November 15, 2025 1:49 PM

views 42

जम्मू काश्मीरमध्ये नौगाम पोलीस ठाण्यात स्फोट, ९ जणांचा मृत्यू

जम्मू काश्मीरमधील नौगाम पोलीस ठाण्यात काल रात्री स्फोटकांचा अपघाती स्फोट होऊन नऊ जणांचा मृत्यू झाला. गृह मंत्रालयाच्या जम्मू आणि काश्मीर विभागाचे सहसचिव प्रशांत लोखंडे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या स्फोटात २७ पोलीस, दोन महसूल अधिकारी आणि तीन नागरिक जखमी झाले आहेत. जखमींवर जवळच्या रुग्णालय...

November 15, 2025 1:48 PM

views 26

झारखंडच्या स्थापना दिनानिमित्त राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि प्रधानमंत्र्यांच्या शुभेच्छा

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सी.पी. राधाकृष्णन, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी आज झारखंडच्या स्थापना दिनानिमित्त तेथील जनतेला शुभेच्छा दिल्या. भगवान बिरसा मुंडा यांच्या मातीतल्या प्रतीभाशाली आणि मेहनती लोकांनी राज्य आणि देशाचा गौरव वाढवला, असं राष्ट्रपती मुर्मू यां...

November 15, 2025 1:41 PM

views 118

बिहार विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी विजयी

बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीने २४३ जागांपैकी २०२ जागा जिंकत प्रचंड बहुमत मिळवलं आहे. यामुळे राष्ट्रीय लोकशाही आघाडीच बिहारमधे सरकार स्थापन करणार हे काल जाहीर झालेल्या निकालात स्पष्ट झालं. सरकार स्थापन करण्यासाठी १२२ जागांची आवश्यकता आहे, त्या तुलनेत रालोआचा हा विजय ऐत...

November 15, 2025 1:44 PM

views 39

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी गुजरात दौऱ्यावर

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज गुजरात दौऱ्यावर आहेत. स्वातंत्र्य सैनिक आणि आदिवासी समुदायाचे नेते भगवान बिरसा मुंडा यांच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी जयंतीनिमित्त आज आदिवासी गौरव दिवस साजरा होत आहे. यानिमित्ताने नर्मदा जिल्ह्यातल्या देडियापाडा इथं एका कार्यक्रमात प्रधानमंत्री मोदी सहभागी होणार आहेत. ते ...

November 15, 2025 1:44 PM

views 47

बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त देशात आदिवासी गौरव दिवस साजरा

आदिवासी समुदायाचे नेते, आणि स्वातंत्र्य सेनानी भगवान बिरसा मुंडा यांच्या स्मृतीला अभिवादन करण्यासाठी  देशभरात आज आदिवासी गौरव दिवस साजरा होत आहे. आजचा दिवस आदिवासी संस्कृतीच्या गौरवशाली इतिहासाचं महत्व अधोरेखित करतो. गेल्या काही वर्षांमध्ये आदिवासी  गौरव सप्ताहाचं स्वरूप घेतलेल्या या उत्सवात देशभर व...

November 14, 2025 8:58 PM

views 43

सुशासन, विकास, सामाजिक न्याय, आणि जनकल्याण धोरणांचा हा विजय असल्याचं प्रधानमंत्र्यांची प्रतिक्रिया

बिहार विधानसभा निवडणुकीत रालोआचा विजय नवी दिल्लीतल्या भाजपा मुख्यालयात आता साजरा होत आहे. बिहारी जनतेनं पुन्हा एकदा विकसित बिहारसाठी, समृद्ध बिहारसाठी मतदान केल्याचं प्रधानमंत्री मोदी यावेळी म्हणाले.   आपण कर्पुरी ठाकूर यांच्या गावातून प्रचाराला सुरुवात केल्याचं सांगून बिहारच्या विकासाला नवीन  ...

November 14, 2025 8:58 PM

views 22

आशियाई तिरंदाजी स्पर्धेत भारताची ऐतिहासिक दिवसाची नोंद

ढाका इथं आयोजित आशियाई तिरंदाजी स्पर्धेत भारतानं आज रिकर्व्ह प्रकारात दोन वैयक्तिक आणि एक सांघिक सुवर्णपदक जिंकलं आहे. महिलांच्या गटामध्ये रिकर्व्ह प्रकारात अंकिता भकत हिने कोरियाच्या सुह्योन नाम हिच्यावर ७-३ असा विजय मिळवत सुवर्णपदक जिंकल. तर पुरुषांच्या गटात रिकर्व्ह प्रकारात धीरज बोम्मदेवराने भार...

November 14, 2025 6:53 PM

views 31

४४व्या भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्यात महाराष्ट्राच्या दालनाचं उद्घाटन

स्टार्टअप उद्योग आणि बचत गटांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी शासन नेहमीच प्रयत्नशील असल्याचं उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज सांगितलं. नवी दिल्लीच्या प्रगती मैदानावर आयोजित ४४व्या भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्यात महाराष्ट्राच्या दालनाचं उद्घाटन करताना ते बोलत होते. यंदाच्या प्रदर्शना...

November 14, 2025 6:44 PM

views 19

विमा कंपन्यांनी पॉलिसीधारकांना जलद सेवा द्यावी, असं अर्थमंत्र्यांचं आवाहन

नवी दिल्लीत आज वित्तीय सेवा विभागाचे सचिव एम नागराजू  यांच्या अध्यक्षेतेखाली विमा कंपन्या आणि आरोग्य सेवा पुरवणाऱ्या संस्थांची  बैठक झाली. आरोग्य विमा धारकांना अधिक चांगलं मूल्य मिळावं यासाठी रुग्णालयं आणि विमा कंपन्यांमधलं सहकार्य वाढणं गरजेचं आहे, असं नागराजू यांनी सांगितलं. विमा कंपन्यांनी सेवांच...

November 14, 2025 6:21 PM

views 44

पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताचा पहिला डाव १५९ धावांवर

कोलकाता इथं इडन गार्डनमध्ये आज सुरु झालेल्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारतानं दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव १५९ धावात गुंडाळला, आणि दिवसअखेर १ गडी गमावून ३७ धावा केल्या.    दक्षिण आफ्रिकेनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायचा निर्णय घेतला. मात्र त्यांचे फलंदाज चांगली कामगिरी करु शकले नाहीत. ...