August 15, 2024 7:04 PM

views 26

लाडकी बहीण योजनेच्या ८० लाखांहून अधिक लाभार्थ्यांच्या खात्यात पहिल्या दोन हप्त्यांचे पैसे जमा

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या पहिल्या हप्त्याची रक्कम जमा होण्याची प्रक्रिया सुरू झाली असून  आतापर्यंत 80 लाखापेक्षा अधिक पात्र महिलांना या योजनेचा लाभ लाभ देण्यात आला आहे, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी आज दिली. १४ ऑगस्टपर्यत १ कोटी ६२ लाखापेक्षा अधिक महिलांनी नोंदणी...

August 15, 2024 4:07 PM

views 23

राज्यात स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

राज्यात सर्वत्र स्वातंत्र्यदिन उत्साहाने साजरा करण्यात येत आहे.   राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी पुण्यातल्या राजभवनात राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. राज्यपालांनी उपस्थित लोकप्रतिनिधी तसेच नागरिकांची भेट घेऊन त्यांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल...

August 15, 2024 3:44 PM

views 16

प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या दूरदृष्टीमुळे देशाच्या प्रगतीचा पाया रचला – नाना पटोले

शेतकरी, कामगार आणि जवानांनी हा देश उभा केला असून देशाचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या दूरदृष्टीमुळे देशाच्या प्रगतीचा पाया रचला गेला, असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलं आहे. मुंबईत टिळक भवन मुख्यालयात नाना पटोले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत ...

August 15, 2024 3:40 PM

views 23

प्रधानमंत्र्यांच्या भाषणात आत्मनिर्भर आणि विकसित भारताच्या संकल्पाचं प्रतिबिंब दिसतं – गृहमंत्री अमित शाह

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनी देशाला उद्देशून केलेल्या भाषणात आत्मनिर्भर आणि विकसित भारताच्या संकल्पाचं प्रतिबिंब दिसतं, असं मत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी व्यक्त केलं आहे. गेल्या दहा वर्षात झालेल्या विकासातून प्रेरणा घेऊन देशाला पुढे घेऊन जाण्याची वचनबद्धता या भाषणातून दिसते...

August 15, 2024 3:37 PM

views 47

उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या स्वातंत्र्यदिनाच्या देशवासियांना शुभेच्छा

स्वातंत्र्य दिनानिमित्त उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी सर्व नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत. स्वातंत्र्य दिन हा न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुतेच्या आदर्शांचा उत्सव असून जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाहीचा पाया आहे, असं धनखड आपल्या समाज माध्यमावरच्या संदेशात म्हणाले. सर्व नागरिकांना २०४७ पर्यंत विकसि...

August 15, 2024 1:43 PM

views 18

विनेश फोगटची याचिका फेटाळल्यानंतर भारतीय ऑलिम्पिक संघटनेचा पुढील पर्यायांवर विचार

पॅरिस ऑलिम्पिकमधील महिलांच्या ५० किलो वजनी गटात रौप्य पदकासाठी भारताची कुस्तीपटू विनेश फोगटची याचिका क्रीडा लवादाने फेटाळल्यानंतर भारतीय ऑलिम्पिक संघटना पुढील कायदेशीर पर्यायांवर विचार करत आहे.   या निकालानंतर, भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्ष पी टी उषा यांनी कुस्तीपटू विनेश फोगटचा, युनायटेड ...

August 15, 2024 1:39 PM

views 26

भारताच्या ७८व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त विविध देशांच्या नेत्यांनी केलं अभीष्टचिंतन

भारताच्या ७८व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त विविध देशांच्या नेत्यांनी अभीष्टचिंतन केलं आहे. अमेरिकेचे परराष्ट्रव्यवहार मंत्री अँटनी ब्लिंकन यांनी भारत अमेरिका संबंध विस्तारत असल्याचं आपल्या शुभेच्छासंदेशात म्हटलं आहे.   इस्राएलने ही भारताला स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. इस्राएलचे राजदूत नाओर...

August 15, 2024 1:36 PM

views 36

जागतिक आरोग्य संघटनेनं एमपॉक्स आजारावरुन घोषित केली आणीबाणी

जागतिक आरोग्य संघटनेनं दोन वर्षांत दुसऱ्यांदा एमपॉक्स या आजारावरुन आणीबाणी घोषित केली आहे. मध्य आफ्रिकेतल्या काँगो देशात या विषाणूजन्य संसर्गाचा उद्रेक झाल्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रोस घेब्रेयसस यांनी ही घोषणा केली.   बुरुंडी, केनिया, रवांडा आणि युगांडा या देशांमध्येही त्याचा...

August 15, 2024 1:29 PM

views 33

सक्तवसुली संचालनालयाच्या पूर्णवेळ संचालकपदी राहुल नवीन यांची नियुक्ती

जेष्ठ महसुली अधिकारी राहुल नवीन यांची सक्तवसुली संचालनालयाच्या पूर्णवेळ संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या नेमणूक समितीनं त्यांच्या नावाला मंजुरी दिली आहे. सध्या राहुल नवीन हे इडीचे विशेष संचालक म्हणून कार्यरत आहेत त्यांनी नवी नियुक्ती २ वर्षांसाठी असेल.

August 15, 2024 1:13 PM

views 24

नवी दिल्लीत प्रसारभारतीचे अध्यक्ष नवनीतकुमार सेहगल यांच्या हस्ते ध्वजारोहण

७८व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त प्रसारभारतीचे अध्यक्ष नवनीतकुमार सेहगल यांच्या हस्ते आज नवी दिल्लीतल्या दूरदर्शन भवनात ध्वजारोहण करण्यात आलं.   आकाशवाणीच्या महासंचालक मौशुमी चक्रवर्ती यांच्या हस्ते नवी दिल्लीतल्या आकाशवाणी परिसरात ध्वजारोहण झालं. आकाशवाणी मुंबईच्या नवीन प्रसारणभवनातही ध्वजवंदनाचा कार्...