August 7, 2024 10:01 AM

views 40

प्रधानमंत्री जनधन योजनेच्या खात्यांना किमान शिल्लक रकमेचा नियम लागू नसल्याचं निर्मला सीतारामन यांचं स्पष्टीकरण

बँकांमधल्या प्रधानमंत्री जनधन योजनेच्या खात्यांना तसंच बचत खात्यांना किमान शिल्लक रकमेचा नियम लागू नसल्याचं स्पष्टीकरण केंद्रिय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिलं आहे. त्या काल राज्यसभेत प्रश्नोत्तराच्या तासात बोलत होत्या. किमान शिल्लक रकमेचा नियम न पाळल्याबद्दल विविध बँकांनी खातेदारांना दंड आका...

August 7, 2024 9:47 AM

views 22

बांग्लादेशमधला भारतीय दूतावास तिथल्या भारतीय नागरिकांच्या सतत संपर्कात

बांग्लादेशमधलं भारतीय दूतावासाचं कार्यालय तिथल्या भारतीय नागरिकांच्या सतत संपर्कात असल्याचं काल सरकारनं संसदेत सांगितलं. तिथल्या अल्पसंख्याकांच्या बाबतीतल्या परिस्थितीवर सरकार लक्ष ठेवून आहे असं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस. जयशंकर बांग्लादेशमधल्या स्थितीवर चर्चा करताना म्हणाले. या घडीला 19 हज...

August 8, 2024 9:42 AM

views 38

देशाची प्रगती आणि रोजगारनिर्मितीला चालना देण्याचा सरकारचा दृष्टिकोन – अर्थमंत्री निर्मला सीतारमण

करविषयक कायदे आणि प्रक्रियांचं सुलभीकरण करून त्याद्वारे देशाची प्रगती आणि रोजगार निर्मितीला चालना देण्याचा सरकारचा दृष्टिकोन असल्याची ग्वाही अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी काल लोकसभेत दिली. अर्थ विधेयक 2024 वरच्या चर्चेला त्या उत्तर देतांना त्या बोलत होत्या.   गेल्या दशकात कर रचनेत आमूलाग्र ब...

August 7, 2024 9:04 AM

views 25

युनायटेड किंग्डमच्या दंगलग्रस्त भागात प्रवास न करण्याची भारतीय उच्चायुक्तालयाची सूचना

युनायटेड किंग्डममधल्या गेल्या काही दिवसांतल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर त्या देशात प्रवासाला जाताना सतर्क राहून काळजी घेण्याचा सल्ला लंडनच्या भारतीय उच्चायुक्तालयानं दिला आहे.   भारतीयांनी युकेमध्ये येण्यापूर्वी इथल्या स्थानिक बातम्या आणि स्थानिक सुरक्षा संस्थांनी दिलेल्या सूचना लक्षात घ्याव्...

August 6, 2024 8:09 PM

views 28

केदारनाथधाम परिसरात सुरु असलेलं बचाव कार्य जवळपास पूर्ण

उत्तराखंडमधल्या रुद्रप्रयाग जिल्ह्यामध्ये केदारनाथधाम परिसरात सुरु असलेलं बचाव कार्य जवळपास पूर्ण झालं आहे, अशी माहिती उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी यांनी दिली. दरड कोसळण्याच्या घटना आणि अतिवृष्टीमुळे या भागात अडकलेल्या १२ हजारांहून अधिक यात्रेकरूंना विक्रमी वेळेत सुरक्षित ठिकाणी हलवण्यात...

August 6, 2024 8:05 PM

views 22

प्रधानमंत्री जनधन बँक खातं तसंच बचत खात्यात किमान रक्कम शिल्लक ठेवण्याची गरज नसल्याचं केंद्रीय अर्थमंत्र्यांकडून स्पष्ट

प्रधानमंत्री जनधन बँक खातं तसंच बचत खात्यात किमान रक्कम शिल्लक ठेवण्याची गरज नाही, असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज राज्यसभेत स्पष्ट केलं. खात्यात किमान रक्कम शिल्लक न ठेवणाऱ्या खातेदारांकडून बँकेनं दंड वसूल केल्याच्या संदर्भात विचारलेल्या प्रश्नाला त्या उत्तर देत होत्या.  राज्यसभेत...

August 6, 2024 8:01 PM

views 27

काळा पैसा विरोधी आणि कर चुकवेगिरी कायद्यांतर्गत १७ हजार कोटी रुपयांहून अधिक रकमेसंबंधात ६५२ प्रकरणं उघडकीस

मागच्या आर्थिक वर्षाच्या अखेरपर्यंत काळा पैसा विरोधी आणि कर चुकवेगिरी कायद्यांतर्गत १७ हजार कोटी रुपयांहून अधिक रकमेसंबंधात ६५२ प्रकरणं उघडकीला आली असून यापैकी १६३ प्रकरणात खटले दाखल केले आहेत, अशी माहिती अर्थराज्यमंत्री पंकज चौधरी यांनी  लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली.  पीएम किसान सन्मान...

August 6, 2024 7:53 PM

views 23

भारतीय दूतावासाकडून युकेला भेट देणाऱ्या भारतीय नागरिकांसाठी मार्गदर्शक सूचना जारी

युनायटेड किंगडमच्या काही भागांत झालेली हिंसक आंदोलनं आणि संघर्षाच्या पार्श्वभूमीवर, लंडनमधल्या भारतीय दूतावासानं युकेला भेट देणाऱ्या भारतीय नागरिकांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. युकेच्या साऊथ पोर्ट भागात हिंसाचारामध्ये तीन मुलांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर हल्लेखोरांबद्द्दल चुकीची माहिती ...

August 6, 2024 7:33 PM

views 19

केरळ आणि आसामला महाराष्ट्र शासनाकडून प्रत्येकी १० कोटींची मदत

केरळच्या वायनाड जिल्ह्यात मुसळधार पावसामुळं दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत जीवित आणि वित्तहानी झाली. या परिस्थितीवर मात करण्यासाठी महाराष्ट्र शासनानं केरळला १० कोटी रुपयांची मदत दिली आहे. तसंच जुलै महिन्यात आसाम राज्यात पूरस्थितीमुळे मोठ्या प्रमाणात हानी झाली. त्यातून सावरण्यासाठी आसामलाही महाराष्ट्र...

August 6, 2024 7:29 PM

views 16

उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना राज्यशासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग पुरस्कार

यंदाच्या गणेशोत्सवात राज्यातल्या उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना राज्यशासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग पुरस्कार देऊन गौरवणार आहे. मुंबई, मुंबई उपनगर, पुणे, ठाणे या ४  जिल्ह्यातून प्रत्येकी ३  आणि अन्य जिल्ह्यातून प्रत्येकी एक याप्रमाणे एकूण ४४ प्राप्त शिफारशींमधून गुणांकन आणि संबंधित कागदपत्रांच...