August 18, 2024 8:40 PM

views 27

उत्तर प्रदेशात बस आणि पिकअप यांची धडक होऊन १० कामगारांचा मृत्यू, ३७ जण जखमी

उत्तर प्रदेशात, बुलंदशहर जिल्ह्यातल्या सालेमपूर भागात एक बस आणि पिकअप यांची धडक होऊन १० जणांचा मृत्यू झाला तर ३७ जण जखमी झाले. अपघातग्रस्त पिकअपमधले कामगार गाझियाबादहून रक्षाबंधनाच्या सणासाठी अलीगड जिल्ह्यातल्या रायपूर या गावी निघाले होते.  जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केलं आहे, तर चार गंभीर जखमी...

August 18, 2024 8:31 PM

views 27

नागरिकत्व सुधारणा कायदा नागरिकत्व काढून घेणारा नसून नागरिकत्व देणारा असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं प्रतिपादन

नागरिकत्व सुधारणा कायदा नागरिकत्व काढून घेणारा नसून नागरिकत्व देणारा आहे, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. त्यांनी आज अहमदाबाद इथं आयोजित कार्यक्रमात १८८ हिंदू निर्वासितांना या कायद्यांतर्गत नागरिकत्व प्रमाणपत्रांचं वाटप केलं. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी शहा यांनी काँग्रेसवर टीका ...

August 18, 2024 7:00 PM

views 20

लाडकी बहीण योजना थांबणार नसल्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही

महाराष्ट्रातल्या बहि‍णींना आता कुणापुढे हात पसरण्याची गरज उरणार नाही, कारण त्यांच्या तीन भावांनी त्यांना आत्मनिर्भर करण्याचा प्रयत्न केलेला आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज साताऱ्यात केलं. महिला सशक्तीकरण अभियानात ते बोलत होते. काही सावत्र भाऊ या योजनेला विरोध करत न्यायालयात गेले आहे...

August 18, 2024 7:00 PM

views 24

२६/११च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याचा संशयित तहव्वुर राणाच्या भारतात प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा

२६/११च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याचा संशयित तहव्वुर राणा याला भारतात पाठवण्याची परवानगी अमेरिकेच्या एका न्यायालयानं दिली आहे. भारत-अमेरिका प्रत्यार्पण कराराअंतर्गत राणाला भारताच्या ताब्यात देणं शक्य असल्याचा निर्वाळा न्यायालयानं दिला. भारतात पाठवण्याच्या हालचालींच्या विरोधात राणानं न्यायालयात धाव घेतल...

August 18, 2024 6:58 PM

views 23

आरोग्य कर्मचाऱ्यांवरील हल्ले रोखण्यासाठी कायदा आणण्याची भारतीय वैद्यकीय संघटनेची प्रधानमंत्र्यांकडे मागणी

कोलकात्याच्या महिला डॉक्टर बलात्कार आणि हत्या प्रकरणी भारतीय वैद्यकीय संघटनेनं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून आरोग्य सेवा क्षेत्रातल्या कर्मचाऱ्यांवर होणारे हल्ले रोखण्यासाठी कायदा आणण्याची मागणी केली आहे. सर्व रुग्णालयांमध्ये सुरक्षेसंबंधीचे नियम विमानतळांवरच्या नियमांइतके कडक करावेत, स...

August 18, 2024 4:04 PM

views 20

राज्यातील काही भागात जोराच्या वाऱ्यासह पावसाचा इशारा

  राज्यात मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्र आणि कोकणात तुरळक ठिकाणी आज विजा आणि जोराच्या वाऱ्यासह पावसाचा इशारा हवामान विभागानं वर्तवला आहे. विदर्भातही तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. दरम्यान, येत्या दोन-तीन दिवसांत पश्चिम बंगालसह हिमालयाशी जोडलेला भाग ईशान्येकडील राज्ये तसंच केरळ, तमिळनाडु आणि ...

August 18, 2024 3:49 PM

views 30

मराठी विज्ञान परिषदेतर्फे विज्ञान आणि तंत्रज्ञानक्षेत्रातल्या योगदानासाठी दिला जाणारा ‘मविप जीवन गौरव पुरस्कार’ जाहीर

मराठी विज्ञान परिषदेतर्फे विज्ञान आणि तंत्रज्ञानक्षेत्रातल्या योगदानासाठी दिला जाणारा ‘मविप जीवन गौरव पुरस्कार’ जाहीर करण्यात आले आहेत. यावर्षी डॉ. रघुनाथ माशेलकर पुरस्काराकरता प्रा. रोहिणी गोडबोले आणि डॉ. अजय सूद, यांची तर डॉ. कमला सोहोनी पुरस्काराकरता डॉ. माधव गाडगीळ, आणि डॉ. महताब बामजी, यांची नि...

August 18, 2024 3:39 PM

views 21

जवाहरलाल नेहरू विद्यापीठात कुसुमाग्रजांच्या नावानं अध्यासन सुरू करण्यासाठी निधी देण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा

दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात ज्ञानपीठ पुरस्कार विजेते विख्यात मराठी साहित्यिक कुसुमाग्रज उर्फ वि. वा. शिरवाडकर यांच्या नावाने मराठी भाषेचं अध्यासन सुरू करण्यासाठी निधी देण्यात येईल, तसंच महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या ऐतिहासिक वास्तूचं जतन करण्यासाठी आवश्यक सहकार्य केलं जाईल, असं आश्वासन मुख...

August 18, 2024 1:48 PM

views 21

सिनसिनाटी खुल्या टेनिस स्पर्धेच्या उपांत्य फेरीत इगा श्वियांतेक आणि यानिक सिनर मैदानात उतरतील

सिनसिनाटी खुल्या टेनिस स्पर्धेच्या उपांत्य फेरीत आज महिला एकेरीतली अग्रमानांकित इगा श्वियांतेक आणि पुरुष एकेरीत पहिल्या क्रमांकावर असलेला यानिक सिनर हे दोघेही मैदानात उतरतील. पोलंडच्या इगासमोर बेलारूसची अरीना साबालेंकाचं आव्हान असेल, तर सिनरचा सामना जर्मनीच्या अलेक्झांडर झ्वेरेव्ह याच्याशी होईल.

August 18, 2024 1:21 PM

views 30

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह चेन्नई इथं भारतीय तटरक्षक दलाच्या सागरी बचाव समन्वय केंद्राचं उद्घाटन करणार

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आज चेन्नई दौऱ्यावर जात आहेत. या भेटीदरम्यान भारतीय तटरक्षक दलाकडून चेन्नईत उभारण्यात आलेल्या नव्या अत्याधुनिक सागरी बचाव समन्वय केंद्राचं तसंच सागरी प्रदुषण प्रतिसाद केंद्र तसंच पुद्दुचरी इथं उभारण्यात आलेलं तटरक्षक दलाच्या एअर एन्क्लेव्हचं उद्घाटनही सिंह यांच्या होणार आहे....