु ही...

August 2, 2024 6:31 PM

views 32

नागपूरसाठी १२०० कोटींहून जास्त निधीचा विकास आराखडा मंजूर – उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर जिल्ह्यासाठी बाराशे कोटी रुपयांपेक्षा जास्त निधीचा विकास आराखडा जिल्हा नियोजन विकास बैठकीत मंजूर करण्यात आला आहे. जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी ५ हजार कोटीपेक्षा जास्त मूल्याची कामं राज्य शासनाच्या वतीने करण्यात येतील, अशी माहिती उपमुख्यमंत्री आणि नागपूरचे पालकमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी...

August 2, 2024 5:52 PM

views 33

वाशिम शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या एकबुर्जी प्रकल्पात ३५ टक्के पाणीसाठा उपलब्ध

वाशिम जिल्ह्यात पावसानं  सरासरी ओलांडली असली तरी वाशिम शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या एकबुर्जी प्रकल्पामध्ये मात्र पाण्याचा साठा वाढलेला नाही. या प्रकल्पात केवळ पस्तीस टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. पावसाळा सुरू होऊन दोन महिने झाले तरी या प्रकल्पातला जलसाठा वाढला नसल्याने वाशिमकरांमध्ये चिंता पसरली आहे. या ...

August 2, 2024 7:31 PM

views 30

जोरदार पावसामुळे नंद्यांच्या पाणीपातळीत वाढ

राज्यात अनेक ठिकाणी होत असलेल्या जोरदार पावसामुळे विविध ठिकाणच्या नद्या आणि तलाव भरून वाहत आहेत.   सांगली जिल्ह्यात कृष्णा आणि वारणा नदीच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस पडत असल्यानं वारणा आणि कोयना धरणातून नदीपात्रात विसर्ग करण्यात येत आहे. त्यामुळे जिल्ह्यातल्या ५ हजारहून अधिक जणांना पशुधनासह सुरक्ष...

August 2, 2024 3:29 PM

views 22

तिरंदाजीत भारताचे अंकिता भकत आणि धीरज बोम्मदेवरा मिश्र सांघिक स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीसाठी पात्र

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताचा आजचा दिवस सकारात्मक पद्धतीनं सुरू झाला. तिरंदाजीत अंकिता भकत आणि धीरज बोम्मदेवरा यांनी मिश्र प्रकारात इंडोनेशियाच्या जोडीचा ५-१ असा पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत जागा मिळवली. यंदा दोन कास्यपदकांवर नाव कोरणारी नेमबाज मनू भाकर २५ मीटर पिस्टल प्रकारात पुढच्या फेरीत दाखल झाली...

August 2, 2024 3:22 PM

views 37

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून रुग्णांना ३०१ कोटी रुपये वितरित

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षानं राज्यातल्या हजारो रुग्णांचे प्राण वाचवले असून या योजने अंतर्गत गेल्या २ वर्षं १ महिन्याच्या काळात रुग्णांना ३०१ कोटी रुपये अर्थसहाय्य वितरित करण्यात आल्याचं मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षानं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे.   मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय...

August 2, 2024 8:08 PM

views 18

कृषीक्षेत्राचा विकास आणि शेतकऱ्यांच्या कल्याणाकरता केंद्रसरकार वचनबद्ध – कृषिमंत्री शिवराजसिंग चौहान

कृषीक्षेत्राचा विकास आणि शेतकऱ्यांच्या कल्याणाकरता केंद्र सरकार वचनबद्ध असून यंदाच्या अर्थसंकल्पात कृषिक्षेत्रासाठी १ लाख ३२ हजार कोटी रुपयांपेक्षाही जास्त रकमेची तरतूद केली असल्याचं केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंग चौहान यांनी आज राज्यसभेत सांगितलं. केंद्र सरकारनं प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत ...

August 2, 2024 2:37 PM

views 20

नायजेरियातील एका स्थानिक बाजारात एका स्फोटात २० जण ठार

नायजेरियाच्या ईशान्येकडील बोर्नो राज्यातील एका स्थानिक बाजारात काल रात्री झालेल्या स्फोटात २० जण ठार झाले असून अनेकजण जखमी झाले आहेत. स्फोटानंतर या भागात गोळीबार करण्यात आल्याची माहिती बोर्नो पोलिसांनी दिली आहे. बोको हराम दहशतवादी गटानं हा स्फोट घडवून आणल्याचंही पोलिसांनी म्हटलं आहे. बोर्नो राज्यातल...

August 2, 2024 3:32 PM

views 42

इस्रायलमध्ये अमेरिकन लष्कर तैनात करण्यासंदर्भात अमेरिका आणि इस्रायल यांच्यात चर्चा

इस्रायलमध्ये अमेरिकन लष्कर तैनात करण्यासंदर्भात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडन यांनी काल इस्रायलचे प्रधानमंत्री बेंजामिन नेत्यन्याहू यांच्याशी दूरध्वनीवरुन चर्चा केली. इस्रायलवर हल्ले करण्याची धमकी इराणने दिली होती. या पार्श्वभूमीवर ही चर्चा झाली. इराण किंवा हमासच्या संभाव्य हल्ल्यांच्या पार्श्...

August 2, 2024 2:31 PM

views 31

मुंबईतल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मंडपांसाठीची परवानगी पत्रे ६ ऑगस्टपासून दिली जाणार

मुंबईतल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मंडपांसाठीची परवानगी पत्रे ६ ऑगस्टपासून दिली जाणार आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या प्रसिद्धी पत्रकात ही माहिती देण्यात आली असून गणेश मंडळे महानगनपालिकेच्या यासाठी तयार करण्यात आलेल्या पोर्टवर जाऊन त्याची प्रक्रिया पूर्ण करु शकतील. ज्या मंडळांनी गेल्या दहा ...