August 22, 2024 7:11 PM

views 25

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी केली उत्तर मुंबईतल्या प्रकल्पांची पाहणी

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी आज उत्तर मुंबईतल्या प्रकल्पांची पाहणी केली. त्यांनी उत्तर मुंबईतल्या दौराची सुरुवात चिंचोली इथल्या शताब्दी महानगरपालिका शाळेला भेट देऊन तिथल्या सुविधांचा आढावा घेतला. यावेळी शाळेतल्या विद्यार्थी आणि शिक्षकांशी त्यांनी संवाद साधला.  त्यानंतर गोयल  य...

August 22, 2024 7:05 PM

views 27

बदलापूरमधल्या लैैंगिक अत्याचार प्रकरणी राज्य सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे उच्च न्यायालयाचे निर्देश

बदलापूरमधल्या शाळेत लहान मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणाची स्वतःहून दखल घेत मुंबई उच्‍च न्‍यायालयानं आज सुनावणी घेतली. या प्रकरणी पोलिसांनी त्यांची भूमिका बजावली नसल्याचं सांगत न्यायालयानं तीव्र नाराजी व्यक्त केली. लैंगिक अत्याचार झाला आहे याची माहिती मिळताच पोलिसांनी गुन्‍हा दाखल करायला हव...

August 22, 2024 8:05 PM

views 22

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या पोलंड दौऱ्यात, दोन्ही देशांमधले संबंध धोरणात्मक भागिदारीत परिवर्तित करण्याचा निर्णय

भारत आणि पोलंडनं परस्परांबरोबरचे संबंध धोरणात्मक भागीदारीत परिवर्तित करण्याचा निर्णय घेतल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. वॉर्सा इथं  पोलंडचे प्रधानमंत्री डोनाल्ड टस्क यांच्या बरोबर झालेल्या चर्चेनंतर त्यांनी हे निवेदन जारी केलं. दोन्ही देशांमधल्या राजनैतिक संबंधांचं यंदा ७० वं वर्ष...

August 22, 2024 6:56 PM

views 41

राष्ट्रपतींच्या हस्ते ‘राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार’ प्रदान

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज राष्ट्रपती भवनात आयोजित कार्यक्रमात देशातल्या नामवंत शास्त्रज्ञांना २०२४ सालचे  ‘राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार’ प्रदान केले. यामध्ये महाराष्ट्रातल्या ८ शास्त्रज्ञांचा समावेश आहे.  प्रा.  गोविंदराजन पद्मनाभन यांना यावेळी  ‘विज्ञानरत्न २०२४’ पुरस्कारानं सन्मानित करण्यात...

August 22, 2024 7:47 PM

views 30

लडाखमध्ये बस दरीत कोसळून झालेल्या अपघातात ७ जणांचा मृत्यू

लेह लडाखमधल्या डुरबुक उपविभागामध्ये आज सकाळी झालेल्या अपघातात सात जणांचा मृत्यू झाला असून बावीस जण जखमी झाले आहेत. कर्मचाऱ्यांना एका कार्यक्रमासाठी घेऊन जाणाऱ्या शाळेच्या बसच्या चालकाचं नियंत्रण सुटल्याने बस खोल दरीत कोसळून हा अपघात झाला. यात सहा जणांचा जागीत मृत्यू झाला तर एका जणाचा उपचारा दरम्यान ...

August 22, 2024 7:36 PM

views 23

वक्फ (दुरुस्ती) विधेयक 2024 वरील संयुक्त संसदीय समितीची पहिली बैठक नवी दिल्लीत पार पडली

 वक्फ (दुरुस्ती) विधेयक 2024 वर  भाजप खासदार जगदंबिका पाल यांच्या अध्यक्षतेखाली  गठीत  करण्यात आलेल्या  संयुक्त संसदीय समितीची पहिली बैठक आज नवी दिल्ली इथं पार पडली. या ३१ सदस्यीय समितीमध्ये राज्यसभेतले २१ सदस्य आहेत, तर लोकसभेतले १० सदस्य आहेत. ही समिती या विधेयकाची छाननी करणार आहे.  बैठकीदरम्यान, ...

August 22, 2024 6:04 PM

views 35

देशाच्या पूर्व, पश्चिम, वायव्य आणि मध्य भागात पुढले ४ दिवस अती जोरदार पावसाचा अंदाज

देशाच्या पूर्व, पश्चिम, वायव्य आणि मध्य भागात पुढले ४ दिवस अती जोरदार पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. तर पुढले ७ दिवस दक्षिण द्वीपकल्पात काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. कोकण, गोवा, बिहार, उत्तर प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड,आणि गुजरातमध्ये येत्या २६ ऑगस्ट पर्यंत,  तर  आसाम, मेघालय, नागा...

August 23, 2024 8:56 AM

views 25

पोलंडच्या नागरिकांना कोल्हापूरविषयी एवढा जिव्हाळा का ?

दीप बुझे पश्चिमी गगन के, व्याप्त हुआ बर्बर अंधियारा किंतु चिर कर तम की छाती, चमका हिंदुस्था हमारा..   माजी प्रधानमंत्री दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांच्या कवितेच्या या ओळी आहेत. पाच वर्षांपूर्वी पोलंडच्या राजदुतांनी या ओळी भारताला आणि विशेषतः कोल्हापूरकरांना समर्पित केल्या होत्या. कारण ठरलं होतं ...

August 22, 2024 3:49 PM

views 30

बदलापूर अत्याचार प्रकरणात पोलिसांवर दबाब टाकण्यात आल्याचा नाना पटोले यांचा आरोप

बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातली संबधित शाळा भाजपा आणि आरएसएस विचारांची असल्यानं पोलिसांवर दबाब टाकण्यात आल्याचा आरोप काँग्रेसचे  प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. ते मुंबईत वार्ताहर  परिषदेत बोलत होते. शाळेच्या संस्था चालकांवर दबाव आणून १२ आणि १३ तारखेचे सीसीटीव्ही फूटेज गायब करण्यात आल्याचा आ...

August 22, 2024 3:26 PM

views 24

कोलकाता डॉक्टर बलात्कार आणि हत्येप्रकरणी सीबीआय आणि कोलकाता पोलिसांकडून सर्वोच्च न्यायालयासमोर स्थिती अहवाल सादर

कोलकाता इथल्या आरजी कार वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयलामधील निवासी डॉक्टरवर कथित बलात्कार आणि हत्येप्रकरणी सीबीआयनं आणि कोलकाता पोलिसांनी आज सर्वोच्च न्यायालयासमोर स्थिती अहवाल सादर केला. सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणी आज झालेल्या सुनावणीत सरन्यायाधीश न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड यांनी आंदोलक ड...